Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग राखी सावंतवर यशराजचं भन्नाट रॅप साँग

राखी सावंतवर यशराजचं भन्नाट रॅप साँग

यशराजचा हा व्हिडिओ कलर्स टिव्हिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री राखी सावंत सध्या बिग बॉस १४ मुळे चांगलीच चर्चत आली आहे. रोज नवीन गोष्टी करून ती बिग बॉसमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. राखीच्या मस्तीखोर स्वभावामुळे तिच्या चाहत्यांना ती नेहमी हसवत असते. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये राखी सावंतची बॉटल अर्शी खानने स्विमिंग पूलमध्ये फेकून दिली. बाटली फेकल्यामुळे रागावलेली राखी अर्शीला खूप काही बोलते. या एपिसोडमधील काही डायलॉग घेऊन राखी सावंतवर एक रॅप साँग तयार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी रसोडे में कौन था या कोकिला बेन आणि राशीच्या डायलॉगवर म्युझिक देऊन सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्या यशराज मुखातेने आता राखी सावंतवर एक भन्नाट रॅप साँग बनवले आहे.

बिग बॉसच्या एपिसोडमधून राखी सावंतचा ‘सांडनी थी’ हा डायलॉग घेऊन यशराजने त्यावर म्युझिक कंपोज केले आहे. या व्हिडिओमध्ये राखीची स्विमिंगपूलमध्ये टाकल्याची तक्रार ती बिग बॉसकडे करताना दिसत आहे. ‘जिसने मेरी इस बोतल को स्विमिंग पूल में फेका, बिग बॉस प्लिज आप सारे टेप रिवाइंड करो और चेक करो’ असा हा राखीचा डायलॉग घेऊन यशराजने रॅप साँग तयार केले आहे. यशराजचा हा व्हिडिओ कलर्स टिव्हिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -


या व्हिडिओमध्ये राखी सावंत अर्शी खानवर चांगलाच निषाणा साधताना दिसत आहे. यशराजने केलेल्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ‘रसोडे में कौन था?’ नंतर राखी सावंतचा व्हिडिओही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील ‘रसोडे मे कौन था?’ हा राशी आणि कोकिला बेन चा डायलॉग यशराजच्या म्युझिमुळे प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचप्रमाणे या आधी यशराजने ‘त्वडा कुत्ता टॉमी’ या शहनाज गिलच्या डायलॉगवर जबरदस्त म्युझिक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओचे बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी कौतुक केले होते. त्यानंतर आता राखी सावंतचा ‘सांडनी थी’ हा व्हिडिओही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.


हेही वाचा – जबरदस्त एक्शन सीन्सचा ‘द पावर’ पॅक्ड् ट्रेलर लाँच

- Advertisement -

 

- Advertisement -