घरमनोरंजन‘होम सिनेमा सेंटर’ सिस्टम आहे तरी काय?

‘होम सिनेमा सेंटर’ सिस्टम आहे तरी काय?

Subscribe

आजवर आपण नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि इतर अ‍ॅप्लिकेशनवर सिनेमे, शोज किंवा वेबसीरिज पाहत आलो आहोत. आता एचसीसीवर प्रथमच मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून प्रेक्षकांना मोबाइलवर नवा कोरा सिनेमा पाहता येणार आहे.

सोशल मीडिया नेटवर्किंगच्या युगात रोज नवनवीन प्रयोग सिनेसृष्टीतील मंडळीदेखील करत असतात. रुपेरी पडद्यावरील २ डी आणि ३ डी सिस्टमपासून ते नेटवर्कवर आधारीत वेबसीरिजपर्यंत सर्व प्रकारच्या कलाकृतींचा प्रयोग सध्या विविध स्तरांतून केला जात आहे. यातच मोबाइलवर चित्रपट प्रदर्शनाचा प्रयोग पहिल्यांदा मराठीत होत आहे. ‘लव लफडे’ हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी, २० जुलै रोजी एचसीसी या नेटवर्कींग साइटवर दाखवण्यात येणार आहे. अँड्रॉइड मोबाइलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड करून प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे. ‘होम सिनेमा सेंटर’(एचसीसी) हा पहिला भारतीय मोबाइल अ‍ॅप्लिकेशन असून प्रामुख्याने मराठी चित्रपट प्रदर्शनासाठीचे हे माध्यम आहे. आजवर आपण नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि इतर अ‍ॅप्लिकेशनवर सिनेमे, शोज किंवा वेबसीरिज पाहत आलो आहोत. आता एचसीसीवर प्रथमच मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून प्रेक्षकांना मोबाइलवर नवा कोरा सिनेमा पाहता येणार आहे. दिग्दर्शक सचिन आंबट यांच्या ‘लव लफडे’ चित्रपटाची निर्मिती सुमेध गायकवाड आणि गीता कुलकर्णी यांनी केली असून रोहित फाळके, रूचिरा जाधव, समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, मोनिका धाबडे, संजय मोरे आणि सुमेध गायकवाड या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

सध्या मराठी चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरत असून यामध्ये ‘सैराट,’ ‘गुलाबजाम,’ ‘नटरंग’सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. या सिनेमांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच. सोबत चित्रपट समीक्षकांचीही वाहवाही मिळवली आहे. एचसीसी हे प्रदर्शित न झालेल्या मराठी चित्रपटांसाठी उपयुक्त माध्यम असून येथे प्रदर्शित झालेले सिनेमे साधारण ३ महिने या अ‍ॅपवर पाहता येतील. तर वर्षाला ३ ते ४ सिनेमे यावर प्रदर्शित केले जातील, असे एचसीसीचे संस्थापक सदानंद इप्पाकायल यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोबाइल अ‍ॅपवर प्रदर्शित होणार्‍या ‘लव लफडे’ चित्रपटाला प्रेक्षक कशापद्धतीने प्रतिसाद देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

 


 

- Advertisement -
IPITAR HOUSEFUL
‘इपितर’ चित्रपटाला हाऊसफुल्लची पाटी

‘इपितर’ चित्रपटाला हाऊसफुल्लची पाटी

परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा ‘इपितर’ सिनेमाव्दारे १३ जुलैला रूपेरी पडद्यावर झळकली. अस्सल ग्रामीण बाज असलेल्या चित्रपटात कलाकारांची गावरान निरागसता आणि जोडीला कॉमिक टाइमिंग हे सर्व इपितर सिनेमा पाहणार्‍या प्रेक्षकांना आवडत असल्याचे त्यांच्या प्रतिसादातून समजते. राज्यात अनेक ठिकाणी ‘इपितर’ सिनेमाच्या शोजना हाऊसफुल्लची पाटी लागलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादाबाबत लेखक-निर्माते किरण बेरड सांगतात, मैत्रीच्या नात्याचा गोडवा, त्यातली अवखळता आणि मस्ती या सर्वांचा मिलाफ ‘इपितर’मधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आणि सध्या सिनेमागृहांच्या बाहेर झळकणार्‍या हाऊसफुलच्या पाट्यांनी तर आम्हालाशाबासकीची पावतीच दिली आहे. खूप आनंद होत असून प्रेक्षकांचे प्रेम असेच भरभरून मिळावे ही अपेक्षा आहे. भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ आणि सुहास दुधाडे ह्यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘इपितर’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत असल्याचे या हाऊसफुल्लच्या पाटीवरून दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -