घरमनोरंजनतापसी पुढे सरसावली

तापसी पुढे सरसावली

Subscribe

रोगाचे निदान करण्यात वैद्यकीय क्षेत्राला यश जरी आले असते तरी त्याचा प्रचार करणे आजही गरजेचे वाटते. ठरावीक दिवसाचे निमित्त घेऊन कलेचा प्रचार अधिक प्रभावी आणि जाणिव करून देणारा ठरतो. ‘जागतिक कर्करोग दिवस’ हा त्यापैकी एक आहे. अनेक संस्था या दिनाचे निमित्त घेऊन जनजागृती करत असतात. अशा सामाजिक उपक्रमात सेलिब्रिटी कलाकारांनी उपस्थिती दाखवली तर आयोजकांमध्ये उत्साह निर्माण होतो. गोरेगाव स्पोर्ट्स क्लबने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात ‘मनमर्जिया’ फेम तापसी पन्नू जनजागृतीसाठी पुढे सरसावली.

तापसी ही ‘मनमर्जिया’ च्या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध झाली असली तरी तामिळ, तेलगू, मल्याळम अशा कितीतरी भाषिक चित्रपटात काम करून तिने लोकप्रियता प्राप्त केलेली आहे. आपल्या लोकप्रियतेचा फायदा समाजासाठी होणार असेल तर त्यासाठी प्रत्येक कलाकाराने पुढाकार घ्यायला हवा या एका हेतूने ती कर्करोगाच्या प्रचारासाठी उपस्थित राहिली होती. साडेतीन हजार विद्यार्थी जे मॅरेथॉनसाठी उपस्थित राहिले होते, त्यांना झेंडा दाखवण्याचे काम तापसीने केले होते. या स्पर्धेच्या आयोजनात राजश्री पांचाळ, मुकेश पुरोहित यांनी पुढाकार घेतला होता. यांच्याच सहकार्याने टाटा मेमोरिअल हॉस्पिटलला यावेळी अर्थसहाय्यही करण्यात आलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -