घरफिचर्सदहावीनंतर पॉलिटेक्निकचा सुयोग्य पर्याय

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा सुयोग्य पर्याय

Subscribe

प्रो. महादेव निळकंठ

दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करायचे हे प्रश्नचिन्ह कायम असते. मग त्या विद्यार्थ्याला अगदी ९० टक्के गुण असो की ४५ टक्के. तो विद्यार्थी आणि त्याचे पालक कायम संभ्रमात असतात. अशा वेळी आजुबाजूने होणारा, विविध पर्यायांचा मारा, अजूनच हैराण करून सोडतो. त्यातच गुण कमी असले तर विद्यार्थी अधिकच हवालदिल होतो. अशावेळी साधे, सोपे पण भविष्यात वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणारे अभ्यासक्रम लक्षात येत नाहीत. त्यापैकीच एक पर्याय आहे तो पॉलिटेक्निकचा. हल्ली डिप्लोमाकडे फार कमी विद्यार्थी वळतात. त्यामुळे यात सहज प्रवेश मिळू शकतो. तसेच हा अभ्यासक्रम भविष्यात संधी मिळवून देऊ शकतो.

- Advertisement -

दोन दिवसांपासून १० वी च्या गुणांच्या फुगवट्यावर चर्चा वाचतो आहे. त्याच्या दुष्परिणामांची चर्चा तेवढ्या खोलात जाऊन होताना दिसली नाही. या फुगवट्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. मात्र स्वतःच केलेली चूक असल्याने त्याची फारशी वाच्यता कोणी करत नसल्याने या समस्येची तीव्रता जाणवत नाही.

एक साधा विचार करून बघावा
ज्या महाराष्ट्रात केवळ एसएससीचे ४८०००च्या जवळपास ९० पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्यात भर सीबीएसई आणि आयसीएसई ची घातली की हा आकडा ६०००० च्या आसपास जाईल तिथे राज्याच्या MHTCET मध्ये २०० पैकी १९० च्या वर गुण घेणारे केवळ १० विद्यार्थी आणि ७५ टक्के म्हणजे १५० गुण घेणारे केवळ २८८९. म्हणजे ६०००० पैकी केवळ ५ % विद्यार्थी. आता बोला. काय करायचं या दहावीच्या गुणवत्तेचं. चकढउएढ हे हाल तर तर विचारायलाच नको.

- Advertisement -

९५% जे या प्रक्रियेत मागे पडले त्यांच्या पालकांनी दिवसाढवळ्या मेडिकल आणि IIT ची स्वप्न पाहिली होती. ती स्वप्न विकणारा कार्पोरेट कोचिंगचा बाजार तयार झाला नसता तरच नवल. ३ ते ६ लाखपर्यंत फी. मोठमोठया पानभर जाहिराती. माध्यमे काय बोलतील ? सर्वात मोठी सोन्याची अंडे देणारी कोंबडी का कापतील ? आणि भरडले जातात हे ९५ टक्के. त्यांना जर दहावीच्या निकालातच त्यांची खरी लायकी दिसली असती तर अशी स्थिती निर्माण झालीच नसती. त्यामुळे मी माझ्या व्याख्यानातून सातत्याने सांगत असतो की दहावीचे मार्क केवळ एक दिवसाचे पेढे वाटण्याचे आणि दिवसभराच्या आनंदानंतर विसरून जायचे मार्क्स आहेत.

वाईट याचेच वाटते की यात ग्रामीण भागातली मुले सर्वात जास्त भरडली जात आहेत. कारण ते काहीतरी स्वप्न घेऊन शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायला आपल्या तुटपुंज्या साधनांसह येतात आणि मोठ्या प्रमाणावर निराशा पदरी घेऊन जातात. वास्तवाचे भान सुटले की काय होते त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दहावीच्या निकालाचा फुगवटा. आता मिळतात म्हणून छान वाटते पण बारावीत कशी वाट लागते त्यावेळी त्यांना या खिरापतीची जाणीव होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

यावर उपाय

डिप्लोमा इन इंजिनिअरींग
पॉलिटेक्निक करण्याचे फायदे
१) पॉलिटेक्निक झाल्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून प्रायव्हेट व सरकारी नोकरी मिळू शकते किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो.
२) पॉलिटेक्निक केल्यानंतर इंजिनिअरींग करायचे असल्यास थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.
३) १२ वी करून इंजिनिअरींग करायचे असल्यास राष्ट्रीय स्तरावरची प्रवेश परीक्षा द्यावी लागते, परंतु पॉलिटेक्निक नंतर कुठल्याही प्रवेश परीक्षेची आवश्यकता नाही.
४) १२ वी करून इंजिनिअरींग करण्यासाठी लागणाèया खर्चाच्या तुलनेत खुपच कमी खर्च पॉलिटेक्निक करून इंजिनिअरींग करण्यासाठी लागतो, कारण १२ वी पर्यंतच्या ट्युशन क्लासेस करीता शासनातर्फे कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही.
५) १२ वी करून इंजिनिअरींग करण्यासाठी (२+४) असे ६ वर्षे लागतात तेवढाच वेळ पॉलिटेक्निक करून इंजिनिअरींग करण्यासाठी (३+३) असे ६ वर्षे लागतात. ६ वर्षांमध्ये डिग्री व डिप्लोमा दोन्ही मिळू शकतात.
६) १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर, इंजिनिअरींगला प्रवेश मिळू शकत नाही. त्यामुळे परत पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागतो, परिणामी ११ वी व १२ वी च्या शिक्षणाचा खर्च वाया जातो.
७) पॉलिटेक्निक केल्यानंतर इंजिनिअरींगचा ७० टक्के अभ्यासक्रम पॉलिटेक्निकमध्ये अभ्यासला जातो. त्यामुळे इंजिनिअरींग करणे खुपच सोपे जाते.
८) सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील उद्योग धंदयातील कंपन्यासाठी पॉलिटेक्निक व इंजिनिअरींग दोन्ही कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना भरती प्रवेश प्रक्रिया सोपी जाते.तसेच महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नामांकित कंपन्यात नोकरी ची १००% हमी असते.
९) वरील सर्व फायदे बघता १०वी नंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेणे हा अती उत्तम पर्याय आहे.

कॉलेज निवडताना काय बघावं?
१.कॉलेजची स्थापना कधी झाली?
२. शिक्षक किती अनुभवी आणि उच्चशिक्षित आहेत?
३. प्रयोगशाळांचा दर्जा.
४. अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या संधी.
५. कॉलेजचे माजी विद्यार्थी काय करतात?
६. माजी व आजी विद्यार्थ्यांचे कॉलेजबद्दलचे अभिप्राय.
७. कॉलेजचे औद्योगिक जगाताशी असलेले संबंध.
८. नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता.
दहावी पास विद्यार्थ्यांनो, वेळीच सावध व्हा. डोळे उघडून योग्य निर्णय घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -