दया बेन परतणार का तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत?

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून काही काळासाठी सुट्टी वर गेलेली दया म्हणजेच दिशा वाकानीच्या परतण्याची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

Mumbai
dayaben
तारक मेहतामध्ये दिशा वकानी

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून प्रत्येकाच्या घरा-घरात पोचलेली दया बेन सगळ्यांचीच फेवरेट आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून ती मालिकेपासून दुर आहे. त्याच कारण देखील तसच आहे, दया बेन म्हणजेच दिशा वाकानीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलगी लहान असल्याने ती गेल्या काही काळापासून मालिकेपासून दूर आहे. तारक मेहताका उल्टा चष्मा ही विनोदी मालिक असून गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेवर प्रेमकरणारा खुप मोठा असा प्रेक्षक वर्ग आहे. मालिकेतील दया बेन आणि जेठालाल या दोन्ही व्यक्तीरेषा पेक्षकांच्या विषेश आवडीच्या आहेत. त्यामुळेच दया बेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत परतण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

३० दिवसांची नोटीस

मालिकेत दया आपल्या आईकडे गेली असल्याचे दाखवण्यात आले आहे. तीच्या जागी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा विचार नसल्याचे मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या पूर्वीच सांगितले होते. स्पॉट बॉय या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्ता नुसार दिशा वकानीला मिलिकेत परत येण्यासाठी विचार करायला ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ती आल्यास मालिकेला आणि तिला देखील त्याचा फायदा होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले असून अद्याप तिचा करार देखील रद्द करण्यात आलेला नाही.

दुसऱ्या अभिनेत्रीला संधी?

दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा अद्यापजरी विचार नसला तरी ३० दिवसात दिशा वाकानी चित्रिकरणाला न अल्यास दुसऱ्या कलाकाराला संधी देण्याचा विचार करण्यात येणार आहे. दिशा वकानीने याबाबत अद्यापतरी काहीही खुलासा केलेला नाही. तिच्या गरोदर पनाच्या काळात शेवटच्या दिवसांपर्यंत तिने मालिकेच चित्रिकरण केल होत. तसेच सहकलाकारांनी देखील तिची काळजी घेतली होती. त्यामुळे आता लाडकी दया परतणार की मालिकेला रामराम ठोकणार हे पाहण औत्सुक्याचे आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here