घरमनोरंजननिम्माशिम्मा राक्षस येतोय

निम्माशिम्मा राक्षस येतोय

Subscribe

बालनाटक हे मनोरंजनाचा स्वतंत्र अविष्कार आहे. हे ओळखून ज्या निर्मात्यांनी, लेखकांनी या बालनाटकाला संजीवनी मिळवून दिली त्यात सुधा करमरकर, सुलभा देशपांडे, अशोक पावस्कर यांच्याबरोबर रत्नाकर मतकरी यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मतकरी यांनी साहित्याच्या विविध प्रकारांना स्पर्श करताना बालसाहित्यही तेवढेच हाताळलेले आहे. विशेष म्हणजे त्यांची बालनाटकेही अजरामर ठरलेली आहेत. मधल्या काळात केवळ व्यवसाय करण्याच्या उद्देशाने अनेक निर्माते या क्षेत्रात आले आणि मनोरंजनाचा जो मुख्य उद्देश होता तो पूर्णपणे थांबला होता. गेल्या वर्षापासून बालरंगभूमीला ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकामुळे पुन्हा संजीवनी प्राप्त झालेली आहे.

मतकरींच्या या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर याने केलेले आहे. या नाटकाने फक्त बालप्रेक्षकच मिळवला नाही, तर बालरंगभूमीच्या इतिहासात नोंद घ्यावी असे विक्रम केलेले आहेत. अर्थात झी मराठी यात सहभागी झाल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे, हे नाकारता येणार नाही. अजूनही या नाटकाची लोकप्रियता कायम आहे. अशा स्थितीत मतकरी लिखित, चिन्मय दिग्दर्शित ‘निम्माशिम्मा राक्षस’ हे नाटक रंगमंचावर येत असल्याची नाट्यवर्तुळात कुणकुण आहे. अर्थात राहुल भंडारे या नाटकाची निर्मिती करीत असल्याचेही ऐकायला मिळते. ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात सेलिब्रिटी स्टार म्हणून वैभव मांगलेचा मुख्य भूमिकेत सहभाग आहे. याही नाटकात सेलिब्रिटी कलाकारांना घेण्याचे ठरते आहे. तूर्तास सेलिब्रिटी पण मुख्य कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवलेली आहेत. ज्यांनी अलबत्या गलबत्या पाहिले त्यांच्यासाठी निम्माशिम्मा राक्षससुद्धा प्रेक्षणीय असणार हे वेगळे सांगायला नको.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -