घरफिचर्सएक महिना फुलपाखरांचा

एक महिना फुलपाखरांचा

Subscribe

फुलपाखरू हा जीवसृष्टीमधील अत्यंत मोलाचा घटक आहे. परागीभवन प्रक्रियेत फुलपाखरांची भूमिका इतकी महत्वपूर्ण असते की एका अभ्यासकाने, जेवणाचा प्रत्येक घास घेताना आपण फुलपाखरांचे आभार मानायला हवे असे म्हटले आहे. जीवन जाळ्यातील अनेक घटकांचे अन्न म्हणून फुलपाखरू मोलाचे आहेच. म्हणजे फुलपाखरू जगुन आणि मरूनही या सृष्टीला आपले योगदान देत असते. शिवाय दिसायला सुंदर. त्याचं भिरभिरनं इतकं मोहक असते की सहज आपला थकवा दूर होऊ शकतो. अशा महत्वपूर्ण घटकाबद्दल सामान्य लोकांमध्ये माहितीचा अभाव दिसतो. म्हणूनच पन्नासहून अधिक संस्थांनी मिळून सप्टेंबर हा महिना, बिग बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा करण्याचा निश्चय केला आहे.

पहिल्यांदाच भारतात देशपातळीवर फुलपाखरू माहिना साजरा करण्यात येत आहे. फुलपाखरू विषयातील तज्ञ, फुलपाखरांचे उत्साही अभ्यासक तसेच जैवविविधता संवर्धनक्षेत्रात काम करणार्‍या पन्नासहून अधिक संस्थांनी मिळून सप्टेंबर हा महिना, बिग बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा करण्याचा निश्चय केला आहे.

गेल्या तीन वर्षापासून दिल्लीमध्ये बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीच्या ‘कन्झर्व्हेशन एज्युकेशन सेंटर’तर्फे फुलपाखरांबद्दल जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. लॉकडाऊनमुळे लोकांना एकत्र येणे शक्य होणार नाही. मग काय करायचं. सगळ्या क्षेत्रात जसं ऑनलाईन माध्यमांचा वापर केला जातोय तसं काही करता येऊ शकते का? ऑनलाईनच करायचं तर मग फक्त दिल्लीपुरतेच मर्यादित का ठेवायचं. भारतभरातील लोकांसाठी ते खुले का ठेवू नये? अशा चर्चेतून देशभरात राबविण्यासाठीचा ‘बिग बटरफ्लाय मन्थ’ हा कार्यक्रम तयार झाला.

- Advertisement -

रंगीबेरंगी, मोहक, आकर्षक, भिरभिरणारी फुलपाखरे कुणाला आवडत नाहीत बरे? सहज रस्त्याच्या कडेने चालताना क्षणभर थांबून खिळवून ठेवणारी सुंदर फुलपाखरं निसर्गातील महत्वपूर्ण जैवविविधता घटक आहे. पक्षानंतर सर्वात रंगीबेरंगी असणारा असणारी फुलपाखरे सर्वांनाच आपल्या आजूबाजूला असावं वाटणार ना. असं असलं तरी फुलपाखराबद्दल मूठभर अभ्यासक सोडले तर सामान्यातील माहिती अगदीच अल्प आहे. चार वर्षापूर्वी महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पात विद्यार्थी आणि शिक्षकांना, त्यांना माहिती असलेल्या फुलपाखरांची नावे लिहायला सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या सर्व भौगोलिक प्रदेशातील शिक्षक आणि विद्यार्थी त्यापैकी सत्तर टक्के लोकांना फुलपाखरांची नावे माहिती नव्हती. अठ्ठावीस टक्के लोकांना पाचपर्यंत नावे माहिती होती. उरलेल्या दोन टक्के लोकांना पाच ते दहा नावे माहिती होती. ज्यांना दहा नावे माहिती आहेत असे कोण लोक आहेत याचा तपास केल्यावर कळलं की हे विद्यार्थी, शिक्षक ज्या शाळेतून आले आहेत, तिथे जैवविविधता क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू उद्यान केलं आहे. त्यातून त्यांना फुलपाखरांची नावं, त्यांना आवडणारी वनस्पती, त्यांचे जीवनचक्र यांची माहिती झाली होती.

फुलपाखरू हा जीवसृष्टीमधील अत्यंत मोलाचा घटक आहे. परागीभवन प्रक्रियेत फुलपाखरांची भूमिका इतकी महत्वपूर्ण असते की एका अभ्यासकाने, जेवणाचा प्रत्येक घास घेताना आपण फुलपाखरांचे आभार मानायला हवे असे म्हटले आहे. जीवन जाळ्यातील अनेक घटकांचे अन्न म्हणून फुलपाखरू मोलाचे आहेच. म्हणजे फुलपाखरू जगुन आणि मरूनही या सृष्टीला आपले योगदान देत असते. शिवाय दिसायला सुंदर. त्याचं भिरभिरनं इतकं मोहक असते की सहज आपला थकवा दूर होऊ शकतो. अशा महत्वपूर्ण घटकाबद्दल सामान्य लोकांमध्ये माहितीचा अभाव दिसतो. औपचारिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात देखील जुजबी माहितीपलीकडे काही उपलब्ध नाही.

- Advertisement -

फुलपाखरू हा निसर्गातील असा घटक आहे, जो भारतातील कोणत्याही गावात, कुठेही सहज आढळतो. त्याला पाहण्यासाठी काही विशेष जंगल सफारी करावी लागत नाही. किमान चार ते पाच प्रकराची फुलपाखरे सहज आपल्या आजूबाजूला पाहता येऊ शकतात. मग अशा महत्वपूर्ण आणि इतक्या संख्येत असलेल्या घटकाबद्दल औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये अनेक कृती उपक्रम सहज देता येऊ शकतात. फुलपाखरांचे मोजमाप करणे हा एक रंजक उपक्रम होऊ शकतो. शिवाय अशा उपक्रमातून विद्यार्थी फुलपाखरांच्या जीवन जाळे आणि त्याचे जैवविविधतेतील महत्व समजून घेण्याबरोबरच, गणिती क्षमतांचा विकास होऊ शकतो. रेषा पद्धत, बिंदू पद्धत, चौरस पद्धत ह्या वैज्ञानिक पद्धतींचाही परिचय होऊ शकतो.

वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती एकत्र येऊन हा जो पुढाकार घेतला आहे, तो अतिशय उपयुक्त आहे. शक्य त्या सर्व लोकांनी ह्यामध्ये सहभाग घ्यावा. आपले उपक्रम इतरांना कळवावे, इतरांचे उपक्रम, निरीक्षण, नोंदी आपण समजून घ्यावे. यातून लोक विज्ञानाच्या माहितीचा एकत्र कोश तयार होऊ शकेल. फुलपाखरू महिन्याबद्दल थोडक्यात समजून घेऊया.

फुलपाखरू विषयाला घेऊन विविध स्पर्धांचे आयोजन:

फुलपाखरू विषयाला घेऊन चित्र, रेखाचित्र; लेखन- कथा, कविता, कॉकिक्स ई.; व्हिडीओग्राफी; फोटोग्राफी इत्यादी साहित्य पाठवू शकता. हे आपले साहित्य अपलोड कण्यासाठी लोक विज्ञानाचे (सिटीझन साइन्स) संकलन करणार्‍या तीन संकेतस्थळांचा वापर करू शकता. त्यामध्ये ‘आय नॅचुरलिस्ट’(https://www.inaturalist.org/), ‘इंडिया बायोडायव्हरसिटी पोर्टल’(https://indiabiodiversity.org/), ‘आय फाउंड बटरफ्लाय’ (https://www.ifoundbutterflies.org/big-butterfly-month).. याशिवाय लळसर्लीीींंशीषश्रूोपींहसारळश्र.लेा ह्या इमेल आयडीवर देखील साहित्य पाठवता येईल. शिवाय या सप्टेंबर महिन्यात आपण फुलपाखराबद्दल काही उपक्रम करीत असाल, फोटो, व्हिडीओ किंवा इतर नोंदी घेत असाल तर ते आपल्या स्वतःच्या फेसबुक, इन्स्टॉग्राम, ट्विटर इत्यादी माध्यमावर पोस्ट करू शकता. पोस्ट करताना #BBMI_lifecycle हा हॅश टॅग वापरावे. आणि @butterflymonthindia याला टॅग करावे. म्हणजे आपले उपक्रम देशभरातील सर्वांना समजून घेता येतील.

30मिनिटे नोंदीसाठी:
14 ते 20 सप्टेंबर या दिवसांमध्ये फुलपाखरांच्या रेषा पद्धत वापरून फुलपाखरांची नोंद घ्यायची आहे. रेषा पद्धतीत, आपण निवडलेल्या परिसरात एका सरळ रेषेत चालत जायचे असते. चालताना डाव्या किंवा उजव्या बाजूला दिसलेल्या फुलपाखरांची नोंद करायची. किती वेगळ्या प्रकारची किती संख्येत दिसली या दोन गोष्टी नोंदवणे म्हत्वाचे आहे. या शिवाय ते कोणत्या वनस्पतीवर बसले होते, काय करीत होते या गोष्टी आवडीचा भाग म्हणूनही नोंदवू शकता.

‘बटरफ्लाईज ऑफ पुणे’ हा गटदेखील महाराष्ट्रातून या कार्यक्रमाचा सहआयोजक म्हणून काम करीत आहे. दोन वर्षापूर्वीच सुरु झालेला मात्र फुलपाखरांचा अभ्यास आणि फुलपाखरांच्या जैवविविधतेतील महत्व याबद्दल लोकांमध्ये समज विकसित करणारा प्रभावी गट म्हणून पुढे येत आहे. फुलपाखरांच्या निव्वळ नोंदी करण्यापर्यंतच न थांबता ठिकठिकाणी फुलपाखरू उद्याने बनविणे, फुलपाखरांची होस्ट आणि नेक्टर प्लांट असेल्या वनस्पतींची रोपवाटिका बनवून त्यांच्या संवर्धनाचे काम हा गट करीत आहे. या गटाबद्दल तपशीलात वेगळ्या लेखात समजून घेता येईल.

अनेकदा शहरी भागात मोकळ्या जागेत, गॅलरी किंवा गच्चीत बाग करणारी मंडळी अनेकदा त्यांच्या बागेतील झाडावर, वेलीवर अळी पडतात. ही अळी आपली बाग पूर्ण खाऊन घेणार अशी चिंता अनेकांना असते. त्यातून हे लोक बाजारू औषधे आणून त्यावर फवारतात. त्यातून मित्र किडी, फुलपाखरांची निरुपद्रवी अळी मारली जाते. ही अळी ज्यांचे खाद्य आहे त्या पक्ष्यांवरही याचा परिणाम होतो. चुकीची कृती जीवनजाळ्याला कमकुवत बनवीत असते. त्यामुळे लोकांना फुलपाखरू आणि त्यांचे जीवनजाळ्यातील महत्व ह्याबद्दल जागृत करणे महत्वाचे आहे, सविता भारती, बटरफ्लाईज ऑफ पुणे गट समन्वयक.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही महत्वपूर्ण लिंक्स: फेसबुक- www.facebook.com/ButterflyMonthIndia,, इन्स्टग्राम-www.instagram.com/butterflymonthindia,, ट्विटर-www.twitter.com/BBM_Ind, युट्यूब-https://www.youtube.com/channel/UCAN6OTPsIC6MloqQ8_tW9A/ पुण्यातील फुलपाखरू महिन्याच्या उपक्रमांत सहभागी व्हायचे असेल, इतर तपशील समजून घ्यायचा असेल तर स्वानंद (96575 44280) यांच्याशी संपर्क करू शकता.

-बसवंत विठाबाई बाबाराव: (लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एजुकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -