घरट्रेंडिंगजागतिक कर्करोग दिन: या सेलिब्रिटींनी केली कर्करोगावर मात

जागतिक कर्करोग दिन: या सेलिब्रिटींनी केली कर्करोगावर मात

Subscribe

भारतीय चित्रपटसृष्टीची चंदेरी दुनिया म्हणजे बॉलिवूड. इथे चमचमणाऱ्या यशासोबत आहेत काही संघर्षाच्या कथा. जागतिक कर्करोगाच्या दिनानिमित्त काही सेलिब्रिटींनी कर्करोगावर मात करुन पुन्हा आपल्या आयुष्याला कशी सुरुवात केली याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. कर्करोगासारख्या महाभयंकर आजारातून कमालीचा संघर्ष करुन हे सेलिब्रिटी आज दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनले आहेत.

सोनाली बेंद्रे

- Advertisement -

सोनाली बेंद्रेने जेव्हा आपल्या कर्करोगाबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. तेव्हा तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. सोनालीने वेळोवेळी तिच्या आजाराबद्दल माहिती दिलेली आहे. आजही जागतिक कर्करोग दिनानिमित्त सोनालीने एक भावनिक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तिने कर्करोगाच्या विरोधातील संघर्षाचे सर्व फोटो दाखवले आहेत. तसेच इतरांनी कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी आपल्या आरोग्याची नेहमी तपासणी करत राहायला हवे, असेही आवाहन केले आहे.

- Advertisement -

ऋषी कपूर

ऋषी कपूर यांनाही कर्करोगाचे निदान झाले होते. मागच्या वर्षीच न्यू यॉर्क येथे उपचार घेऊन ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच जोमाने कामाला सुरुवात केली आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या आजाराबद्दल जास्त काही माहिती सोशल मीडियावरुन तरी दिली नाही.

मनिषा कोईराला

बॉलिवूडमध्ये नव्वदचे दशक गाजविलेली अभिनेत्री मनिषा कोईरालाला देखील कर्करोगाचा सामना करावा लागला होता. चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब केल्यामुळे आपल्याला कर्करोगासारखा भयंकर आजार झाल्याचे कोईराला मान्य करतात. TedX Talk या ऑनलाईन कार्यक्रमात मनिषा कोईरालाने आपल्या जीवनातील संघर्षाची कथा सांगितलेली आहे. वास्तव स्वीकारण्याची वीरता मनिषा कोईराला यांनी दाखवली आहे. तसे मनिषा कोईराला यांनी स्वतःच्या आयुष्यावर ‘Healed: How cancer gave Me a New Life’ हे पुस्तक देखील लिहिलेले आहे.

ताहिरा कश्यप

अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनेही कर्करोगातून यशस्वी लढत दिली. सोनाली बेंद्रेप्रमाणेच ताहिरा देखील वेळोवेळी आपल्या कर्करोगाबद्दल सोशल मीडियावर माहिती देत असे. ताहिराने आज इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृतीची गरज असल्याचे म्हटले आहे.

इरफान खान

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान देखील या आजाराच्या विळख्यात सापडला होता. जेव्हा त्याला पहिल्यांदा या आजाराबद्दल कळलं, तेव्हा त्याने त्या आजाराचे नाव देखील मला उच्चारता येत नसल्याचा विनोद स्वतःवरच केला होता. परदेशात उपचार घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा इरफान बॉलिवूडमध्ये सक्रीय झाला असून अग्रेंजी मिडियम या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे.

युवराज सिंह

बॉलिवूडप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना देखील या आजाराने ग्रासले आहे. भारताचा धडाकेबाज फलदांज युवराज सिंह एकेकाळी कर्करोगाशी लढला होता. या आजारातून तो आता बाहेर आलेला आहे. आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने युवराज सिंहने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मी कर्करोगापासून वाचलो आहे आणि मी तुम्हाला देखील यापासून वाचवू इच्छितो… अशा आशयाचा मजकूर या व्हिडिओतून युवराजने दिला आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -