घरमनोरंजनकास्टिंग काऊचला दोनदा बळी पडली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

कास्टिंग काऊचला दोनदा बळी पडली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नंतर झरीन खानने कास्टिंग काऊच संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे.

गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी मीटू चळवळीच्या माध्यमातून आणि कास्टिंग काऊच संबंधित खुलासा केला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री झरीन खाननेही कास्टिंग काऊच संबंधात एक मोठा खुलासा केला आहे. याबरोबर झरीनने इंडस्ट्रीत तिच्या सोबत घडलेल्या घटना देखील सांगितल्या आहेत. अलीकडेच झरीन खानने पिंकविलाला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत झरीन म्हणाली की, ‘या बॉलिवूड इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच सारख्या घटनेची ती एकदाच नव्हे तर दोनदा बळी पडली आहे.’

View this post on Instagram

????? #HappySunday #ZareenKhan

A post shared by Zareen Khan ??✨?? (@zareenkhan) on

- Advertisement -

कास्टिंग काऊचशी संबंधित भयानक अनुभवाबद्दल झरीनने पुढे असं सांगितलं की, ‘एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तिच्या सोबत किसिंग सीनचा रिहर्सल करण्याची इच्छा होती.’ याबद्दल ते म्हणाले की, ‘तुम्हाला तुमचा संकोच दूर करावा लागेल, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आलेल्या अडथळ्यांना दूर करावे लागेल. त्यावेळेस मी या क्षेत्रात नवीन होते आणि तेव्हा मला दिग्दर्शकाने माझ्यासोबत किसिंग सीनच्या रिहर्सलबद्दल बोलले.’ याबद्दल झरीन खान म्हणाली की, ‘दिग्दर्शकाच्या या बोलण्यावर माझी प्रतिक्रीया ‘काय?’ अशी होती. मी रिहर्सल म्हणून कोणतेही किसिंग सीन करणार नाही.’

View this post on Instagram

? #NoirEtBlanc #ZareenKhan

A post shared by Zareen Khan ??✨?? (@zareenkhan) on

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने कास्टिंग काऊच संबंधित अजून एक किस्सा सांगितला. झरीने असं सांगितलं की, ‘इंडस्ट्रीमधील एका व्यक्तीने सांगितले की, जर आपल्याला मैत्री पलीकडे संबंध ठेवण्यास आवड असेल तर तो आपल्या आगामी प्राजेक्टमध्ये माझी मदत करेल.’

काही दिवसांपूर्वी विद्या बालनने देखील कास्टिंग काऊच संबंधितला अनुभव सांगितला होता. लवकरच झरीन खान ‘डाका’ या पंजाबी चित्रपटामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचाकास्टिंग काऊचविषयी विद्या बालनने केला मोठा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -