घरफिचर्समाणसाला माणूस बनवते ती कला !

माणसाला माणूस बनवते ती कला !

Subscribe

माझ्यातील व्यक्तिमत्वाला निर्माण करण्यासाठी या प्रक्रियेतील नाटकाने माझ्यातील माणुसकीचे मूल्य जागृत केले. कलाकार तर कधीही होता येऊ शकते; पण एक चांगला माणूस निर्माण होणे, हे मला महत्त्वाचे वाटू लागले. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये असणारी नाटके ही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करतात. खरं तर ह्या नाटकांच्या प्रक्रियेत असताना मला जाणीव होऊ लागली माझ्यातील नीती मूल्यांची तसेच नाटक “गर्भ” , ” अनहद नाद – अनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स ” , “राजगती” या क्लासिक नाटकांमुळे माझ्यातील ‘कलाकार’ प्रगल्भ झाला, त्याचबरोबर मला सामाजिक भूमिकेची जाणीव या नाटकांनी करून दिली.

“माणसाला माणूस बनवते ती कला” हा बोध “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांत माणसामध्ये निर्माण करतो. माझ्या आत एक माणूस आहे, नक्की हा माणूस प्रत्येकात जिवंत असतो का ? की फक्त चालतो, बोलतो आणि अंधाधुंद जीवन जगतो? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. कारण, सर्वसामान्य जीवन तर प्राणीही जगतात. मग माझ्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे, हाही प्रश्न त्यानंतर निर्माण होतो. त्याच्यासाठी उत्तर आहे की “हो, मी माणूस आहे कारण, मी विचार करतो. विचार करणं हे मला प्राण्यापेक्षा वेगळं करते. ही माणूस असण्याची ओळख आहे”. इथे व्यक्तिगत अनुभवात लक्षात येते की, जन्माला आल्यापासूनच चेतना, संवेदना, जाणिवा त्या बालवयातच जागृत होतात. पण संस्कार व संस्कृतीच्या नावाखाली समाज मला ‘माणसाचा’ “मर्द (पुरुष)” करीत होता, पुरुषार्थाच्या नावाखाली संवेदनहीन होऊन जगण्यास सांगत होता.

- Advertisement -

सर्वसामान्यपणे बहुतांश पुरुषांबरोबर हे घडते. कारण, समाज सांगतो ” मर्द को दर्द नहीं होता”. व्यसनाधीन म्हणजे मर्द, ताकदवान असून इतरांचे शोषण करणारा म्हणजे मर्द .. मुलगी म्हणजे एक वस्तू आहे, हा पितृसत्ताक विचार पुढे नेणारा म्हणजे मर्द. स्त्री ही आपल्यासारखीच एक माणूस आहे, ही जाणीव फार कमी जणांना असते. जसा मला जगण्याचा, वागण्याचा, वावरण्याचा अधिकार आहे तसा तो स्त्रियांना ही आहे.. आजच्या समाजातील पुरुषांत ही संवेदनशीलता असणे अत्यंत आवश्यक आहे. हे मी सांगतोय ह्याचा अर्थ मी दुसर्‍या कोणाबद्दल बोलत नाही, मी स्वतःबद्दल बोलत आहे. अशीच माझीदेखील मानसिकता होती. माझ्यामध्ये असणारी ही पितृसत्ताक मानसिकता बदलण्यासाठी मला मार्ग दाखवला “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य तत्वज्ञानाने आणि मला माझ्या वागण्याची जाणीव करून दिली की, नक्की मी वागतोय तो कसा वागतोय? या प्रक्रियेतून जाणीव निर्माण होऊ लागली. जाणीव निर्माण होताना माझ्या आत माणूस जन्म घेऊ लागला आणि माणुसकी निर्माण होऊ लागली.

माझ्यातील व्यक्तिमत्वाला निर्माण करण्यासाठी या प्रक्रियेतील नाटकाने माझ्यातील माणुसकीचे मूल्य जागृत केले. कलाकार तर कधीही होता येऊ शकते, पण एक चांगला माणूस निर्माण होणे, हे मला महत्त्वाचे वाटू लागले. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये असणारी नाटके ही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करतात. खरं तर ह्या नाटकांच्या प्रक्रियेत असताना मला जाणीव होऊ लागली माझ्यातील नीती मूल्यांची तसेच नाटक “गर्भ” , ” अनहद नाद – अनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स ” , “राजगती” या क्लासिक नाटकांमुळे माझ्यातील ‘कलाकार’ प्रगल्भ झाला, त्याचबरोबर मला सामाजिक भूमिकेची जाणीव या नाटकांनी करून दिली. कला आणि कलाकार वस्तू नाही याची जाणीव करून देणारे नाटक – “अनहद नाद” , माझ्यातील माणसाचा शोध घेणारे नाटक ” गर्भ” रंगचिंतक मंजुल भारद्वाज ह्यांनी लिहिलेल्या या नाटकांनी माझ्यातील न्यूनगंड नष्ट करून, मला एक सक्षम व्यक्ती म्हणून माझ्या जीवनात उभे केले.

- Advertisement -

“थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांत हे एकमेव तत्व आहे जे मनोरंजनाची भिंत तोडून परिवर्तनाची दिशा देत आहे आणि ते परिवर्तन मी माझ्या आत अनुभवत आहे. माझ्या सह-कलाकारांनी थिएटर ऑफ रेलेवन्स रंग प्रशिक्षण पद्धतीद्वारे मला रंगमंचावर उभे राहण्यास खूप मदत केली.

नाट्य प्रक्रियेत आल्यापासून माझी ‘दृष्टी’ बदलून गेली. व्यक्तीकडे पाहत असताना मी एका माणसाच्या नजरेतून पाहू लागलो. रंगमंचावर उभं राहण्यापासून प्रवेश घेईपर्यंत रंगप्रशिक्षणामध्ये माझ्या सहकलाकारांनी मला मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामध्ये, रंगकर्मी अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर आणि कोमल खामकर यांचा समावेश आहे.
रंग प्रशिक्षणाच्या माध्यमाने लिहणे वाचणे, समूहात वारंवार होणार्‍या तात्विक, वैचारिक चर्चा यामुळे विचारांची बैठक निर्माण झाली. माझ्या आयुष्यात कोणत्याही नाटकात मी कधीही काम केले नव्हते. त्यामुळे माझं बोलणं, वागणं, रंगमंचावर सहज होत नव्हतं. म्हणजे बोलायला काहीच हरकत नाही शून्यापासून माझी सुरुवात झाली. त्यामध्ये, सातत्य, शिकण्याचा भाव, जिद्द ठेवून मला हे करायचं आहे ह्या उद्देशाने, मी ते समजून घेत होतो, थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींची विशेषता म्हणजे ” कधीही हा भाव निर्माण होत नाही की, ह्याला तर काहीच येत नाही, मी का सांगू ” त्या ठिकाणी समजूतदारपणा आणि शिकवण्याचा भाव होता. त्यातून, माझ्यात होणार्‍या छोट्या छोट्या बदलांना त्यांनी स्वीकारले आणि रंगमंचावर मी उभा राहिलो.

नाटकाच्या प्रक्रियेमुळे माझ्या घर परिवारात ही परिवर्तन झाले.
हो खरं आहे, नाटकामध्ये असणारे संवाद आणि माझी भूमिका, नाटकातील विचार यामुळे जाणीव झाली. माझ्या भूमिकेची! जसं, घरातील काम हे फक्त महिलेचे, हे आतापर्यंत आपण पाहत आलोय, अनुभवत आलोय. पण, घरामध्ये एक पुरुष म्हणून मीदेखील काम करू शकतो, हा दृष्टीकोन नाटकाने दिला. सामाजिक स्तरावर स्त्री पुरुषांमध्ये आजही कामाच्या आधारे भेदभाव होत आहेत. घरात काम करणारी महिला मोफत काम करते. पण, ज्यावेळी पैशाची गोष्ट येते त्यावेळी, पुरुष बाहेेर जाऊन तेच काम करतो आणि त्याचा मोबदला घेतो. उदा. ज्यावेळी घरात महिला जेवणाचं काम करते त्यावेळी, तिचा संबंध कर्तव्य, परंपरा अशा बाबींंशी लावला जातो.

पण जेव्हा हेच काम पुरुष बाहेर हॉटेलमध्ये जाऊन करतो त्यावेळी तो पैसे घेतो. तिकडेच गोष्ट थांबत नाही पण, ज्यावेळी तोच पुरुष घरी येतो, घरात काम करायची वेळ येते, त्यावेळी त्याला लाज वाटते, असं का होतं? नाटक “संवाद एक पहल” मध्ये असणारी वैचारिक दृश्य रचना माझ्यातील कामाबद्दल असणार्‍या न्यूनगंडाला बाहेर काढून त्या ठिकाणी मला माझ्या वागण्याची जाणीव करून देत होती. त्यानंतर माझ्या घरामधील कामाबद्दल असणारा भेद मी संपवला. मला जाणीव आहे की हे माझं घर आहे त्यामुळे, मला माझ्या घराची निर्मिती एक समान तत्वाने करायची आहे. त्यानुसार, मी माझ्यामध्ये बदल करून माझ्या घरात असणार्‍या सकारात्मकतेला अनुभवत आहे. माझे हे आपणास आवाहन आहे की, स्त्री-पुरुष म्हणून नाही तर “माणूस” म्हणून जगूया !

-रंगकर्मी
-तुषार म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -