घरफिचर्सआला रे लाल्या बेफिकराचा कडडडडडक आवाज

आला रे लाल्या बेफिकराचा कडडडडडक आवाज

Subscribe

मराठी सिनेसृष्टीला अभिमान वाटावा असा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट होत आहे. तो म्हणजे, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. या चित्रपटातील काही गाणी रिक्रिएटेड आहेत. तर काही ओरिजनल कम्पोजिशन्स आहेत. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा डॉ. काशिनाथ घाणेकर यांची व्यक्तीरेखा रिफ्लेक्ट करणारं गाणं म्हणजे आला रे लाल्या बेफिकरा... चा कडक आवाज असलेला गायक नकाश अजीज याने ‘आपलं महानगर’ला त्याचा अनुभव मांडला आहे.

कलाकार हा नेहमी एक कलाकारच. त्याला भाषेचं, धर्माचं, लिंगाचं आणि वयाच बंधन नसतं. हे आपण नेहमीच पाहिलं आहे. गेली कित्येक वर्ष मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या कलांमधून प्रेक्षकांना आनंद देत आहेत. असाच एक कलाकार गायक नकाश अजीज त्याच्या गाण्यांमधून प्रेक्षकांना भुरळ पाडणारा.

मातृभाषा मराठी नसली तरीही मराठीतील दमदार गाण्याला कडक आवाज देऊन प्रेक्षकांवर त्याची छाप पाडणारा नकाश लाल्या गाण्याच्या अनुभवाबाबत सांगतो की, मी आधीपासूनच अभिनेता सुबोध भावेचा फॅन आहे. त्यांनी आजवर केलेल्या भूमिका जशा कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व यांतील अभिनयासोबतच त्यातील गाणीही मला खुपच भावली. त्यामुळे जेव्हा आणि काशिनाथ घाणेकर चित्रपटातील लाल्या या गाण्यासाठी संगीतकार रोहन-रोहनने मला विचारलं आणि हे गाणं सुबोध भावे यांच्यावर चित्रीत होणार असल्याचं समजलं, तेव्हा मी लगेच होकार दिला. मी स्वतःला नशीबवान समजतो की गाणं गाण्याची संधी मला मिळाली. डॉ. काशिनाथ घाणेकर हे एक आयकॉनिक व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव प्रतिबिंबीत करणार आला रे लाल्या बेफिकरा… गाताना त्याची विशेष काळजी घेतली. माझी मातृभाषा मराठी नसली तरी मी मुंबईचा मुलगा आहे. गेली २९ वर्षे मी मुंबईत राहत आहे. माझं शिक्षण इथलंच. त्यामुळे मराठी समजतं आणि बर्‍यापैकी बोलूही शकतो. त्यामुळे मराठीत गाणं गायला इतकं कठीण गेलं नाही.

- Advertisement -

कोणत्याही कलाकाराला त्याची कलाकृती सादर करताना भाषेची अडचण येत नाही. तसंच मतं नकाशनेही व्यक्त आहे. तो सांगतो की, हिंदी व्यकीरिक्त दुसर्‍या भाषेत गाताना कधीही भाषेची अडचण जाणवली नाही. लाल्या हे गाणं म्हणजे माझ्यासाठी एक उत्साहवर्धक अनुभव होता. नकाश अजीज गायलेल्या गाण्यांची दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याचा योग यंदाच्या दिवाळीत आला होता. आणि काशिनाथ घाणेकरसोबत प्रदर्शित झालेला ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटातील गाण्यालाही नकाशने स्वरबद्ध केले आहे. या चित्रपटाच्या तमिळ आणि तेलुगू भाषेतील वाशेमल्ला आणि सुरैय्या गाण्याला त्याने आवाज दिला. त्यामुळे नकाश सांगतो की, यापूर्वी अजय-अतुल यांच्या संगीत दिग्दर्शनासाठी गाण्याचा योग आला आहे. तसेच आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गजांसाठी पार्श्वगायक करण्याची संधी मिळाली याकरता मी स्वतः ला लकी समजतो. मुंबईतील मालाडच्या परिसरात मी वाढलो. गोरेगावच्या पाटकर कॉलेजमध्ये शिकलो. त्यामुळे मराठी भाषा ही तशी ओळखीचीच आहे.

मराठी आणि हिंदीसह आज नकाश अजीजने तामिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती, नेपाळी, आसामची अ‍ॅसमीस म्हणजेच ओखोमिया, कन्नड, तुळू भाषेतही गाणी गायली आहेत. त्याशिवाय त्याने छोट्या पडद्यावरील काही मालिकांच्या गाण्याचे कम्पोजिंगही केले आहे. सध्या सुरू असलेल्या कुल्फी कुमार बाजेवाले, सलीम-अनारकली या मालिकांसाठी तो सहकम्पोजर म्हणून संगीत देत आहे. तर काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘नो एन्ट्री- पुढे धोका आहे’ या मराठी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन नकाशने केले होते. शिवाय स्मिता ठाकरे यांच्या राणा रॉकस्टार या चित्रपटाचे म्युझिकही बनवले असल्याचे नकाश सांगतो.

- Advertisement -

बॉलीवूडमधील कित्येक सुपरस्टार्ससाठी नकाशने पार्श्वगायन केले आहे. मोठमोठ्या संगीतकारांसाठी गाणी गायली आहे. मात्र त्याने भविष्याच विशाल-शेखर आणि शंकर-एहसान-लॉय यांच्यासाठी गाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शंकर महादेवन त्यांच्यासोबत तीन ओळी जरी गायला मिळाली तरी मला खूप काही शिकता येईल, असं नकाश सांगतो.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -