Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन दीपिका पहिल्यांदाच दिसणार 'खलनायिके'च्या भूमिकेत

दीपिका पहिल्यांदाच दिसणार ‘खलनायिके’च्या भूमिकेत

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड विश्व अनलॉकमध्ये आता पुन्हा नवे चित्रपट घेऊन सज्ज झाले आहे. त्यातच २०२१ नववर्षानिमित्त निर्मात्यांनी अनेक सिनेमांच्या घोषणा केल्या आहेत. याची सुरुवात ‘धूम ४’ चित्रपटाने झाली आहे. २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘धूम ४’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूल घातला. हॉलिवूड स्टाइल, रेसिंग बाईक्स, त्यांचे स्टंट्स, कथानक, गाणी अशा सगळ्यांमुळे ‘धूम’ सिरिजच्या साऱ्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता याचा चौथा भागही यशराज फिल्मस प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे.

पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसऱ्यात हृतिक रोशन तर तिसऱ्यात आमीर खान असे तीन कलाकार खलनायकांच्या भूमिकेत दिसले होते. पण आता या चौथ्या भागात खलनायिका म्हणून दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
निर्मिती संस्थेने याबाबत दीपिकाशी बोलणी सुरू केली आहेत, असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. पण, सध्या दीपिकाकडे यशराजचा पठाण, प्रभाससोबतचा एक आगामी चित्रपट, शकुन बत्रा दिग्दर्शित एक चित्रपट असे तीन चित्रपट आहेत. त्यामुळे आगामी चित्रपटासाठी तारखा निश्चित झाल्यानंतरच याबाबत खुलासा होईल.

- Advertisement -

 


हेही वाचा –नोरा फतेहीच्या ट्रान्सपरंट गाऊनने इंटरनेटवर लावली आग
- Advertisement -