घरफिचर्सलावलं रताळं आलं...

लावलं रताळं आलं…

Subscribe

कलियुगात झाली भेळं…लावलं रताळं आलं कमळं…अरे कायबी काय गातू बाळ्या…आस्सनैईतै, कलियुगात झाली भेळ लावलं लावलं रताळं…आलं केळं है…आन तू खुशाल रताळं लावून कमळं उगवायलाकारं…भाड्या, आनंदादानं कसलं गायलंय…जवा नवीन पोपटाच्या रेकॉर्डातलं हे तिसरं गानं…आरं पन काळू त्यू म्हनतोंस ते काळ्या गोल रेकॉर्डातल्या काळातलं गानं, आता इंटरनेटच्या जमान्यात केळं लावल्यावर कमळं उगवाया लागलीत. आन एक न्हाईल एकाच वेळेस लैलै कमळं उगवत्यात,
बाळू- आन ति कशी…?
म्हंजी बगं…तिकडं नव्या मुंबापुरीतल्या श्री गणेशाच्या वावरात ऐन गणेशोत्सवात कसं नुकतंच कमळं उगावलं, तसंच अहमदनगरात, पुन्यातल्या इंदापुरात, सोलापुरातल्या काळ्या मातीत बि कमळ उगवलंय. सांगलीत नुकतंच कमळं उगवायलं, तर तिकडं कोकनातल्या काल्या मातीत बि कमळाचं बि रुजवायला घेतलंय. ही कलियुगातली राजकीय भेळं है तर दुसरं काय?
बाळू- पन, काळूभाऊ कमळ उगावाया खाली लै सारा चिकुल लागतोय, गाळं लागतोय, पानीबी लागतंय…त्याबिगार ही कमळं उगवंत न्हाईती गड्या.
काळू- खरंच की काळू…पन, ही गाळ कोरड्याठाक पडलेल्या नदीतला न्हाई, उपसला की टाकला, ही डबकी भरलीत आधीच्याच कमळानं…तितं नव्या कमळाला जागाच र्‍हाईली न्हाई, तरीबी काही नवी केळी, रताळी स्वतःची कमळं बनवून घ्यायला या हिरीत उड्या मारयल्याती…
बाळू- आरं पनं..रताळं लावल्यावर कलियुगात केळं उगवल्याचं म्हाईत है…ही कमळं कशी उगवलीत?
काळू- काय बाळ्या गड्या तुला ऐवडंबि कळाना का? त्या…रताळ्याला ईडीच्या चुलींच भ्याव दावल्यावर ती काऊन आपसुक आगीत बोंबलत बसंल? आरं पन आगीतून फुफाट्यात पडल्यांवर रताळ्याचा जाळंच व्हावा की?
बाळू- काळू रं काळू…मग रताळ्यालाच केळं म्हनावं…त्याऊन मग त्याला कमळ म्हनावं? रताळ्याला सांगावं…तू रताळं न्हाईस..केळं हैस…मग म्हनावं..तू केळंबी न्हाईस, कमळ हैस…राताळ्यासमोर आसं बाराव्यादा बोंबलल्यावर तेराव्याला रताळं गडी म्हनतोच व्हय..म्या कमळंच है…
काळू- बाळू गड्या पन चवीचं काय? रताळ्याचं केळं कसं हुईल, केळं घडावर येतं, रताळं जमिनीत आस्तं, गान्यात काय बी चाल्तय? रताळ्याचं केळं कसं हुईल? रताळं जमिनीत लावल्यावर त्यातून केळं गान्यात येतंय तू तर रताळ्यातून हिरीतलं कमळंच उगवाया लागला गड्या..कसं चालायचं असं.
बाळू- न्हाई रं…काळू? रताळं पेरल्यावर रताळंच उगवतं पन त्याला लोकशाईत रताळं म्हनायचं नसतं…केळं गान्यात म्हनायचं असतं आनि निवडनुकीआधी कमळं म्हनायचं अस्तं, आस्तं रताळंच पन काळ बदलतो तशी नावं बि बदलत्यात लका…नाव बदलंल की काम झालं, आता ती झाडाखाली उगवंतय का झाडावर त्याची आपल्याला काय? उद्या रताळं लावल्यावर केळंच न्हाई शाहळं बि उगवतील, आन त्या शहाळ्याला उद्या शहाळ्याच्या बागवानानं सफरचंद म्हन्ल्यावर आपल्यालाबि त्याला सफरचंद म्हनावं लागलं…बागवान जे ठरवलं तेच होतं, मालक त्यो, बाग त्याची, पानी त्याचं, जमीन त्याची, तलाव त्याचं त्याच्या तलावात त्यो रताळं लावून केळं उगवंल, कमळं उगवलं न्हाईतर शहाळं उगवंल…त्याला काय म्हनायचं ते त्यो ठरवलं..कळलं का..?
काळू- कळलं गड्या…? ज्याची बाग त्याचं रताळं, केळं आणि कमळं हेच खरं….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -