घरमनोरंजन'झिरो'च्या पोस्टरवर नायिकांचा अनोखा अंदाज

‘झिरो’च्या पोस्टरवर नायिकांचा अनोखा अंदाज

Subscribe

रेड चिली इंटरटेन्मेंट प्रस्तुत 'झिरो' हा सिनेमा २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे. वर्षाअखेरीस शाहरुख त्याच्या फॅन्ससाठी हा सिनेमा घेऊन येत आहे. २०१७ साली त्याचा 'रईस' हा सिनेमा आला होता. त्यानंतर शाहरुख 'झिरो' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘झिरो’ कधी रिलीज होणार अशी उत्सुकता त्याच्या फॅन्समध्ये आहे. ४ महिन्यांपूर्वी ईदच्या दिवशी झिरोचे टीझर रिलीज झाल्यानंतर या सिनेमातील शाहरुखचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. पण आता सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर त्यावरील नायिकांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुख खानने काहीच तासांपूर्वी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.

पाहा- ‘झिरो’मधून झळकणार दोन ‘हिरो’, टीझर लाँच

काय आहे पोस्टरमध्ये?

झिरोमध्ये शाहरुख एका कमी उंचीच्या माणसाची भूमिका साकारत आहे. त्याने दोन पोस्टर शेअर केले असून एका पोस्टरमध्ये अनुष्का शर्मा आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये हॉट अॅण्ड सिझलींग कतरीना कैफ तिच्या ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. अनुष्का शर्माचा लूक या सिनेमात वेगळा असणार असे देखील दिसत आहे. कारण अनुष्का एक व्हिलचेअरवर दिसत आहे. शिवाय तिचा लूकही थो’डा वेगळा आहे. अनुष्काच्या या फोटोवर ‘इस पुरी दुनिया मे मेरी बराबरी करनेवाली एकही तो है’ असे लिहिले आहे. तर दुसरीकडे लाल रंगाच्या गाऊनमध्ये कतरीना असून तिचा फोटो शेअर करत शाहरुखने ‘सितारों के ख्वाब देखनेवालो, हमने तो चाँद को करीब से देखा है’ असे लिहिले आहे.

- Advertisement -


 वाचा- ‘झिरो’ चित्रपट हीट ठरण्यासाठी सलमान करणार प्रमोशन

डिसेंबरपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा?

रेड चिली इंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘झिरो’ हा सिनेमा २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे. वर्षाअखेरीस शाहरुख त्याच्या फॅन्ससाठी हा सिनेमा घेऊन येत आहे. २०१७ साली त्याचा ‘रईस’ हा सिनेमा आला होता. त्यानंतर शाहरुख झिरो सिनेमा घेऊन येणार आहे. त्यामुळेच त्याच्या फॅन्समध्ये सिनेमाची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -