घरफिचर्सआश्रम ते तुरुंग... भारतातील भोंदूबाबांचा रंजक प्रवास!

आश्रम ते तुरुंग… भारतातील भोंदूबाबांचा रंजक प्रवास!

Subscribe

धर्माच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणारे अनेक (भोंदू)बाबा, स्वंयघोषित गुरु भारतात पुरातन काळापासून आहेत. एकविसाव्या शतकातही हे बाबा-गुरू रासलीला नामक प्रकारात महिलांचे लैंगिक शोषण करत आहेत. भारतीय राज्यघटना धर्माच्या या ठेकेदारांना जुमानत नाही. म्हणूनच आसाराम बापू सारखे अनेक बाबा आज तुरुंगाची हवा खात आहेत.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जोधपूरच्या अनुसूचित जाती व जमाती विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. धर्माच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणारे अनेक (भोंदू)बाबा, स्वंयघोषित गुरु भारतात पुरातन काळापासून आहेत. एकविसाव्या शतकातही हे बाबा-गुरू रासलीला नामक प्रकारात महिलांचे लैंगिक शोषण करत आहेत. भारतीय राज्यघटना धर्माच्या या ठेकेदारांना जुमानत नाही. म्हणूनच आसाराम बापू सारखे अनेक बाबा आज तुरुंगाची हवा खात आहेत.

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची १४ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये बाबा गुरमीत राम रहीम, आसाराम ऊर्फ आशुमल शिरमानी, आसारामचा मुलगा नारायण साई, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंह, सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता, ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी, स्वामी असीमानंद उर्फ ओम नम: शिवाय बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी या भोंदूंचा समावेश होता.

- Advertisement -

१. बाबा गुरमित राम रहीम

बाबा गुरमित राम रहीम

आपले पापकर्म लपवण्यासाठी माणूस नेहमीच माणुसकीचा बुरखा धारण करतो. म्हणजेच तो Being Human होतो. बाबा गुरमितही स्वतःला ‘इन्सान’ म्हणवून घेतो. ‘डेरा सच्चा सौदा’ या आश्रमाचा प्रमुख असलेला राम रहीम बलात्काराच्या आरोपाखाली १० वर्षांसाठी तुरुंगात गेला आहे. चंडिगढच्या विशेष सीबीआय न्यायालयाने ही २८ ऑगस्ट २०१७ रोजी ही शिक्षा सुनावली.

२. संत रामपाल

संत रामपाल

हरियाणातील सतलोक आश्रमचे प्रमुख आणि स्वंयघोषित संत रामपालच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालू आहे. २००६ साली धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली हिस्सार येथील आश्रमात पोलीस रामपालला अटक करायला गेले होते. रामपालला अटक करत असताना जवळपास १५ हजार समर्थकांनी आश्रमाला घेराव घातला होता. या समर्थकांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात रामपालच्या समर्थकांनी एकप्रकारे गृहयुद्धच छेडल्याचे चित्र त्यावेळी संपूर्ण देशाने पाहिले.

- Advertisement -

३. निर्बल बाबा

निर्मल बाबा

निर्मलजीत सिंग नारुला उर्फ निर्मल बाबा यांना बेहिशोबी मालमत्ता जमा केली म्हणून अटक झाली होती. बाबा प्रवचनाच्या माध्यमातून बाबा आधी भक्तांच्या मनात उतरायचे आणि मग त्यांच्या खिशात घुसायचे. टीव्ही, वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोटींच्या जाहिराती देऊन निर्मल बाबाने आपले प्रस्थ वाढवले होते.

४. नित्यानंद स्वामी

नित्यानंद स्वामी

वादग्रस्त सीडीमुळे चर्चेत आलेले नित्यानंद स्वामी बलात्काराच्या आरोपाखाली काही काळ तुरुंगात होता. अमेरिकेची नागरीक असलेल्या एका महिलेने नित्यानंद आपल्यावर अनेक वर्ष बलात्कार करत असल्याचा आरोप केला होता. त्याआधी एका तामिळ वृत्तवाहिनीने नित्यानंद आणि एका अभिनेत्रीचे खासगी क्षण टीव्हीवर प्रक्षेपित केले होते. नित्यानंद स्वामीने सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला होता. मात्र नंतर व्हिडिओतील व्यक्ती तोच असल्याचे सिद्ध झाले होते.

५. राधे माँ

राधे माँ

भक्तांच्या भावनांशी खेळून गैरप्रकारांनी संपत्ती गोळा केली, असा आरोप अॅड. फाल्गुनी ब्रह्मभट यांनी राधेवर केला होता. त्यांनी राधेच्या विरोधात जनहित याचिकाही दाखल केली होती. निकी गुप्ता या विवाहितेचा कौटुंबिक छळ केल्याबद्दल राधेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात तिला अद्याप अटक झालेली नाही. वादग्रस्त वक्तव्य आणि आपल्या नाचगाण्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

६. इच्छाधारी संत स्वामी भिमानंद

‘इच्छाधारी संत’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या भिमानंदला सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीत मसाज पार्लरमध्ये काम करणारा भिमानंद नंतर बाबा बनून सेक्स रॅकेट चालवत होता. या व्यवसायाच्या माध्यमातून या बाबाने हजारो कोटींची माया जमवली होती.

७. श्रीकृष्ण पाटील

पाटील बाबा

स्वामी समर्थ यांचा अवतार असल्याचे सांगून रत्नागिरीतील अनेक कुटुंबांना उध्वस्त करणारा हा तथाकथित पाटील बाबा आता तुरुंगाची हवा खातोय. महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीकृष्ण पाटील जेरबंद झाला आहे. रत्नागिरी पोलीस खात्यात वाहन चालकाची नोकरी सोडून पाटील भोंदूगिरीच्या व्यवसायात आला होता.

८. नारायण साई

नारायण साई

आसाराम बापूचा मुलगा नारायण साई हा देखील सध्या तुरुंगात आहे. आसाराम बापूच्या विरोधात साक्ष देणाऱ्यांना धमकावणे, विनयभंग अशा गुन्ह्यांखाली नारायण साई सध्या अटकेत आहे.

यांच्याबरोबरच चंद्रास्वामी, जयेंद्र सरस्वती, स्वामी प्रेमानंद या बाबांवरही खून, बलात्कार आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. हे तिनही बाबा आता हयात नाहीत.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -