टॅलेंटला पाठिंबा द्या; राणू बाबत बोलताना हिमेश रेशमियाला रडू कोसळले

राणू मंडलचे बॉलीवूड पदार्पणातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात प्रेक्षकांशी संवाद साधताना गाण्याचा संगीतकार हिमेश रेशमिया भावूक झाला.

Mumbai
Wherever you see talent, promote it

रातोरात इंटरनेटवर स्टार झालेल्या राणू मंडलचे बॉलिवूड पदार्पणातील ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे नुकतेच लाँच झाले. या गाणे लाँचच्या कार्यक्रमाला गाण्याचा संगीतकार हिमेश रेशमिया आणि गायिका राणू मंडल हो दोघेही उपस्थित होते. यावेळी दोघांनीही उपस्थित प्रेक्षकांसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी राणूबाबत बोलताना हिमेश रेशमिया भावूक झाला. जिथे कुठे तुम्हाला टॅलेंट दिसेल, तर त्या व्यक्तीला पाठिंबा द्या, असे म्हणून हिमेश रेशमियाच्या डोळ्यांमध्ये आसवे आली. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राणूच्या यशाबाबत काय म्हणाला हिमेश रेशमिया?

व्हायरल व्हिडिओमध्ये राणूने तिला खूप आनंद झाल्याचे सर्वांना सांगितले. यावेळी हिमेश रेशमियाच्या डोळ्यांतदेखील आसू आले. ते पाहून राणू म्हणाल्या की, “ह्यांच्या डोळ्यांत तर आसवे आली. आसू दोन प्रकारचे असतात. पण ह्यांच्या डोळ्यांतील अश्रू आनंदाचे असल्याचे” राणू मंडलने सांगितले. यावेळी हिमेश रेशमियानेदेखील उपस्थितांशी संवाद साधला. हिमेश रेशमिया म्हणाला की, “राणूचा हा प्रवास तुमच्यामुळे झाला. कधी कधी आमच्यासमोर असे टॅलेंट येते आणि मग आम्ही त्या टॅलेंटला पुढे घेऊन जातो. तेव्हा आम्हाला असे वाटते की, माहित नाही आम्ही काय केले? अशा आविर्भावात आम्ही वावरू लागतो. पण प्रत्यक्षात आम्ही काहीच केलेले नसते. आमच्याकडून जेवढे शक्य होते ते आम्ही केले. आता तुम्ही राणूला आणखी पुढे घेऊन जा. जेथे कुठे तुम्हाला टॅलेंट दिसेल त्याला पाठिंबा द्या.”

कोण आहे राणू मंडल?

राणू मंडल पश्चिम बंगाल येथं राहते. दररोज ती स्टेशनवर गाणं गाऊन गुजराण करत होती. लता दीदींचं अवघड गाणं सहजतेने गाणाऱ्या राणूला पाहून एकानं तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राणू अचानक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. राणूला आता मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी विचारण्यात आलं आहे. एका कार्यक्रमाच्या टीमनं तर तिचा मेकओव्हरच केला आहे. त्यामुळे तीचा लूक पुर्णपणे बदलला आहे.

लता मंगेशकरांनी केली होती टीका

काही दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी राणू मंडलच्या गायन कौशल्यावर टिप्पणी केली होती. राणू मंडेलावर भाष्य करताना त्यांनी एक सल्ला दिला होता. त्या म्हणाल्या की, “तुम्ही तुमची गायन शैली निर्माण करा, सगळ्या गायकांची गाणी म्हणा मात्र स्वत:चं गाणं शोधा, आपली शैली तयार करा.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here