का घेतला मलायका वैनीनं काडीमोड?

Mumbai

अरं ये ऐक की! तुला म्हायतेय, त्या क्रिकेटवर ते काय बेटींग का काय करतात न्हवं, त्याच्या पायी म्हनं कोणत्यातरी हिरोचा काडीमोड झालाय.  खोटं नाय रं, खरं हाय समदं ह्ये. टीव्हीवर बघ का लेका. सगळीकडं त्येच तर दावतायत. आता तुम्हासनी इचार पडला अासल का कोण बरं ह्ये जोडपं? सांगनार! तुम्हासनी त्या शेलिब्रिटी जोडप्याचं नाव पन सांगनार!

तुम्ही भाईजान सलमान खानला तर वळीखता..आता सलमानला वळखत नाय, आसं म्हननारा सापडनं म्हजीं जरा अवघडच! न्हाई का? आता तुम्ही म्हनाल काय बाता मारताय राव! सलमानचं लगीन तरी कुटं झालंय काडीमोड घ्याया? तुमचं येकदम खरं माऊली. आमी सलमानबद्दल न्हाई तर त्येचा भाऊ अरबाज खान आणि तुमी जिच्या डान्सचे दिवाने हायता त्या ‘मुन्नीबाई’बद्दल म्हंजी मलायका वैनीबद्दल बोलतोय.

हा ना भाऊ, या क्रिकेटच्या येडापायी म्हंजी त्या बेटींगचं खुळ अरबाज भाऊच्या डोस्क्यात शिरलं आन बसला मंग सगळं गमावून. पैका तो पैका ग्येला आन या समद्याला कटाळून मलायका वैनी पन गेली! बाकी काय राह्यलं तर त्ये म्हनत्यात ना, ‘तेल बी ग्येलं, तुपबी ग्येलं, आन हाती काय? त्यात कमी व्हतं मनून की काय, पोलिसांचं लचांड मागं लागलं ते यगळंच. मलायका वैनी गेल्याव भाऊ आधीच फुल्ल टेन्शनमदी. त्यात पोलीस दादा काय आता पाठ सोडनात. घेतलं ना मंग आतमधी. मग काय राव समदं आलं ना म्होरं. भाऊची हीsss दर्दभरी कहानी ऐकून समद्यांना लय ब्येकार वाटलं ना राव! आता तुम्ही म्हनाल ह्ये समदं झालं तर कसं? तर वाईच कळ काढा..त्ये बी सांगतो…!

नक्की फिसकाटलं कुटं?

काय ना मंडळी तसं तुमी समद्यांनी ‘शौक बडी चीज है’ असं कवा तर ऐकलं आसलच? तसलाच परकार हाये आरबाज भाऊचा. त्यात गाठीला दोन पैकं असलं की मग काय होऊ दे खर्च! ते तुमी काय म्हनता आयपीएल का काय? त्या कीरकेटच्या खेळावर भाऊनं केली ना ब्येटींग! त्येबी येक दोनदा नाय तर सा येळा. त्यो सोनू जालान का जळलं कोण तरी हाय म्हनं. लय मोट्टा बुकी. त्याचे म्हनत्यात डायरेक्ट दाऊदशी संबंध हायती. मंग दाऊद आसो नायतर जालान, पोलिसांना लागली ना खबर. डायरेक्ट सोनू जालानला टाकला आत. चौकशी केली तर आरबाज भाऊचं नाव घ्येतलं त्या जालान नं. आता आरबाजनं त्या सोनूवर भरवसा का ठेवायचा?

आरबाज भाऊ आला ठाणे क्राईम ब्रांचला आणि दिली ब्येटींगची का काय त्येची कबुली. म्हनला ह्यो बघा साह्येब, सा येळा ब्येटींग केली. पन, फायदा काय नशीबात न्हाय माज्या. आवो, साह्येब कमावनं सोडा गमावनंच आलं या फाटक्या नशीबात. पुढचं ऐकून पोलिस पण उडालं ना जाग्यावर टाणदीशी. पोलिसी खाक्या दावताच आरबाज भाऊ बोलाय लागला घडाघडा. म्हनला बेटींग पाय पैकं सोडा सायेब बायको पन गेली सोडून! ह्ये ऐकून पोलिसांना धक्का बसला. आता मात्र भाऊचं डोळं थांबना झालं. ह्येss लागल्या गंगा-जमुना! दिस सरलं तसं लोकाचं देनं वाढत गेलं. तर, ब्येटींगवालं मलायकाला फोन करू लागलं. ती पन लय वैतागली. आरबाज भाऊला चार शबूद सांगितले बी. पन, गड्यानं काय तिचं ऐकलं नाय बगा.

मंग सगळा म्याटर सलमान भाईकडं ग्येला. त्यानं बी हिकडं तिकडं क्येलं बरंच. पन यवडं म्होटं काळवीट पचवनाऱ्या भाईजानलाबी ब्येटिंग काय पचवता आलं न्हाई..त्यानं हात टेकलं. आरबाज भाऊ म्हनला, रागात त्यो मला दोन थप्पड मारणार व्हता. पन मंग बा आडवा आला. आयनं समजावलं तवा कुटं त्यो शांत झाला. न्हायतर माजं काय खरं नव्हतं बघा साह्येब. मी ऐकत नाय ह्ये कळल्याव मलायकानं बी हात ट्येकलं आन म्हनली तुजा संसार तूच सांबाळ.. ही म्या निगाले. मला दे घटस्फोट! त्या ब्येटींगपायी मलायका आणि आरबाज भाऊच्या घटस्फोटाचं खरं कारण तरी समोर आलं. आता तुमी म्हनाल खरं कारण म्हंजी? आवो त्ये नाय का, मलायका आन अर्जुन (कपूर) दादाच्या लफड्याव फुल्ल गावभर बोभाटा झाला व्हता. त्या लफड्यापायी मलायका वैनी बदनाम झाली. आसो.

म्हनून सांगतो बापड्या हौsss वाईट संगतीत जावू नका! आच्यार-इच्यार चांगला करा. न्हायतर तुमचा बी आरबाज झालाच समजा…आन मंग तुमची मलायका तुम्हास्नी सोडल का न्हाई त्ये ठावं न्हायी…पन कमरत लाथा घातल्याबिगर ऱ्हायची न्हाई!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here