घरफिचर्सएकांकिकांचा कोकणी थरार !

एकांकिकांचा कोकणी थरार !

Subscribe

‘रंगवाचा’च्या ताज्या अंकातील अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख वाचताना माझं मन थेट कोकणात पोहोचलं तेही कणकवली मध्ये कणकवली म्हटल्यावर आपल्याला लगेच आठवतात नारायण राणे पण आम्हा नाटकवाल्यांना, आठवते ती, बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा आयोजित करणारी संस्था वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था मनाचं पाखरू कॉलेजच्या काळात, नकळत भुर्कन गेलं.

माझ्यासमोर कणकवलीहून प्रकाशित होणारा ‘रंगवाचा’चा नवा अंक आहे. नाट्यदर्पण, भरतशास्त्र या नाट्यविषयक मासिकांनंतर रंगभूमीला वाहिलेला दर्जेदार, अभ्यासपूर्ण लेख, अत्यंत वाचनीय मजकूर, देखणा अंक म्हणून त्रैमासिक रंगवाचा स्मरणात राहतो. ताज्या अंकात रत्ना पाठक-शाह आणि नासिरुद्दीन शाह यांच्या ‘मॉटले’या संस्थेची चाळीशी, जेष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांची महाराष्ट्र शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारानिमित्त घेतलेली दुर्मिळ, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण मुलाखत वाचताना माझं मन थेट कोकणात पोहोचले… तेही कणकवलीमध्ये… कणकवली म्हटल्यावर आपल्याला लगेच आठवतात… नारायण राणे… पण आम्हा नाटकवाल्यांना, आठवते ती, बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा आयोजित करणारी संस्था.. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था.. मनाचं पाखरू कॉलेजच्या काळात, नकळत भुर्कन गेलं.

नाथ पै एकांकिका स्पर्धेत भाग घेण्यासाठी कणकवलीला जायचं आणि जीवाची बाजी लावून एकांकिका करायची आणि स्पर्धेतली सर्व बक्षीस पोतडीट भरून आणायची हे स्वप्न एकांकिका करणार्‍या प्रत्येकाची झोप उडवायचं…. माझ्या व्यक्तीगत जीवनात कणकवलीला जाऊन चषक जिंकायची संधी मिळाली नाही.. ते स्वप्न अपूर्णच राहिले वा राहील असं वाटत असतानाच स्पर्धेसाठी मला परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची संधी वामनराव पंडित यांनी दिली आणि माझ्या आयुष्याचं सार्थक झालं… माझ्या मनाची अवस्था एखाद्या तरुण कॉलेजकुमारासारखी झाली… प्रत्यक्ष कणकवलीमधल्या वसंतराव आचरेकर नाट्यगृहात पाऊल टाकलं तेव्हा मला नाटकाच्या पंढरीला, एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यासारखं वाटलं… रोमांचित झालो.

- Advertisement -

कोकणातल्या लालमातीमध्ये त्या काळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आर्थिक संकटं पाचवीला पुजलेली असताना, साधन नसताना, सोयी सवलती नसताना जिद्दीने, तळमळ, निष्ठा, ध्येय मनात ठेऊन नाट्यचळवळ उभी करून ती आजपर्यंत नेटाने, सातत्याने, न थकता, चालू ठेवणं.. खरंच कौतुक करण्यासारखं आहे, नव्हे त्याच्या पलीकडचे आहे… त्यासाठी शब्द तोकडे, अपुरे आहेत.. बिकट वाट तुडवत पुढे पुढे जायला आणि चळवळ चालू ठेऊन एका बिजाचं महावृक्षात रूपांतर करणे… खूप खूप कल्पनेपलीकडचे आहे. अनेक मान्यवर आणि नवोदित यांची या संस्थेशी नाळ जोडली गेली आहे. गेली 39वर्षे अखंडपणे या संस्थेची वाटचाल सुरू आहे. दर डिसेंबरला आयोजित करण्यात येणारी बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा, गेली 25 वर्षे सातत्याने फेब्रुवारीमध्ये पार पडणारा समांतर रंगभूमीवरील उत्तमोत्तम नाटकांचा कणकवली नाट्योत्सव तसेच गेली 19 वर्षे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला जाणारा, वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा, शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा, गायन वादन मैफिल, विविध नाट्यविषयक शिबीर, चर्चासत्र आयोजित करण्यात येतात.

त्याचप्रमाणे जवळजवळ 1500 एकांकिका संहितांची संचयिका संस्थेने उभारली आहे. या त्रैमासिकाचे नियमित नियतकालिक करण्याचा संस्थेचा मानस आहे. परंतु हे काम एका संस्थेपुरते मर्यादित न राहता सर्व रंगकर्मींचा त्यात सहभाग असावा ही संस्थेची भावना आहे. त्यामुळे आज या कामासाठी रंगकर्मींनी पालकत्व स्वीकारून अर्थसहाय्य करणे, मान्यवरांनी लिहिणे, वेळप्रसंगी जमेल ते, जमेल तसं योगदान करणे महत्वाचे ठरणार आहे. तेव्हा हे महत्वाचे काम सर्वांनी मिळून, रंगकर्मी, नाट्यरसिक यांनी पुढे येऊन करायला हवंय. कारण संस्था टिकली तर चळवळ टिकणार आहे, वाढणार आहे हेच खरं.

- Advertisement -

– अजितेम जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -