घरमनोरंजनप्रियांका चोप्रा आणि निकची 'भेट' घडवली कोणी?

प्रियांका चोप्रा आणि निकची ‘भेट’ घडवली कोणी?

Subscribe

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा तथाकथित प्रियकर निक जोन्सची चर्चा रोज असते. पण या दोघांची 'भेट' नक्की कोणी घडवून आणली माहीत आहे का तुम्हाला?

सध्या एक दिवस आड देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा तथाकथित प्रियकर निक जोन्सची चर्चा असते. दोघे एकत्र असलेले रोज नवीन नवीन फोटो व्हायरल होत आहेत. पण या दोघांची ‘भेट’ नक्की कोणी घडवून आणली माहीत आहे का तुम्हाला? ‘ईटीऑनलाईन’नं दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांमधील दुवा आहे, ड्वेन जॉन्सन. हे दस्तुरखुद्द ड्वेननंच सांगितलं आहे. वास्तविक ही बाब ड्वेननं मजेत सांगितली आहे की, यामध्ये तथ्य आहे याबाबत अजूनही साशंकता आहे.

काय म्हणाला ड्वेन?

हॉलीवूड अभिनेता – निर्माता ड्वेन जॉन्सनबरोबर प्रियांका चोप्रानं आपल्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटात काम केलं. तेव्हापासूनच प्रियांका आणि ड्वेनची चांगली मैत्री आहे. निक आणि प्रियांकाच्या भेटीमध्ये आपलाच हात असल्याचं ड्वेननं सांगितलं. ‘ते दोघं खूश आहेत का? तर मी याचं क्रेडिट घ्यायला तयार आहे. मीच निक आणि प्रियांकाची भेट घडवून आणली आणि मॅचमेकर झालो,’ असं वक्तव्य ड्वेननं दोघांसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर केलं आहे. परंतु यामधील तथ्य नेमकं काय आहे? हे कळू शकलेलं नाही.

- Advertisement -

प्रियांका आणि निक सतत एकत्र

प्रियांका आणि निक सध्या सतत एकत्र असून त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडत असल्याचं त्यांच्या फोटोंवरून कळत आहे. दरम्यान, प्रियांका नुकतीच निकला घेऊन आपली आई मधू यांना भेटवण्यासाठी आली होती. इतकंच नाही, तर मुंबईत आल्यानंतर आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्यातदेखील प्रियांकाला निकच्या हातात हात घालून वावरताना तिच्या चाहत्यांनी पाहिलं. त्यांचे हे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर ब्राझीलला निकच्या कॉन्सर्टलादेखील दोघे एकत्र गेले होते. या दोघांना सर्वात पहिले मागच्या वर्षी गाला मेट दरम्यान पाहिले गेले होते. निक जोन्स २५ वर्षांचा अमेरिकन गायक असून प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. तर प्रियांका लवकरच सलमान खानबरोबर अली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘भारत’ मधून पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -