घरमनोरंजनशाहरुख म्हणतोय रितेश लय भारी!

शाहरुख म्हणतोय रितेश लय भारी!

Subscribe

रितेशचा मोठेपणा बघून शाहरुख खान थक्क झाला आहे. शाहरुखने त्याच्या मोठेपणाचे कौतुक करत ट्विटरवर आभार मानले आहे.

शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रितेश देशमुखचा ‘माऊली’ चित्रपट देखील प्रदर्शित होणार होता. रितेश देशमुख हे महाराष्ट्रातील मोठे नाव आहे. याअगोदर त्याच्या ‘लय भारी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आगामी चित्रपटालाही प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळणार, हे नक्कीच! ‘माऊली’ आणि ‘झिरो’ची प्रदर्शित तारीख एकच असल्यामुळे दोघांच्या कमाईवर फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे रितेशने एक पाऊल मागे घेत, माऊली चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलली आहे. यावर शाहरुख खानला आनंद झाला आहे. रितेशच्या या पावलामुळे शाहरुख भावूक झाला आहे. त्याने रितेशचा मोठेपणा बघून रितेश लय भारी असल्याचे मान्य केले आहे. याविषयी त्याने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तो ‘जब छोटा भाई बडा हो जाता है’, असे म्हणाला आहे.

हेही वाचा – ‘माऊली’ मधील रितेशचा फर्स्ट लूक रिलीज

- Advertisement -

काय म्हणाला शाहरुख खान?

जेव्हा लहान भाऊ मोठा होतो असं म्हणत शाहरुखने रितेशचे आभार मानले आहेत. यापुढे शाहरुख म्हणतो की, ‘रितेश तू दाखवलेला मनाचा मोठेपणा, मला दिलेला आदर याबद्दल मी नि:शब्द झालो आहे. माझ्यासाठी स्वत:चा गरजा बाजूला ठेवणारा, तुझ्यासारखा मित्र मला मिळाला याचा आनंद आहे’.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीच्या आमदाराकडून शाहरुख खानविरोधात फौजदारी खटला दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -