घरफिचर्सहत्ती माझ्या गावात मुक्कामाला येतात तेव्हा...

हत्ती माझ्या गावात मुक्कामाला येतात तेव्हा…

Subscribe

माणगाव तसेच निवजे येथील जंगलात सकाळी मुक्काम केल्यावर संध्याकाळ झाली की ते चार हत्ती बाहेर पडत. आमच्या बागेत ते दोनदा येऊन गेले. त्यांनी बागेतील नारळ आलेल्या मोठ्या तयार झाडांना लक्ष्य केले. ते काय करत : आपल्या मोठ्या धुडाने (कंबरेकडचा भाग) माड आधी जोरात धक्के देत हलवत, मुळे खिळखिळी झाली की मग सोंडेने माड मुळासकट बाहेर काढायचा. माड जमिनीवर आडवा झाला की नंतर जोरात पाय मारून त्या माडाचे दोन तुकडे करून आतील गर खायचा, हे त्यांचे आवडते अन्न. तसेच केळी, बांबू हे सोंडेने पायाने वाकवून एका झटक्यात पोटात ढकलण्याचा त्यांचा वेग थक्क करणारा आहे. लागती झाडे डोळ्यासमोर नाहीशी होताना जीव जळत होता. त्याचे आताही शब्दात वर्णन करता येत नाही. मुख्य म्हणजे आपल्या मुलांसारखी वाढवलेली झाडे आपल्या डोळ्यासमोर ती या जगात आता दिसणार नसल्याची भावना आणि त्या दुःखातून डोळ्यात येणारे पाणी... याची नुकसान भरपाई कशातही होऊ शकत नाही.

केरळमधील मलप्पूरम जिल्ह्याच्या सायलंट व्हॅलीमध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननसात फटाके भरून खायला दिल्यामुळे तिचा भीषण मृत्यू झाला… या बातमीने या आठवड्यात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला गेला. घटना क्रूर अशीच होती. भुकेने व्याकुळ झालेली ती गर्भवती हत्तीण जंगलाची हद्द सोडून मानवी वस्तीत आली आणि एका माणसाने पुढे केलेला अननस हत्तीणीने मोठ्या विश्वासाने तोंडात घेतला खरा, पण त्या अननसात फटाके भरले असल्याने ते तिच्या तोंडात फुटले. असह्य वेदनांनी कळवळत तिने नदीचा रस्ता धरला. प्रचंड वेदना कमी करण्यासाठी ती पाण्यात आपले तोंड बुडवून उभी राहिली आणि अखेर तिने जलसमाधी घेऊन पोटातल्या पिल्लासह प्राण सोडला. केरळमधील मोहन कृष्णन या वनाधिकार्‍याने फेसबुकवर लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे ही बातमी जगाला समजली. विशेष म्हणजे नदीत आपले डोके आणि सोंड पाण्यात बुडवून उभ्या असलेल्या या हत्तीणीला बाहेर काढून वाचवण्यासाठी वन कर्मचार्‍यांनी अन्य दोन हत्तींच्या मदतीने जोरकस प्रयत्न केले, पण ती बाहेर यायला तयार नव्हती. तिने उभ्याउभ्याच जलसमाधी घेतली… अशीच आणखी एक घटना केरळमध्येच घडली असून त्या ठिकाणीही तरुण हत्तीण आणि तिला दिलेल्या अन्नातून तिला तोंडात जखमा झाल्याने तिने प्राण सोडला…

या घटना समोर आल्या आणि लोकांनी चीड, संताप, राग आणि हळहळ व्यक्त केली. मानवी स्वभावाप्रमाणे हे सारे बरोबरच आहे, पण नवीन दुसरी घटना समोर येत नाही तोपर्यंत ही हळहळ व्यक्त होईल. पुढे सर्वजण हे विसरून जातील. दुसर्‍या घटनेवर अश्रू ढाळतील, रागारागाने व्यक्त होतील, पण पुढे काय? हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षाचे उत्तर शोधण्यासाठी कोण सोशल मीडिया सोडून मैदानावर उतरणार आहे का? कोण माय का लाल यासाठी सरकारी यंत्रणांना मदत करणार आहे? अश्रू काढणे सोपे आहे… पण शिवाजी महाराज आपल्या घरी नाही तर दुसर्‍याच्या घरी जन्माला आले पाहिजेत, त्यांच्या संघर्षाची आणि वीरश्रीची मग आम्ही गाणी गाणार… किती जबरदस्त! मी हे तुम्हाला का सांगतोय, तर मी स्वतः या हत्ती आणि माणूस या संघर्षातून गेलो आहे.

- Advertisement -

आमची बागायती शेती आहे घावनळ्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका कुडाळपासून ११ किलोमीटर अंतरावर. मी आणि माझी पत्नी विजयाने निगुतीने वाढवलेली. विजयाचे तर या बागेवर आपल्या मुलासारखे प्रेम. बाहेरगावी फिरण्यापेक्षा गावाला जाऊन माझी झाडे किती मोठी झालीत, ही तिची ओढ कोकणातील तिची मुळे लाल मातीत किती घट्ट रोवली गेलीत, हे दाखवणारी आहेत. आमच्या डोक्यात सतत या बागेचा, झाडांचा विचार. एक एक झाड मोठे होताना बघताना सृजन निर्मितीचा आनंद आम्ही कायम घेत आलेलो आहोत…

केरळमधील मलप्पूरम जिल्ह्याच्या सायलंट व्हॅलीमध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननसात फटाके भरून खायला दिल्यामुळे तिचा भीषण मृत्यू झाला… या बातमीने या आठवड्यात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला गेला. घटना क्रूर अशीच होती. भुकेने व्याकुळ झालेली ती गर्भवती हत्तीण जंगलाची हद्द सोडून मानवी वस्तीत आली आणि एका माणसाने पुढे केलेला अननस हत्तीणीने मोठ्या विश्वासाने तोंडात घेतला खरा, पण त्या अननसात फटाके भरले असल्याने ते तिच्या तोंडात फुटले. असह्य वेदनांनी कळवळत तिने नदीचा रस्ता धरला. प्रचंड वेदना कमी करण्यासाठी ती पाण्यात आपले तोंड बुडवून उभी राहिली आणि अखेर तिने जलसमाधी घेऊन पोटातल्या पिल्लासह प्राण सोडला. केरळमधील मोहन कृष्णन या वनाधिकार्‍याने फेसबुकवर लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे ही बातमी जगाला समजली. विशेष म्हणजे नदीत आपले डोके आणि सोंड पाण्यात बुडवून उभ्या असलेल्या या हत्तीणीला बाहेर काढून वाचवण्यासाठी वन कर्मचार्‍यांनी अन्य दोन हत्तींच्या मदतीने जोरकस प्रयत्न केले, पण ती बाहेर यायला तयार नव्हती. तिने उभ्याउभ्याच जलसमाधी घेतली… अशीच आणखी एक घटना केरळमध्येच घडली असून त्या ठिकाणीही तरुण हत्तीण आणि तिला दिलेल्या अन्नातून तिला तोंडात जखमा झाल्याने तिने प्राण सोडला…

- Advertisement -

या घटना समोर आल्या आणि लोकांनी चीड, संताप, राग आणि हळहळ व्यक्त केली. मानवी स्वभावाप्रमाणे हे सारे बरोबरच आहे, पण नवीन दुसरी घटना समोर येत नाही तोपर्यंत ही हळहळ व्यक्त होईल. पुढे सर्वजण हे विसरून जातील. दुसर्‍या घटनेवर अश्रू ढाळतील, रागारागाने व्यक्त होतील, पण पुढे काय? हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षाचे उत्तर शोधण्यासाठी कोण सोशल मीडिया सोडून मैदानावर उतरणार आहे का? कोण माय का लाल यासाठी सरकारी यंत्रणांना मदत करणार आहे? अश्रू काढणे सोपे आहे… पण शिवाजी महाराज आपल्या घरी नाही तर दुसर्‍याच्या घरी जन्माला आले पाहिजेत, त्यांच्या संघर्षाची आणि वीरश्रीची मग आम्ही गाणी गाणार… किती जबरदस्त! मी हे तुम्हाला का सांगतोय, तर मी स्वतः या हत्ती आणि माणूस या संघर्षातून गेलो आहे.

आमची बागायती शेती आहे घावनळ्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका कुडाळपासून ११ किलोमीटर अंतरावर. मी आणि माझी पत्नी विजयाने निगुतीने वाढवलेली. विजयाचे तर या बागेवर आपल्या मुलासारखे प्रेम. बाहेरगावी फिरण्यापेक्षा गावाला जाऊन माझी झाडे किती मोठी झालीत, ही तिची ओढ कोकणातील तिची मुळे लाल मातीत किती घट्ट रोवली गेलीत, हे दाखवणारी आहेत. आमच्या डोक्यात सतत या बागेचा, झाडांचा विचार. एक एक झाड मोठे होताना बघताना सृजन निर्मितीचा आनंद आम्ही कायम घेत आलेलो आहोत…

शेत, घर, बाग बघायला आलेल्या माणसांना ती दाखवताना आणि नारळाच्या झाडावरून ‘आडसार’ (शहाळे) देताना मन आनंदाच्या झोपाळ्यावर फिरून आल्यासारखे होते. आंबे, फणस, काजू, तांदूळ प्रेमाने भेट देताना या धरतीचे हे दान चार हातांनी वाटण्याइतके मोठे का नाही, असे वाटत असताना एके दिवशी ते आले. हत्ती आले…

कर्नाटकच्या सीमा ओलांडून सिंधुदुर्गात येत तिलारीत मुक्काम केल्यावर ते माणगावहून आमच्या परिसरात स्थिरावले. २०१२ सालची ही गोष्ट. हत्ती हा मुळातच कळपप्रिय प्राणी असल्यामुळे हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून ते २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठ्या माद्या आणि पिल्लं असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बछडे असतात, तसे अगदी लहान पिल्लेदेखील असतात. कळपाचं नेतृत्व म्हातार्‍या अनुभवी मादीकडे असतं. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघंही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असं म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. आमच्या गावात आणि माणगाव परिसरात स्थिरावलेले हत्ती हा चार तरुण हत्तींचा कळप होता. त्यापैकी एक सर्वात बलवान होता. टस्कर! त्याच्या हुकुमावर बाकीचे तीन हत्ती चालत होते. ते मदमस्त झाले होते का त्यांनी माणगाव खोरे परिसर हा आपल्या जगण्याचा भाग निश्चित केला होता, याविषयी आज खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही, पण चार एक वर्षे मुक्काम केल्यावर त्यांनी आमच्या भागात जगण्यापेक्षा मस्तीखोर जीवन जगण्यावर अधिक भर दिला.

कर्नाटकात घाणेरी व रानमोडी या वनस्पतीच्या बेसुमार वाढीमुळे हत्ती तसेच इतर तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाल्याने बंदीपूर, मदुमलाई, वायनाड, नागरहोले या वनक्षेत्रामधून हत्ती मानवी वस्तीकडे आले. सिंधुदुर्गप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड हे वनक्षेत्र व तेथील मुबलक वनसंपदा यामुळे ते आकर्षित झाले होते. तसेच अन्न, पाण्यासाठी नवीन क्षेत्र शोधणे हा हत्तीचा स्वभाव गुणधर्म असल्याने खानापूर, कनकुंभी व जांबोटीमार्गे व दोडामार्गमार्गे हत्ती महाराष्ट्रात आले. खरेतर ऑक्टोबर २००२ मध्ये हत्तींचे दोडामार्गमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा आगमन झाले. त्यानंतर त्यांची ये-जा सुरू झाली. हत्तींचे स्थलांतराचे मार्ग ठरलेले असतात, पण त्यात बदल होत गेला की ते बिथरतात व या मार्गात किंवा नजीकच्या क्षेत्रामधून माडाच्या झाडांची, केळीच्या पिकांची नासधूस करतात. तसेच आमच्या परिसराचे त्या चार हत्तींनी केले. त्यांनी खाण्यापेक्षा धुडगूस जास्त घातला. माणगाव तसेच निवजे येथील जंगलात सकाळी मुक्काम केल्यावर संध्याकाळ झाली की हे चार हत्ती बाहेर पडत. आमच्या बागेत ते दोनदा येऊन गेले. त्यांनी बागेतील फक्त नारळ आलेल्या मोठ्या तयार झाडांना लक्ष्य केले. ते काय करत : आपल्या मोठ्या धुडाने (कंबरेकडचा भाग) माड आधी जोरात धक्के देत हलवत, मुळे खिळखिळी झाली की मग सोंडेने माड मुळासकट बाहेर काढायचा. माड जमिनीवर आडवा झाला की नंतर जोरात पाय मारून त्या माडाचे दोन तुकडे करून आतील गर खायचा, हे त्यांचे आवडते अन्न. तसेच केळी, बांबू हे सोंडेने पायाने वाकवून एका झटक्यात पोटात ढकलण्याचा त्यांचा वेग थक्क करणारा आहे. भात शेतीही खाताना खाण्यापेक्षा नासाडी अधिक करण्याकडे भर. आमच्या बागेत दोनदा येऊन त्यांनी नारळांच्या झाडांचे मोठे नुकसान केले. लागलेली झाडे डोळ्यासमोर नाहीशी होताना जीव जळत होता. त्याचे आताही शब्दात वर्णन करता येत नाही. शेतकर्‍याने आपला घाम, पैसा त्यात ओतलेला असतो. मुख्य म्हणजे आपल्या मुलांसारखी वाढवलेली झाडे आपल्या डोळ्यासमोर ती या जगात आता दिसणार नसल्याची भावना आणि त्या दुःखातून डोळ्यात येणारे पाणी… याची नुकसानभरपाई कशातही होऊ शकत नाही. माणूस आणि प्राणी यांच्यातील गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झालेल्या संघर्षाचे महत्त्वाचे कारण हे एक आहे. प्राणीही बिथरू शकतो तर माणूस का बिथरू शकत नाही, तो सुद्धा एक प्राणीच आहे.

दोनदा हत्ती आमच्या बागेत आले तेव्हा ती बाग सांभाळणार्‍या माझ्या मावस भावाला आणि त्याच्या कुटुंबाला कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका, असे स्पष्ट सांगितले होते. त्याच्यासमोर बागायती आणि शेतीचे नुकसान होताना तो हताश होऊन बघत होता. ताटे वाजवून आणि फटाके फोडत त्यांनी हत्तींना आवाज देण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना जे काही खायचे होते आणि नुकसान करायचे होते ते करून गेले होते…आम्हाला भीती होती की त्यांनी आमचे घर तोडून भावाला आणि त्याच्या कुटुंबाला काही इजा केली तर काय होईल त्याची. पण, तसे काही झाले नाही. पण, दरम्यानच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात या चार बेभान हत्तींनी धुमाकूळ घालत फक्त शेतीभाती आणि बागायतींचे नुकसान केले नाही तर तब्बल १४ माणसांवर हल्ला चढवला. त्यापैकी ४ माणसे मरण पावली आणि १४ माणसे कायमची जायबंदी झाली. यापैकी तीन माणसे तर आमच्या गावातील आहेत. बाबी बुटे संध्याकाळी घरी परतत असताना वाटेवर असलेल्या हत्तीने सोंडेत धरून त्याला आपटला, तो जागीच गेला. भीवा घाडीगांवकर पाय गमावून बसला, तर विजय जाधवची बायको कायमची अपंग होऊन अंथरुणाला खिळून बसली आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली आणि चुलीत घालायला लाकडे आणण्यासाठी पडवीत गेली असताना तेथे उभ्या असलेल्या हत्तीने तिला जोरात आपटले. ती नशिबाने वाचली, पण जगून तरी काय फायदा अशी पाठीचा कणा मोडल्याने ती अंथरूणावर पडली आहे. या सगळ्यांना नुकसानभरपाई मिळाली, पण या भरपाईने गेलेली माणसे थोडीच परत येणार आहेत.

हत्तींचा बंदोबस्त करा आणि तातडीने नुकसानभरपाई द्या, यासाठी मी मंत्रालयात सतत प्रयत्न करत होतो. यासाठी माझे मंत्रालयातील पत्रकार मित्र माझ्याबरोबर पाठपुरावा करण्यासाठी सतत सोबत असायचे. त्यावेळी मदत आणि पुनर्वसन हा विभाग पंतगराव कदम यांच्याकडे होता. मी सातत्याने त्यांच्याकडे हा विषय लावून धरला होता… ते मला बघताच म्हणायचे, ‘काय परबानू, आज काय आणलं काम. अरे हो, हत्ती आले ना तुमच्याकडे’. त्यांच्या नेहमीच्या अघळ पघळ स्वभावाने ते बोलायला सुरुवात करत. मी चिडलोय असे दिसताच, हाताने खाली बसवून, ‘तुम्ही कोकणातील माणसे लगेच चिडता. आधी शांत बसा. पाणी, चहा घ्या, मग बोलू’. कदम यांनी नंतर आमच्या परिसरातील सर्व लोकांची नुकसानभरपाई वेळेत दिली. यासाठी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांचीही मदत झाली. विनायक राऊत यांनी तर हत्तींना पुन्हा त्यांच्या मूळ मुक्कामी परत पाठवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली. यासाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे. यासाठी प्रथम आसामच्या वन्य जीव अभ्यास गटाने हत्ती पकडून परत वन्यक्षेत्रात सोडले होते, पण ते माघारी आले. नंतर डॉ. उमाशंकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग येथील हत्तींना रानटी हत्तींमार्फत पकडण्याची अवघड मोहीमही यशस्वी झाली होती. आकेरी येथे हे पकडण्यात आलेले हत्ती कुणकेरी आंबेरी फॉरेस्ट चेकपोस्ट या ठिकाणी प्रशिक्षित करण्यात येणार होते, पण त्यातले दोन हत्ती मरण पावले, तर एक कर्नाटकात पाठविण्यात आला. नुकसानभरपाईतून मिळालेल्या पैशातून मी सौर ऊर्जा कुंपण लावण्याचा प्रयत्न केला, पण काही वर्षांनी ते बंद पडले. आता जरी या भागात हत्ती नसले तरी उद्या कर्नाटकमधून कधीही सिंधुदुर्गात येऊ शकतात… म्हणूनच काही गोष्टी लोकांनी आणि सरकारने लक्षात घ्यायला हव्यात.

हत्तीच्या विशेष गुणांचा अभ्यास केला तर त्याचा बुध्यांक(IQ) तेवढाच उच्च असतो जितका की चिम्पांझीचा असतो. हत्ती त्याच्या कळपातील प्रत्येक सदस्याला ओळखू शकतो, एवढेच नाही तर आकार आणि गंधानुसार कमीतकमी ३० सदस्य तो लक्षात ठेवू शकतो. हत्तीची स्मृती त्याच्या कळपापुरती किंवा त्याच्या अधिवासापुरती मर्यादित राहत नसून तो अशा व्यक्तीदेखील स्मरणात ठेवतो, ज्यांच्यासोबत त्यांचे भावनिक बंध तयार होतात. लहानपणी संपर्कात आलेल्या व्यक्तीदेखील तो अनेक वर्षानंतर ओळखू शकतो. हत्तींनी दिलेले ध्वनिसंकेत हे वार्‍यासोबत सर्व दिशांना जातात. निरीक्षणात असेही आढळले आहे, की हत्तीची स्वतःची एक भाषा व व्याकरण असते. केवळ ध्वनीच्या माध्यमातून हत्ती आपल्या कळपाशी किंवा इतर प्राण्यांशी संपर्क साधू शकतो. तो आपल्या दृष्टी, गंध, स्पर्श व ध्वनीज्ञानाचा उपयोग इतर हत्तींशी व प्राण्यांशी संपर्क साधण्यासाठी करतो. त्याला स्पंदनलहरीदेखील चटकन जाणवतात, ज्यांचा उपयोग तो आपल्या संवाद व हालचालींसाठी करतो. हत्तीची खासियत म्हणजे खर्ज स्वरातील व दीर्घ पल्ल्यावर साधलेला संवाद होय.

मानवामधे आढळणारा post traumatic stress disorder ( मानसिक ताण-तणाव) हत्तींमध्येपण आढळतो. एखादा आघात किंवा दुःखद घटनेच्या आठवणींनी हत्तीदेखील व्यथीत होतात. ते या घटनांमुळे येणार्‍या तणावाला बळी पडू शकतात. हत्तीची संवेदनशीलता त्याला अनेक प्रकारच्या संकटांवर उपाय शोधण्यास उपयोगी पडते. हत्तीला अंकगणिताची देखील चांगली समज असते. तो वस्तूची संगतीसुद्धा लक्षात ठेवू शकतो. हत्ती १२ प्रकारचे ध्वनी किंवा स्वर ओळखू शकतो. इतकेच नाही तर ऐकलेल्या निरनिराळ्या सुरावटीदेखील तो वाद्यांच्या सहाय्याने पुन्हा निर्माण करू शकतो. हत्ती हा मानवेतर सस्तन प्राण्यांमधील एकमेव सस्तन प्राणी आहे जो कळपातील मृत सदस्यांचे दफन करतो. एवढेच नाही तर तो वारंवार त्या दफनस्थळाला भेट देतो.

ही हत्तीची सर्व शक्तीस्थाने लक्षात घेऊन आज गरज आहे मानव आणि हत्ती यांच्यातील संबंध बिघडण्यास कारणीभूत होणारे परिसर असंतुलन आणि त्या बिघडलेल्या संबंधांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी करावयाचे प्रयत्न यासाठी दीर्घकालीन उपायांची. धोरण ठरवणार्‍यांनी व लोकप्रतीनिधींनी यामध्ये योग्य समन्वय घडवून आणावयास हवा. वन्यजीव व वन विभागाकडून पंचनामा, तातडीने नुकसानभरपाई व उपाययोजना होणे या गोष्टी आत्यंतिक महत्त्वाच्या आहेत. जंगलातच राहणारे व जंगलाची पुरेपूर माहिती असणारे स्थानिक, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक अशांची दले उभारण्याची आवश्यकता आहे. कारण हे काम आपल्याकडील जंगलाच्या भौगोलिक रचनेमुळे अवघड आहे. कोईमतूर येथील अन्नामलाई पर्वत रांगांमध्ये वन विभाग व नेचर कॉन्झर्वेशन ग्रुपच्यावतीने इन्फॉर्मेशन नेटवर्क उभारले असून हत्तींच्या स्थलांतराचा शेतीकडे कूच करण्याच्या पद्धतीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्याची माहिती स्थानिक टीव्ही चॅनल्सवर दाखवून लोकांना सतर्क केले जाते. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एसएमएस पाठवून लोकांना सतर्क केले जाते. लाल रंगाच्या सर्च लाईट टाकून लोकांना जागरूक केले जाते. असे अनेक सर्च लाईट टॉवर हत्तीव्याप्त क्षेत्रात उभे करण्यात आले आहेत. बंदीपूर नॅशनल पार्क कर्नाटक येथे खंदक, सौर कुंपणे उभी करून आणि तेथील हत्तींच्या सवयीचा हालचालीचा अभ्यास करून स्थानिक लोकांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने संघर्ष कमी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक प्रा. नागेश दफ्तरदार यांनी कुडाळ, माणगाव या ठिकाणी हत्तीव्याप्त क्षेत्राचा अभ्यास करून, स्थानिक व वन विभागाच्या धोरणांचा समन्वय करून संघर्ष कमी केला आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -