घरमनोरंजनकतरिना कधीही करणार नाही अर्जुन कपूरबरोबर रोमान्स

कतरिना कधीही करणार नाही अर्जुन कपूरबरोबर रोमान्स

Subscribe

कतरिना अर्जुन कपूरबरोबर कधीही रोमान्स करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. काय आहे याचं कारण?

एक वेळ अशी होती, जेव्हा अर्जुन कपूर आणि वरूण धवननं ‘व्ही हेट कतरिना’ नावाचा व्हॉट्स अप ग्रुप तयार केला होता, असा खुलासा कतरिनानं स्वतः एका मुलाखतीमध्ये केला होता. मात्र आता, अर्जुन, वरूण आणि कतरिनामध्ये खूप चांगली मैत्री आहे. तर, लवकरच ‘एबीसीडी ३’ मध्ये वरूण बरोबर रोमान्स करताना कतरिना दिसणार आहे. मात्र, कतरिना अर्जुन कपूरबरोबर कधीही रोमान्स करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. काय आहे याचं कारण? प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण तर्कवितर्क लावू नका. कतरिना अर्जुन कपूरला राखी बांधत असल्यामुळंच त्यांना पडद्यावर रोमान्स करताना प्रेक्षकांना पाहता येणार नाही.

अर्जुन आणि कतरिनामध्ये सगळं आलबेल

अर्जुन आणि कतरिना एकमेकांचा चांगले मित्र असले तरीही कतरिना त्याला आपला भाऊ मानत असल्यामुळंच ते दोघं कधीही एकमेकांबरोबर रोमान्स करताना दिसणार नाहीत. भाऊ मानत असल्यामुळं अर्जुन कपूरसोबत असं सीन देणं कतरिनाला शक्य नाही. अर्जुनला राखी बांधल्यानंतर दोघांनीही पडद्यावर रोमान्स न करण्याचा निर्णय घेतला होता. पडद्यावर यांना केवळ बहीण – भावाच्या भूमिकेतच पाहता येईल. अर्जुन कपूर नेहमीच कतरिनाच्या इन्स्टाग्राम फोटोंवर मजेशीर कमेंट करत असतो. नुकत्याच कतरिनानं पोस्ट केलेल्या फोटोवर अर्जुननं ‘कतरिना तुला केसात कोंडा (डँड्रफ) झाला आहे’ अशी कमेंट केली आहे. यावरून दोघांमध्ये भांडण झाल्याची चर्चा होती. मात्र असं काहीही नसून त्या दोघांमध्ये सगळं आलबेल आहे.

- Advertisement -

कतरिनाला वाढदिवसापूर्वीच अर्जुनची भेट

सध्या अर्जुन कतरिनाच्या ‘नमस्ते लंडन’ च्या सिक्वलमध्ये काम करत आहे. त्यामुळं त्यानं तिच्या वाढदिवासापूर्वी ‘तेरी ओर’ गाण्याचा फोटो पोस्ट केला. ‘तेरी ओर तेरी ओर हाय रब्बा हे २.० वर्जन फक्त तुझ्यासाठी’ असं कॅप्शन देत अर्जुननं हा फोटो पोस्ट केला आहे. कतरिनाचा वाढदिवस १६ जुलैला आहे. त्यामुळं या दोघांचं बहीण – भावांचं नातं सोशल मीडियावरदेखील चाहत्यांना पाहता येत आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -