Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात होणार युट्यूबर कॅरी मिनाटीची एंट्री?

carry minati

छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिका-शोपैकी सर्वात चर्चेतला शो बिग बॉसच्या १४ व्या (Bigg Boss 14 ) सीझनची घोषणा झाली आहे. येत्या ३ ऑक्टोबरपासून बीग बॉस १४ व्या सीझनची सुरुवात होणार आहे. मात्र, या सीझनमध्ये कोण कोण असणार आहे, याची चर्चा सुरु आहे. स्पर्धकांच्या नावांबाबत चर्चा सुरु असून अंतिम यादी अद्याप येणं बाकी आहे. यावेळी प्रसिद्ध यूट्यूबर कॅरी मिनाटी म्हणजेच अजय नगर देखील बीग बॉसमध्ये भाग घेणार असल्याची चर्चा आहे.

वृत्तानुसार कॅरी मिनाटी सध्या मुंबईत असून तो क्वारंटाइनमध्ये आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यावर शोमध्ये सामील होऊ शकतो. तथापि, कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावेळी स्पर्धकांना क्वारंटाइन केलं जाणार आहे. २० सप्टेंबरपासून क्वारंटाइनचा कालावधी सुरु होणार आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये शुटींग सुरू होणार आहे आणि ३ ऑक्टोबरपासून बिग बॉस प्रसारित होणार आहे. कॅरी मिनाटी सोबत जॅस्मिन भासीन, पवित्रा पूनिया, सारा गुरपाल, नैना सिंग, निशांत निलकानी अशा सेलेबल्सची नावेही समोर येत आहेत. यावेळी, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.


हेही वाचा – चीनची १६०० भारतीय कंपन्यांमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक; केंद्राची माहिती