घरमनोरंजनमिका सिंगची मॅनेजर सौम्याची रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच आत्महत्या!

मिका सिंगची मॅनेजर सौम्याची रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच आत्महत्या!

Subscribe

सौम्याने झोपेच्या गोळ्या खाऊन केली आत्महत्या

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग हा नेहमी या ना त्या कारणाने वाद-विवादात अडकत असतो. नुकतचं मिका याची मॅनेजर असलेली सौम्या हिच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा मिका चर्चेत आला आहे. मिका याची मॅनेजर असलेली सौम्या हिने नुकतीच आत्महत्या केली आहे. आत्महत्या मिकाच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये केल्यामुळे आता सगळीकडे चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

गायक मिका सिंग याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ मुंबईतील अंधेरीमध्ये आहे. याच अंधेरीमधील त्याच्या स्टुडिओमध्ये त्याची मॅनेजर सौम्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची बातमी आता समोर आली आहे. केआरके ने ही ट्विटर वरुन ही बातमी सगळ्यांना दिली. सौम्याचा एक फोटो पोस्ट करत त्याने ट्विट करत लिहिलं, ‘सिंगर मिका सिंगची मॅनेजर सौम्याने त्याच्या अंधेरी वेस्टमधल्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आत्महत्या केली आहे… रेस्ट इन पीस…’

- Advertisement -

ही आत्महत्या गेल्या आठवड्यात झाली होती. तसंच ज्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये सौम्याने आत्महत्या केली आहे तिथेच ती राहत होती. याबद्दल अधिक माहिती देत या वेबसाईटमध्ये असं लिहिलं गेलं आहे की, झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेत सौम्याने आत्महत्या केली. असं असलं तरीही या आत्महत्येमागचं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सौम्याला आई-वडील नव्हते पण तिचे आजी-आजोबा पंजाबमध्ये राहतात. यामुळे मिकाने अंत्यसंस्कारांसाठी तिचं पार्थिव शरीर पंजाबमध्ये नेलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -