घरताज्या घडामोडी...म्हणून सलमानने भाग्यश्रीसोबत किसिंग फोटोशूट करण्यास दिला नकार

…म्हणून सलमानने भाग्यश्रीसोबत किसिंग फोटोशूट करण्यास दिला नकार

Subscribe

भाग्यश्रीने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

जेव्हा बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा आपण तो संपूर्ण कुटुंबासोबत बसून पाहू शकतो. कारण त्याच्या चित्रपटात कोणतेही किसिंग किंवा लिप लॉकची सीन नसतात. त्यामुळे सलमान खानचे चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहताना काहीही वाटत नाही. पण सलमानने कोणत्या चित्रपटापासून किसिंग पॉलिसीला सुरुवात केली हे तुम्हाला माहिती आहे का? सलमानच्या दुसऱ्या चित्रपटातील किसिंग फोटोशूटबद्दल काही खुलासे झाले आहेत.

१९८९ मध्ये दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात दरम्यानचा हा किस्सा आहे. या चित्रपटात भाग्यश्रीसोबत सलमानने काम केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानला एका फोटोग्राफरने भाग्यश्रीला न सांगता किस्स करायला असे सांगितले होते.

- Advertisement -

या चित्रपटात सलमान आणि भाग्यश्रीचे अनेक रोमँटिक सीन आहेत. हेच सीन शूटिंग करताना त्या फोटोग्राफरला सलमान आणि भाग्यश्रीचे इंटेंस शॉट घेण्याची इच्छा होती. म्हणून त्याने नॅचरल वाटण्यासाठी भाग्यश्रीला न सांगता किस करण्यास सलमानला सांगितले होते. पण सलमानने हे करण्यास नकार दिला. त्याला अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने शूट करणे हे चुकीचे वाटत होते. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने हा किस्सा सांगितला आहे.

भाग्यश्रीने या मुलाखतीत छायाचित्रकाराचे नाव न घेता म्हटले होते की, सलमान आणि भाग्यश्रीचे काही हॉट फोटोशूट करण्याची त्या फोटोग्राफाला इच्छा होती. त्यामुळे त्याने सलमानला कॅमेरा सेटअप झाल्यानंतर तिला किस करायला सांगितले होते. त्यावेळेस ती त्या दोघांच्या जवळच उभी होती आणि हे सर्व ऐकत होती. पण याबाबत सलमान आणि फोटोग्राफरला माहित नव्हते. त्यानंतर भाग्यश्री हे ऐकून हैराण झाली.

- Advertisement -

पण सलमान फोटोग्राफला म्हणाला की, ‘मी या शॉटसाठी असे काही करणार नाही तुम्हाला अशा पोज हव्या असतील तर पहिल्यांदा भाग्यश्रीशी बोला.’ सलमानचे हे मत ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर वाटला आणि ती सुरक्षित असल्याचे वाटले, असे भाग्यश्रीने मुलाखतीत सांगितले.


हेही वाचा – Video: …म्हणून कॉमेडियन वीर दासवर खोकला ‘हा’ व्यक्ती!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -