Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नेहा कक्करला यूट्यूबचा 'डायमंड अवॉर्ड'

नेहा कक्करला यूट्यूबचा ‘डायमंड अवॉर्ड’

भारतात डायमंड अवॉर्ड मिळवणारी नेहा पहिली भारतीय गायिका आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री नेहा कक्कर चांगलीच चर्चेत आहे. तिच्या लग्नामुळे ती चांगलीच ट्रोलही झाली होती. नेहाची सिंगिंगमधील कारकिर्द नक्कीच कौतुकास्पद आहे. इंडियन आयडल या रिअलिटी शोमध्ये नेहाने परिक्षक म्हणून भूमिका पार पाडली. बॉलिवूडची टॉपची गायिका नेहाला युट्यूबकडून ‘डायमंड अवॉर्ड’ देण्यात आला आहे. भारतात डायमंड अवॉर्ड मिळवणारी नेहा पहिली भारतीय गायिका आहे. नेहाने सोशल मीडियावर तिला मिळालेल्या अवॉर्डची माहिती दिली आहे. नेहाने ही बातमी सांगत आनंद व्यक्त केला आहे. तिचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.

- Advertisement -

नेहा ही पहिली भारतीय गायिका ठरली आहे जिला हा मानचा युट्यूब डायमंड पुरस्कार मिळाला आहे. ‘माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व घडले नसते’, असे नेहाने म्हणाली आहे. आई, बाबा, टोनी भाई, सोनू दीदी आणि तिच्या चाहत्यांचे तिने आभार मानले आहे. त्याचबरोबर युट्यूब इंडियाचेही नेहाने आभार मानले आहेत. तुमच्या शिवाय मी हे करू शकली नसती असे नेहाने सांगितले आहे.

नेहाला मिळालेल्या डायमंड अवॉर्डचे सोशल मीडियावर सगळेच कौतुक करत आहेत. नेहाचा नवरा रोहनप्रितनेही नेहाचं तोंडभरून कौतुक केले आहे. त्याचबरोबर अवनीत कौर, गौहर खान अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नेहाचे अभिनंदन केले आहे. नेहाच्या चाहत्यांनी तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखिल दिल्या आहेत. २०२०मध्ये नेहाने रोहनप्रित सिंहसोबत लग्न केले. नेहाने लग्नात केलेल्या पेहरावामुळे नेहाला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते. तिच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या. नेहा आणि रोहनप्रितच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

- Advertisement -