घरफिचर्सआदित्य

आदित्य

Subscribe

दुपारी जेवण करून थकून झोप काढल्यानंतर संध्याकाळी बाळराजे आदित्य जागृत झाले. आता आईच्या मोबाईलसाठी आग्रह. मग हट्ट आणि मग भोकाड पसरण्यात आले. काही झालं तरीही मोबाईल द्यायचा नाही हा आईचा अटळ मनोनिग्रह पाहून मोबाईल आणलेलाच नाही, घरी विसरले आहे, ही आईने मारलेली थाप ओळखत बाळराजेंनी स्त्रियांसाठी खास ठेवलेल्या खोलीच्या दिशेनं प्रस्थान केलं.

आमच्या मित्राला शॉपिंगचा फार कंटाळा आहे. मग त्याची बायको मुलांना घेऊन बिचारी एकटीच बाजारात फिरून सण समारंभांसाठी कपडालत्ता घेणे त्यात वळवळ्या साखरेच्या पोत्याला सांभाळण्याची कसरत करत खरेदी आटोपण्याचे अवघड काम जिद्दीने पार पाडत असते. इथे तिथे फिरून मोठ्या हौसेने विकत घेतलेला आपला ड्रेस असा खराब झालेला पाहून छोटी सई रडवेली झाली होती. आई नक्कीच हे पाहून भडकणार आणि भावाला चांगले मोठे मोठे धम्मकलाडू मिळणार याची तिला कल्पना आलीच होती. मग त्याचे अजून जास्तीचे उद्योग आईला सांगता यावेत म्हणून ती जागची हलली नाही. तिथ्थेच थांबली.

बहिणीला पिटाळून लावल्यावर बाळराजांनी पुन्हा ‘मिशन वासरू’ हाती घेतले.
आता वासराचे तोंड नक्की कसे दिसते याची पाहणी सुरू झाली. बहिणीवर माती फेकून झाल्यावर मातीने घाण झालेले हात वासराला लागू नयेत म्हणून राजेंनी ते आपल्या नव्याकोर्‍या झब्ब्याला पुसले. मग दोन बोटं तोंडात घालून नक्की अभ्यास कुठून सुरू करावा यावर त्यांचा काही वेळ विचारमग्नतेत गेला…

- Advertisement -

मग ते वासराच्या कानापाशी आले. वासरू झोपलेलेच होते. वासराचा कान वर उचलून बघितला. व्यवस्थित मांडी घालत खाली बसून अभ्यास सुरू होता. पण तरीही नीट काही कळेना. मग आपली छोटी बोटं वासराच्या कानाच्या आत सरकवून हाती काय लागते का, याचा शोध सुरू झाला. आता मात्र वासरू दचकून चांगलेच जागे झाले आणि त्याने मान हलवायला सुरुवात केल्यावर घाबरलेल्या बाळराजाने तिथून धूम ठोकली.हे सारे चालू असताना गाय काय करत होती याचे डीटेल्स उपलब्ध नाहीत.
बहिणीने ही घटना आईला तत्परतेनं सांगितल्यावर तिचे धाबे दणाणले आणि तिने नवर्‍याला दम भरला. ‘लक्ष द्या नाहीतर आत जाऊन माझ्या जागी मदत करा.. बसलेत गप्पा हाणीत. तिथं पोरगा कुटाणे करून ठेवतोय.. आहे कुठे तुम्ही? ’ वगैरे चार तिखट शब्द सुनावल्यानं माझा मित्र जरा वरमला. त्याने आपल्या बाळाला काखोटीस मारले आणि जरा वेळ इकडे तिकडे केल्यावर पुन्हा त्याला मैदानात सोडून दिले. पुरूष किती वेळ सांभाळतात अशा वेळी?

मिशन २
..
लग्नात पाहुण्यांना पाणी पिण्यासाठी आणलेल्या पाण्याच्या जारच्या भोवती कागदी पेले रचून ठेवलेले होते. तो फारच इंटरेस्टिंग प्रकार वाटल्याने मग बाळराजे मिशन नंबर २ कार्याला लागले. पेल्यात पाणी भरून तिथल्या मातीत टाकणे आणि मग झालेल्या चिखलात बॉल मारणे, असा डी प्लॅन होता. तिथल्याच एक दोन मोठ्या दादा टाईप लोकांनी ते पाहून पुन्हा त्या कार्यात विघ्नं आणायचा वृथा प्रयत्न केल्यावर मातीने भरलेला बॉल हळूच त्यांच्या शर्टाला पुसण्याचे उद्योग झाले. हे पोरगं काही ऐकत नाही असं वाटून दादा लोकं तिथून निघून गेले. शिवाय त्यांना त्यांचे बालपण आठवले आणि याला खेळू द्यावं, आपण जास्त पिडू नये असा विचारही त्यांनी केला.
चिखलात बॉल मारण्याचा खेळ चांगलाच रंगात आला होता. एव्हाना तिथल्या दोन चार जारचा नळ पाणी घेण्यासाठी उघडून ते तसेच चालू ठेवून दिल्याने तिथल्या फरशीवर बरेच पाणी साचले होते. ते पाहून; इथे कुणी म्हातारं माणूस घसरून पडेल आणि फार कुटाणे होतील बरं बाळा, अशं करू नये, शाणा ना तू… असे चार समजुतीचे बोल सांगायला गेलेल्या दोन मोठ्या बायांच्या भरजरी नव्याकोर्‍या साड्यांवर बाळराजेंनी कागदी पेल्यात चिखल भरून उडवला. बायका पसार झाल्या.
दुपारी जेवण करून थकून झोप काढल्यानंतर संध्याकाळी बाळराजे आदित्य जागृत झाले. आता आईच्या मोबाईलसाठी आग्रह. मग हट्ट आणि मग भोकाड पसरण्यात आले. काही झालं तरीही मोबाईल द्यायचा नाही हा आईचा अटळ मनोनिग्रह पाहून मोबाईल आणलेलाच नाही घरी विसरले आहे, ही आईने मारलेली थाप ओळखत बाळराजेंनी स्त्रियांसाठी खास ठेवलेल्या खोलीच्या दिशेनं प्रस्थान केलं. सार्‍या बायकांच्या साड्या, मेकअप, पर्सच्या लग्न पसार्‍यातून त्याने आपल्या आईची पर्स बरोबर ओळखली आणि त्यातून मोबाईल काढला.
‘‘तू खोटं बोलतेस, हा मोबाईल तर आणलाय की तू इथे.. ’’
आई भडकली. बाळाच्या हातून मोबाईल हिसकावण्यात आल्यावर बाळाने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तू मोबाईल जर का मला खेळायला दिला नाही तर मी फार घाण घाण बोलीन, तुझ्या मुस्काटात मारीन अशा गोड गोड धमक्या द्यायला त्याने सुरुवात केल्यावर आई अजूनच अडून बसली. मग त्याने शेवटे शस्त्र काढले.. बाळराजेंनी आईला अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला. जर तू मला गेम खेळायला मोबाईल दिला नाहीस तर तर…. तर….. मी इथे सर्वांसमोर चड्डीच काढीन. बापरे…. हे ऐकून मला जाम हसू आलं होतं. असा होता तर माझा मित्र लहान असताना.. बाबाबाबा. अजब गजब.
मला हसताना पाहून मित्राची बायको म्हणाली, आहो हसताय काय.. हे म्हणतात की लहान असताना मीही असाच होतो म्हणे. थांबा हो मला आमच्या नव्या घरी जाऊ द्या.. या पठ्ठ्याला एका खोलीत डांबून जाम तुडवून काढणार आहे त्याचे बाबा ऑफीसला गेले की. अत्ता मला सासू सासरे त्यांच्या नातवाला जरा फटका दिला तरी ओरडतात. नव्या घरी गेलं की त्याला बघणार आहे मी चांगलीच. ती असं म्हणाली खरी पण नंतर स्वत:च बराच वेळ हसत होती. अशी मस्ती करणारी मुलं हवीत. त्याने आईपणही फार चांगलं लक्षात राहतं.

- Advertisement -

– रेणुका खोत

(लेखिका ब्लॉगर आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -