घरफिचर्सडार्विनची थिअरी आणि जगाची निर्मिती

डार्विनची थिअरी आणि जगाची निर्मिती

Subscribe

चार्लस डार्विन (1809-1882) हा शास्त्रज्ञ होता. डार्विनच्या सिद्धांतानुसार पृथ्वीवरील सर्व सजीव निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव प्राणीजाती निसर्गातील बदल पचवतात, त्या टिकतात. ज्या सजीवांना असे टिकणे जमत नाही त्या कालाघौत नष्ट होतात आणि त्यांच्या जागी नव्या प्राणीजाती येतात. अर्थात हे घडायला अक्षरशः हजारो वर्षे लागतात.

केंद्रीय मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री सत्यपाल सिंह ३० जून रोजी म्हणाले की, माझे पूर्वज वानर होते यावर माझा विश्वास नाही. माणूस वानरापासून उत्क्रांत झाला असा डार्विनने मांडलेला सिद्धांत मला मान्य नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. भाजपच्या एका नेत्याने असे विधान केल्यामुळे जशी खळबळ माजेल अशी अपेक्षा होती तशी ती माजलीसुद्धा.
असे विधान भाजपच्या किंवा विश्व हिंदू परिषदेच्या एखाद्या जुन्या नेत्याने किंवा संन्याशाने केले असते तर ’ते असेच बोलणार’ म्हणत वासलात लावता आली असती. पण डॉ.सत्यपाल सिंह साधीसुधी व्यक्ती नाही. ते ऑगस्ट 2012 ते जानेवारी 2014 दरम्यान मुंबर्इ शहराचे पोलीस आयुक्त होते. त्यांनी ‘नक्षलवाद’ या विषयावर नागपूर विद्यापीठातून पी.एचडी.ची पदवी मिळवली आहे. जानेवारी 2014 मध्ये त्यांनी भारतीय पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

त्यांना भाजपने उमेदवारी दिली व त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील बागपत मतदारसंघातून लढवली. त्यांनी चौैधरी चरणसिंग यांचे सुपूत्र आणि राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजितसिंगांचा पराभव केला. आता ते केंद्रीय मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री आहेत. डॉ. सत्यपाल सिंगांची एवढी तपशिलवार माहिती देण्याची गरज म्हणजे मग डार्विनच्या संदर्भात ही विधानं करणारी व्यक्ती कोण आहे याचा अंदाज यावा. नेमके याच कारणांसाठी सत्यपाल सिंगांचे विधान गंभीरपणे घ्यावे लागते. या संदर्भात चर्चा पुढे नेण्याअगोदर आपल्याला डार्विनबद्दल थोडक्यात जाणून घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

चार्लस डार्विन (1809-1882) हा शास्त्रज्ञ होता. डार्विनच्या सिद्धांतानुसार पृथ्वीवरील सर्व सजीव निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव प्राणीजाती निसर्गातील बदल पचवतात, त्या टिकतात. ज्या सजीवांना असे टिकणे जमत नाही त्या कालाघौत नष्ट होतात आणि त्यांच्या जागी नव्या प्राणीजाती येतात. अर्थात हे घडायला अक्षरशः हजारो वर्षे लागतात. हा डार्विनच्या सिद्धांताचा ढोबळ गोषवारा. यातील योगायोगाची गोष्ट म्हणजे हा सिद्धांत डार्विनने 2 जुलै 1858 रोजी मांडला होता. आताच्या 2 जुलैला या घटनेला 160 वर्षे पूर्ण झाली.

डार्विनचा सिद्धांत समाजासमोर आला तेव्हा पाश्चात्य जगात खळबळ माजली होती. त्या अगोदर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असलेल्या पाश्चात्य जगात सर्व प्राणी, पक्षी, कीटक वगैरे सजिव सृष्टी देवाने निर्माण केली आहे, असे मानले जात असे. या श्रद्धेला डार्विनच्या सिद्धांताने छेद दिला. तोेपर्यंत अ‍ॅडम आणि र्इव्ह यांच्यापासून जगाची निर्मिती झाली असे मानले जात असे. डार्विनचा गाजलेला ग्रंथ म्हणजे ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑफ द प्रिझर्वेशन ऑफ रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ’ नावाचा ग्रंथ. हा ग्रंथ इ.स. 1859 मध्ये प्रकाशित झाला. धर्म मार्तंडांनी अपेक्षेप्रमाणे यावर आक्षेप घेतले. मात्र डार्विनचा सिद्धांत पुढे सरकत राहिला.आता अशा सिद्धांताबद्दल डॉ.सत्यपाल सिंह यांच्यासारखी उच्चविद्याविभूषित व्यक्ती जेव्हा एखादे विधान करते तेव्हा त्या विधानाची योग्य त्या गांभिर्याने दखल घेणे गरजेचे ठरते.

- Advertisement -

डार्विनचा हा जो सिद्धांत आहे ती एक थिअरी आहे आणि अजुनही या थिअरीला ‘शास्त्रीय सत्य’  असा दर्जा दिलेला नाही. हा मुद्दा व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. शास्त्रज्ञ त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष शोधनिबंधांच्या माध्यमांतून समाजासमोर मांडतात. हे शोधनिबंध जगभरचे शास्त्रज्ञ वाचतात, त्यावर वादप्रतिवाद होतात. या निष्कर्षांवर अभ्यासपूर्ण आक्षेप घेतले जातात. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. याला अक्षरशः कधी काही दशकं तर कधी काही शतकं लागू शकतात. तोपर्यंत हे निष्कर्ष थिअरीच्या रूपात चर्चेत असतात. जेव्हा संशोधनाअंती या थिअरीत काही प्रमाणात शास्त्रीय सत्य आढळते त्या प्रमाणात त्या थिअरीचा ‘शास्त्रीय सत्य’ म्हणून दर्जा उंचावतो. शास्त्रज्ञांच्या भाषेत याला ‘सिग्मा पातळी’ म्हणतात. एकदा ही पातळी गाठली की मग जगभर या थिअरीला शास्त्रीय सत्याचा दर्जा दिला जातो. असा दर्जा डार्विनच्या थिअरीला अद्याप मिळालेला नाही.

या संदर्भात आधुनिक विज्ञानाचे महर्षी अल्बर्ट आर्इनस्टार्इन (1879-1955) यांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. आर्इनस्टार्इन यांनी विसाव्या शतकात आधुनिक पदार्थ विज्ञानाचा पाया घातला आणि सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांताने केवळ पदार्थ विज्ञानाकडेच बघण्याच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला असे नाही तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला. तरीही त्यांना जो पदार्थविज्ञानातील संशोधनाबद्दल इ.स. 1921 साली नोबेल पुरस्कार देण्यात आला होता तो सापेक्षावादाच्या सिद्धांताबद्दल नव्हे तर ‘फोटोइलेक्ट्रीक इफेक्ट’ बद्दल. याचे साधे कारण म्हणजे तोपर्यंत सापेक्षतावादाच्या सिध्दांताला ‘शास्त्रीय सत्याचा’ दर्जा मिळालेला नव्हता. हा दर्जा अगदी अलिकडे म्हणजे दहा-वीस वर्षांत मिळाला.

आता एक पूर्ण वेगळा मुद्दा. आपल्या देशांत 29 राज्यं आहेत तर अमेरिकेत 50 राज्यं आहेत. आपल्याकडे जसे प्रत्येक घटक राज्याचे शैक्षणीक धोरण वेगळे असते, असू शकते तसेच अमेरिकेतही आहे. याचा अर्थ आपल्याकडे जसा राज्यागणीक शैक्षणीक अभ्यासक्रम बदलतो तसेच अमेरिकेतही आहे. डार्विनच्या सिद्धांताला ‘शास्त्रीय सत्य’ असा दर्जा न मिळाल्याने अमेरिकेतील अनेक राज्यांत या सिद्धांताच्या जोडीने विद्यार्थ्यांना बायबलमध्ये असलेली ‘क्रिएशन थिअरी’ शिकवली जाते. क्रिएशन थिअरीनुसार हे जग देवाने बनवले व आठवडाभर काम करून थकल्यावर देवाने रविवारी सुट्टी घेतली. म्हणून सर्व ख्रिश्चन जगतात व जेथे जेथे ख्रिश्चन धर्मियांच्या वसाहती (उदाहरणार्थ भारत) होत्या तेथे तेथे रविवारी सार्वजनिक सुट्टी असते.

अमेरिकेतील ज्या राज्यांत डार्विनच्या थिअरीच्या जोडीने क्रिएशन थिअरी शिकवली जाते त्या राज्यांची अशी भूमिका आहे की जसे क्रिएशन थिअरीबद्दल सबळ पुरावे नाहीत, त्याचप्रमाणे डार्विनच्या थिअरीच्या समर्थनार्थ सबळ पुरावे नाहीतच. असे जर असेल तर विद्यार्थ्यांना जगाच्या निर्मितीच्या संदर्भात आज प्रचलित असलेल्या दोन्ही थिअरी का शिकवू नये? म्हणून दोन्ही थिअरी शिकवल्या जातात. हे सर्व आता समोर येण्याचे कारण म्हणजे डॉ. सत्यपाल सिंह यांचे ‘ते’ विधान आणि 2 जुलै 1858 रोजी डार्विनचा प्रकाशित झालेला शोधनिबंध.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -