घरफिचर्सवैविध्य म्हणजे विषमता नाही

वैविध्य म्हणजे विषमता नाही

Subscribe

आता पुरूष म्हणजे स्त्रियांना छळणारे, मारणारे, संधी मिळाली की नको तिथे हात लावणारे ही भिती कधीच गळून गेली. कारण मी मला मदत करणारे, समजून घेणारे, माझ्या मागे कुठला अहंकार न ठेवता गाडीवर बसणारे, माझ्या कपडयांवरून माझ चारित्र्य न ठरवणारे, शारीरिक संबंधाशिवाय तासन्तास हळूवार स्पर्शात रमणारे, प्रचंड हसणारे पुरूष पाहिले. वाटलं आपण आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता.

 

कुठलाही देश म्हणजे काय? याची माहिती आपल्याला घ्यायची असेल किंवा एखादा देश समजून घ्यायचा असेल तर आपल्याला तिथली जमीन, साधन, वातावरण आणि त्या भूभागावर राहणारी माणसे, प्राणी, पशू सर्वच समजावून घ्यावं लागतं. यासर्व गोष्टींचा एकमेकांवर होणारा परिणाम आणि त्याचं असणं किंवा नसणं याची गोळाबेरीज म्हणजे देश. बरं एवढयावरच प्रकरण थांबत नाही, तर यासर्व गोष्टींचा भूतकाळ ,वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या सर्वांचीही गोळाबेरीज करावी लागते, जेव्हा आपण एका देशाचा विचार करतो तेव्हा.

- Advertisement -

आपला हा जो भारत नावाचा देश आहे तो समजून घेताना तर अनेक गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. या देशात प्रत्येक दहा मैलावर भूगोलाचं स्वरूप, शब्दांचे अर्थ बदलतात. आपण काही गोष्टींचे उदाहरण दाखले बघू या. माझा जन्म नाशिकचा. नाशिक म्हणजे गोदावरी. जोपर्यंत मी ‘नाशिक’ या परिसरातच वावरत होते तोपर्यंत शहर, गाव, म्हणजे ‘नदी’ असं समीकरण होत. पण जेव्हा परिसर विस्तारत मी विदर्भ, मराठवाडयात गेले तेव्हा कळलं नदी शिवायही गाव असू शकत. नाशिकमध्ये सतत गोदावरीला पाणी त्यामुळे ‘नदी असते’ अशी वाक्ये असायची. आता मी पालघरला विशेष: जव्हार, मोख्याडयात फिरते. तेव्हा लोक म्हणतात ‘नदी आली’ कारण त्यांच्याकडे नदी फक्त पावसाळयात येते. ज्यागावात 2000-2500 मिमी पाऊस पडतो, तिथे उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी हालहाल असतात. त्यामुळे त्यांच्याकडे नदी आली हाच शब्दप्रयोग बरोबर आहे.

वैविध्य हा शब्द समजून घ्यायचा असेल तर ‘भारत’ अनुभवावा. या देशात काहीच सारख नाही. इथे ‘पुरूष’ म्हणजे दाढीवाला असं समीकरण लिहायला जावं तर अरूणाचल प्रदेश, मेघालय इकडच्या पुरूषांना दाढीचं नसते. मिशीवर ताव मारणारा खरा ‘मर्द’ अस स्टेटमेंट करायचं असेल तर महाराष्ट्र, राजस्थान, पंजाबसारखी राज्य वगळता जितके तुम्ही पूर्वेकडे जाल तेथे पुरूषांमध्ये दाढीची कमतरता असते. इथे अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक धर्म, जाती, देव, वेशभूषा, केशभूषा, उंची, जाडी, लग्न, पद्धती इ. सगळंच गमतीशीर. यातल्या प्रत्येक गोष्टीला असण्याचा काहीतरी अर्थ आहे, इतिहास आहे, वर्तमान आहे, भविष्य असेल की नाही यावर चर्चा होऊ शकते आणि यासर्वांत आनंदाने जगणारे शेकडो नाही लाखो लोक आहेत.

- Advertisement -

पण काही लोकांना ‘वैविध्य’ झेपतच नाही. त्यांना सारखं लोकांना कुठल्या तरी एका ‘गडद’ रंगात, रांगेत उभे करून ‘दक्ष’ ठेवायचं असतं. ते अस का करतात याचा अभ्यास केला तर, लक्षात येतं की ही माणसं खूप हुकमी असतात. मग ते यासाठी ‘वैविध्या’चा आनंद न घेता सर्वांना एकसारख करू पाहतात. मग त्यांच्या या कृत्यात सर्वांनी सामील व्हावे म्हणून ते ‘वैविध्या’ ला ‘विषमता’ म्हणतात आणि सर्वांनी एक सारखं करण्याला ‘समानता’ म्हणतात. बरं अशी माणस सगळीकडे सापडतात बरं का! हयांना ओळखण सोप नाही पण अशक्यही नाही. ते सर्व सामान्यांचीच भाषा वापरतात म्हणून त्यांना ओळखणं सोपं नाही अस मी म्हणाले. त्यांच्या भाषेचा ‘ट्रेड’ समजून घेतला की ते सापडतात लगेच. असे लोक बहुसंख्याकांच्या मनात अल्पसंख्याकांकडून तुम्ही धोक्यात आहात असा भ्रम तयार करतात. मग त्यातून वाचण्यासाठी बहुसंख्याकांनी अधिक संघटीत व्हायला हवं ,असा त्यांचा उपायअसतो. मुळात प्रश्नच चुकीचा निर्माण केल्यामुळे त्यावरचा उपायही चूक ठरतो आणि मग त्या देशात किंवा त्या देशातल्या लोकांच्या मनात गढूळ वातावरण निर्माण होतं.

मग असे लोक प्रस्थापितांवर अन्याय होतो अशा घटनांच्या याद्या, त्याच विश्लेषण न करता प्रसारित करतात आणि अशा प्रस्थापितांच्या संस्थासाठी ‘…… हक्क संरक्षण समिती’ स्थापना करतात. यासर्व अत्याचाराच्या त्यांनी दिलेल्या यादया पहिल्या, वाचल्या तर तुमच्या लक्षात येर्इल की, ज्यांच्या कडून अन्याय झाला असे लोक काय मागत होते तर ‘माझ्या आवडीप्रमाणे जगू दे.’ घराघरात सध्या असे अनेक तरूण स्वर निर्माण होत आहेत ज्यांना आपलं स्वत:च गाव रात्री कसं दिसत ते अनुभवायंच आहे. अशा समूहांना त्यांच्या मजेप्रमाणे जगायचे असते. मग असे लोक गाडया काढतात, जिथे जाऊ नको असे ऐकले आहे तिथं जातात, खूप हसतात आणि परत येतात. पण त्यांना तिथं जाऊ दिलं नाही, अडथळा तयार केला, त्याला ‘संस्कृती, धोक्यात आहे’ अशी नकार घंटा वाजवली की मग असे लोक गटाने एकत्र येतात, गाडया अशा काढतात की भिती वाटावी, जिथे जाऊ नको असं म्हटंल होतं तिथेच जातात आणि तिथेच अडकतात. यासर्व परिस्थितीचा मला फार त्रास होतो. मी आणि माझ्या सारख्या पहिल्यांदा सभ्यतेने विचारून करायचा प्रयत्न करतात. एका वयानंतर विचारायची इच्छाचं संपून गेली. कृती केल्यामुळे जे काही घडेल त्या परिणामांना सामोरे जाण्याची हिंमत आजमावली आणि ‘मनसोक्त’ वैविध्यपूर्ण जगण्याच ठरवलं आणि खरंच सांगते जगण्याचा एक वेगळाच आनंद अनुभवला. आता पुरूष म्हणजे स्त्रियांना छळणारे, मारणारे, संधी मिळाली की नको तिथे हात लावणारे ही भिती कधीच गळून गेली. कारण मी मला मदत करणारे, समजून घेणारे, माझ्या मागे कुठला अहंकार न ठेवता गाडीवर बसणारे, माझ्या कपडयांवरून माझ चारित्र्य न ठरवणारे, शारीरिक संबंधाशिवाय तासन्तास हळूवार स्पर्शात रमणारे, प्रचंड हसणारे पुरूष पाहिले.

मला आज तुम्हा सर्वांनाचा या ‘वैविध्याकडे’ वळवायच होतं म्हणून हा पसारा. यातला आनंद ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, विविधतेने नटलेल्या देशाचा मला अभिमान आहे . असं म्हणून मिळत नाही. त्यासाठी तुम्ही स्वत: तसे जगावे लागते आणि नसेल जगायचं तर असो पण दुसर्‍याला जगू दया. वैविध्य म्हणजे विषमता हे जे सारंख आपल्यावर बिंबवलं जातं आहे. यातून बाहेर या. बाय द वे असा अनुभव घेणारे शेकडो आहेत बरं का. मी काही तुम्हाला रॉकेट सायन्स सांगत नाही आहे. आपण उशीर झाला म्हणून धावतपळत घरी जात असतो. तेव्हा एखादी पोरा पोरींची गँग मस्त रमलेली असते. त्यांच्या आपआपसात एकमेकांचे कपडे, चेहर्‍याची ठेवण याकडे लक्षही नसते. आपल्या धावपळीकडे तर त्यांच अजिबात लक्ष नसतं. कारण ते त्यांच्यातच रमलेले असतात. त्यांच्या अशा असण्याचा अर्थ लागावा आणि आपलीही अशी एखादी रंगबेरंगी रात्र असावी असं स्वप्न तुमच्यात जागा व्हावं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी तुम्ही कृती करावी म्हणून हा एक प्रस्ताव की, वैविध्य म्हणजे विषमता नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -