घरताज्या घडामोडीVideo - करण जोहरच्या मुलांना आला बाबाच्या कपड्याचा राग, दिला 'हा' सल्ला!

Video – करण जोहरच्या मुलांना आला बाबाच्या कपड्याचा राग, दिला ‘हा’ सल्ला!

Subscribe

दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने त्याच्या मुलाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडिओला नेटकऱ्यांनी खूप पसंती दिली आहे. कारण या व्हीडिओत करणची छोटी मुलं त्याला एक मोलाचा सल्ला दिला आहे. करणच्या मुलांनी दिलेला हा सल्ला करणच्या मित्रांना आणि बॉलिवूडकरांना खूप आव़डला आहे.

- Advertisement -

करणसध्या लॉकडाऊनमुळे आपल्या मुलांबरोबर म्हणजे यश आणि रूहीबरोबर वेळ घालवत आहे. तो नेहमी आपल्या मुलांबरोबरचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. दिग्दर्शक करण जोहरनं त्याच्या मुलांबरोबरचा एक गोड व्हिडीओ नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळतेय.

- Advertisement -

काय आहे व्हीडिओत

लॉकडाऊनमुळे घरीच असल्यानं करणने कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत असा प्रश्न मुलांना म्हणजे यश आणि रूहीला विचारला. या व्हीडिओत तो मुलांना वॉर्डरूममध्ये घेऊन गेला. यावर बोलताना यश म्हणाला, ‘कोणतेही घाल पण साधे कपडे घाल’ असं उत्तर यशने करणला दिले. यशचा हा सल्ला सगळ्यांना खूप आवडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -