घरफिचर्सनिसर्गरम्य भंडारदरा

निसर्गरम्य भंडारदरा

Subscribe

पावसाळा सुरू झाला की निसर्ग प्रेमींना वर्षासहलीचे वेध लागतात. वर्षा सहलीसाठी महाराष्ट्रात अनेक पर्याय आहेत. 'भंडारदरा' हा पर्याय देखील निसर्ग प्रेमींनी एकदा नक्की अनुभवायला हवा.

– प्रविण वाकचौरे

भंडादरा (शेंडी) अहमदनगरच्या अकोले तालुक्यात प्रवरा नदीकाठी वसलेलं एक छोटसं गाव. या गावात सोयीसुविधांची कमतरता असली तरी निसर्गाने या गावाला भरभरुन दिलं आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या याठिकाणी अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवळ, शुद्ध हवा आहे. भंडारदरा धरण या निसर्ग सौदर्यात आणखी भर टाकतं. मुसळधार पावसामुळे सध्या भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. फेसाळत वाहणारे धबधबे आणि निसर्गानं पांगरलेली हिरवी चादर, जमिनीवर आलेले पांढरे ढग, उंच-उंच डोंगर पाहायचे असतील तर तुम्ही भंडारदऱ्याला नक्की भेट द्या.

- Advertisement -

भंडादऱ्याजवळची पर्यटन स्थळे

विल्सन डॅम
भंडारदरा धरणाचं मूळ नाव विल्सन डॅम आहे. प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. धरणाच्या भिंतीवरून वाहणारं पांढरं शुभ्र फेसाळलेलं पाणी पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक याठिकाणी मोठी गर्द करतात. धरणाच्या भिंतीवरून डोळ्यांच्या नजरेत न मावणारा पाण्याचा कृत्रित स्त्रोत पाहण्याचा अनुभव काही वेगळाच आहे.

रंधा फॉल
भंडारदरापासून काही किमीवर रंधा या गावात प्रसिद्ध रंधा फॉल (धबधबा) आहे. या धबधब्याची भूरळ अनेक सिनेमा निर्णात्यांनाही पडली. काही सिनेमांचं शुटिंग या ठिकाणी झालं आहे. विशाल रंधा फॉल पाहण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. सपाट भागाच्या एका टोकावरून समोर धो-धो कोसळणारा धबधबा आणि धबधब्याच्या पाण्याचे अंगावर येणारे फवारे, हा अनुभव थरारक आहे.

- Advertisement -

अम्ब्रेला फॉल
विल्सन डॅमवरच छत्रीसारख्या आकाराचा धबधबा आहे. त्यांच्या आकारामुळे या धबधब्याला ‘अम्ब्रेला फॉल’ म्हणतात. पावसाऱ्यात खूप लांबवरूवनही अम्ब्रेला फॉल पाहता येतो. पावसाऱ्यातचं हे नयनरम्य दृष्य दिसत असल्याने ही संधी पर्यटक सोडत नाहीत.

कळसूबाई शिखर
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई याच परिसरात आहे. कळसूबाई शिखरावर कळसूबाईचं देऊळ आहे. पावसाळ्यात महाराष्ट्रातील उंच शिखर सर करण्याचा थरारक अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. शिखर सर केल्यानंतर दिसणारं परिसराचे दृश्य मनमोहक असतं.

भंडारदऱ्याला कसं जाता येईल?
मुंबई-भंडारदरा हे अंतर जवळपास १६५ किमी तर पुण्याहून हे अंतर १७२ किमी आहे. मुंबईहून तुम्ही मुंबई-आग्रा हायवेवरून येऊ शकता किंवा कसारा रेल्वे स्टेशनपर्यंत लोकलने येता येईल. तेथून खासगी गाड्या उपलब्ध असतात. याशिवाय इगतपुरी हे रेल्वे स्टेशनवरून भंडारदरा अवघ्या २८ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पुणे-मुंबईहून येणाऱ्यांसाठी हा पर्यायही उपलब्ध आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -