Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील 'नायरा'च्या मृत्यूने शिवांगी जोशीला कोसळले रडू

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील ‘नायरा’च्या मृत्यूने शिवांगी जोशीला कोसळले रडू

मालिकेत पाहायला मिळतायतं नवे चढउतार

Related Story

- Advertisement -

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेने अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यामुळे या मालिकेत सर्वच पात्र आता प्रेक्षकांना ठावूक झाली आहेत. घराघरात पोहचलेल्या या मालिकेत आता नवनवीन चढउतार पाहिला मिळत आहेत. यातच ‘नायरा’ या पात्राचा अचानक झालेल्या मृत्यूने चाहत्यांना नवा धक्का मिळणार आहे. नुकतेच याचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये ‘नायरा’ या पात्राचा अपघातामध्ये मृत्यू होतो असे दाखवण्यात आला आहे. परंतू या पात्र्याच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे अभिनेत्री शिवांगी जोशीला रडू कोसळले आहे. या मालिकेत शिवांगी जोशी ‘नायरा’हे पात्र साकारत आहे.

याविषयी बोलताना शिवांगी सांगते, माझ्या पहिल्या रिएक्शनबद्दल सेटवर साऱ्यांनाच माहित होते, मला मृत्यूच्या सिक्वेंसविषयी सांगितले जात होते त्यावेळी माझ्यासोबत मोहसिन उपस्थित होता. ज्यावेळी मला हा सिक्वेंस सांगण्यात आला त्यावेळी मला अचानकचं रडू कोसळले. मी अश्रूंसह भावनांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु मी ते करु शकले नाही. राजन सरांनी मला विचारले तू का रडतेयसं? त्यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हते. मला खूप रडू येत होतं. यावेळी मोहसिनसुद्धा मालिकेतील सिक्वेंस ऐकून अधिक भावनाशील झाला होता. शिवानी पुढे सांगते, या मालिकेचा पुढचा टप्पा अधिकच लक्षवेधी असणार आहे.  या पात्राच्या अचानक एक्झिटमुळे मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यातच आता ‘नायरा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी मालिका सोडून जातेयं अशा चर्चा रंगू लागल्या आहे. त्यामुळे शिवांगी जोशी मालिकेत पून्हा दिसणार की नाही हे येत्या काही दिवसातच प्रेक्षकांना कळू शकणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -