घरफिचर्सबेरडवाडीतली ‘बासी ईद’

बेरडवाडीतली ‘बासी ईद’

Subscribe

संरपंच अण्णा पाटील, आजच ईद आहे. म्हणजे रमजान महिना संपला. मग कसा करणार मेळावा?.. पण आपल्याला ‘बासी ईद’ साजरी करता येईल. ईदच्या दुसर्‍या दिवशी असते. त्यामुळं मेळावा उद्याच घ्यावा लागलं..’ ग्रामसेवकाचा हा मुद्दा अण्णाला पटला आणि उद्या अख्ख्या बेरडवाडी हिंदू मुस्लीम सईष्णू मेळावा आणि बासी ईद साजरी करायचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी गावात एकमेव उरलेला मुसलमान अब्दुलचाचाला अवताण देण्यात आले, ज्याचे घर अण्णा पाटिलांच्या कार्यकर्त्यांनी हिंदू-मुसलमान दंगलीत जाळून टाकले होते.

बेरडवाडीत पुन्हा निवडून आलेल्या सरपंच अण्णा पाटलानं ग्रामपंचायत सदस्यांची पहिलीच बैठक बोलावली होती. खरं तर सकाळी १० ला सर्वांनी जमायचं होतं, पण स्वत: अण्णाच दुपारी १२ ला ग्रामपंचायतीत आला, तेव्हा शिपाई आणि ग्रामसेवकाशिवाय कुणीच पोहचलेलं नव्हतं. त्यामुळे चरफडलेल्या अण्णानं सर्वांना पुन्हा बोलावणं धाडलं. त्या कामासाठी त्याने त्याचा खासगी शिपाई- कम- स्वीय सहायक असलेल्या शिरप्याला गावात पिटाळलं. त्यानंतर एक एक करून सर्व जण जमले, तेव्हा दुपारचा एक वाजला होता. अखेर सव्वाला ही महत्त्वाची ‘मिटींग’ सुरू झाली.

‘मित्रांनो…’ आपल्या आवडीच्या संबोधनानं अण्णानं सुरुवात केली.., ‘ आपल्याला बेरडवाडीच्या सत्तेत येऊन १५ दिस झालंत, पण आपण गावासाठी अजूनही काही केलं नाय…. तव्हा आज आपण काहीतरी निर्णय करून समद्या बेरडवाडीला आपल्या कामाचा आवाका दाखवून देऊ.. तूमच्या काय सूचना असतील तर त्या मांडा…’अण्णाच्या या बोलण्यावर सदस्यांची पाच मिनिटे अशीच चुळबूळ करण्यात गेली, पण कुणीच बोलंना… शेवटी मधल्या आळीतून निवडून आलेला एक सदस्य कसाबसा बोलला…,‘ अण्णा तुम्ही आता पुन्हा गावचं सरपंच झालाती.. तवा ईकासकामाच्या आयडीयाचा मान बी तुमालाच मिळायला पायजे… म्हून मग मी असा ठराव मांडतो की पयली आयड्या आपल्या बेरडवाडीचे सरपंच अण्णा पाटील यांनीच सूचवावी… काय मंडळी?’

- Advertisement -

त्यावर सर्वांनी एक सुरात ‘व्हय खरं हाय, अण्णा तुम्हीच काय तरी सांगितलं पायजे…’ असा प्रेमळ आग्रह धरला. आपला आयडीयाचा बाण आपल्याकडेच परत आलेला पाहून अण्णा वैतागला होता.. पन तसं चेहर्‍यावर न दाखवता, तो म्हणाला, ‘ ठीकाय तर मंडळी, आता तुमी यवडा आग्रह करताय, तर मीच कायतरी गावच्या विकासाची कल्पना काढतो….’ अण्णा असं म्हटला खरा, पण काही केल्या त्याचं डोकं चालंना. त्यानं डोक्यावरची टोपी काढून ठेवली. बराच वेळ ग्रामपंचायतीच्या आढ्याकडं पाहून तो डोकं खाजवायला लागला, त्याची ही अवस्था त्याचा खासगी शिपाई कम स्वीय सहायक असलेला शिरप्या पहात होता. शेवटी न राहवून तो अण्णाच्या कानाशी लागला आणि अण्णाचा चेहरा उजळला. त्यानं पुन्हा त्याचा ठेवणीतला शब्द उच्चारला, ‘तर मित्रांनो.. आताच मला एक लय भारी आयडीया सुचलिया.. तालुक्यातल्या कुठल्याच गावानं असं काम मागच्या पन्नास वर्षात केलं नसंल…’ अण्णा असं बोलायला लागल्यावर सर्वांनी कान टवकारले.. ‘आपण गावात सईष्णू मेळावा घेणार आहोत..सध्या रमजानचा महिना सुरू हाय, त्यानिमित्तानं गावातल्या हिंदू आणि मुस्लीम समाजाचं एक संमेलन घ्यायचं, दोन्ही धर्मातले लोक एकत्र जेवण करतील.. कशी वाटली आयड्या…’

अण्णाची आयडीया चांगलीच होती, त्यामुळे सर्वच सदस्यांना आनंद झाला. एक सदस्य म्हणाला, ‘ अण्णा आजच आपण संध्याकाळपोतर समद्या गावात बॅनर लावून टाकू. त्यावर लिव्हायचं, ‘ ग्रामपंचायतीच्या बॉडीचा गावच्या इकासाचा पैलाच मोठा निर्णय, हिंदू मुस्लीम सईष्णू मेळावा.. अन आपले समद्यांचे फोटू पन टाकू त्यावर…’ पन मध्येच ग्रामसेवकानं शंका काढली. तो म्हणाला, ‘अण्णा, आजच ईद आहे. म्हणजे रमजान महिना संपला. मग कसा करणार मेळावा?.. पण आपल्याला ‘बासी ईद’ साजरी करता येईल. ईदच्या दुसर्‍या दिवशी असते. त्यामुळं मेळावा उद्याच घ्यावा लागलं..’ ग्रामसेवकाचा हा मुद्दा अण्णाला पटला आणि उद्या अख्ख्या बेरडवाडी हिंदू मुस्लीम सईष्णू मेळावा आणि बासी ईद साजरी करायचा निर्णय घेण्यात आला आणि दुपारी जेवणाची वेळ झाल्यानं या पहिल्या ‘मिटींग’ची सांगता करण्यात आली..संध्याकाळी सगळ्या बेरडवाडीत एकट्या अण्णा पाटलाचे फोटो असलेले बॅनर लावले, त्यावर लिहिले होते, गावच्या विकासासाठी ‘भव्य बासी ईद व हिंदू मुस्लीम सईष्णू मेळावा आणि गावजेवणाचा कार्यक्रम’.. रात्री दवंडीही देण्यात आली. रात्रीतून मेळाव्यासाठी ग्रामपंचायतीसमोर एक मोठा मांडव घालण्यात आला. रात्री जेवताना बेरडवाडीत याच बॅनरची चर्चा होती. मात्र, सहिष्णू मेळावा म्हणजे काय? हे काही कुणाला समजलं नाही, पण उद्या सगळ्यांना जेवायला मिळणार एवढंच त्यांना समजलं.

- Advertisement -

सकाळी ऊन वाढायला लागलं, तसे गावकरी मंडपात जमायला लागले. तिथे स्टेजवर अण्णा पाटील आणि सदस्य बसलेले होते. सुरुवातीला प्रथेप्रमाणे गावच्या मास्तरने प्रस्तावना केली. ‘बंधू-भगिनींनो, आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. आज आपली बेरडवाडी खर्‍या अर्थाने सहिष्णू झाली आहे. अखिल मानवतेला कशाची गरज असेल, तर ती सहिष्णूतेची, सौहार्दाची, प्रेमभावाची… आपल्या गावातील दोन समाजांचा आज या निमित्ताने मनोहारी संगम होत आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधव आज एकत्र आले आहेत….मुस्लीम बांधवांचा हा ईदचा सण अख्खा गाव साजरा करतोय हे दृष्यच विरळा….’ मास्तरचं बोलणं सगळ्या गावाच्या डोक्यावरून गेलं.. पण त्यातील एका मुद्द्याकडं सगळ्यांचं लक्ष गेलं, अगदी अण्णा पाटील आणि सदस्यांचंही, ते म्हणजे या हिंदू मुसलमान मेळावा आणि मुस्लीम बांधवांचा ईदचा सण.बासी ईद साजरी करण्यासाठी अख्खा गाव जमलाय, पण त्यात मुसलमान बांधव कुठाय? ‘हे म्हणजे डबलबेल मारून एसटी गावच्या वेशीबाहेर यावी आणि मग लक्षात यावं की कंडक्टर तर खालीच राहिला.. ’ एका ग्रामपंचायत सदस्यानं ‘कॉमेंट’ केली. मग अण्णानं शिरप्याला गावात शिल्लक राहिलेल्या एकमेव मुसलमान बांधवाला, म्हणजेच अब्दुलचाचाला घेऊन यायला सांगितलं… खरं तर सईष्णू मेळव्याचं त्याला आमंत्रणच दिलं नव्हतं कुणी..

‘वयोवृद्ध अब्दुल अहमद उर्फ अब्दुलचाच हे बेरडवाडीतील एकमेव मुसलमान. खरे तर बेरडवाडीत पूर्वी अब्दुलचाचा आणि त्यांच्या नातेवाईकांची सात आठ कुटुंबे होती. मात्र, दहाएक वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अण्णा पाटलाच्या माणसांनी हिंदू मुस्लीम वाद उकरून काढला आणि गावात जाळपोळ झाली. त्यात अब्दुलचाचाचे घर जाळण्यात आलं. इतकेच नाही तर त्या दिवसापासून त्याचा लाडका मुलगा नजीबही गायब होता. नजीब हा कॉलेजमध्ये शिकत होता. अण्णा पाटलाच्या बेरक्या राजकारणाविरोधात त्यानं निवडणुकीत आवाज उठवला होता. लोकांनाही त्याचं म्हणणं पटत होतं, पण दंगलीनंतर तो कुठे गेला कुणालाच समजले नाही. त्यानंतर गावातल्या इतर मुस्लीम कुटुंबांनीही धास्ती घेऊन गाव सोडलं. मात्र, नजीब परत येईल या आशेपोटी म्हातारा अब्दुलचाचा तिथेच राहिला. अलीकडे तर तो खूपच थकला होता. भ्रमिष्टासारखा करायला लागला होता. त्याला नजीबचाच ध्यास होता.. गावाबाहेरच्या दर्ग्यातच तो बसलेला दिसे. सतत हात जोडून आकाशाकडे पाहत अल्लाहची करूणा भाके… मागे दंगलीत घरदार गमावूनही त्याने गावातील कुणाबद्दलच अपशब्द कधी काढला नाही.. त्यामुळे सर्वांनाच त्याच्याबद्दल कणव होती.

शिरप्याला अण्णा पाटलानं अब्दुलचाचाला शोधण्यासाठी पाठवलं, पण लगेच सदस्यांपैकी कुणीतरी जेवणाचा विषय काढल्यानंतर सईष्णू मेळाव्यात पंगती मांडून जेवायलाही सुरुवात केली. अब्दुलचाचा आल्यानंतर सहिष्णुता जपण्यासाठी म्हणून सरपंच अण्णा पाटील हे स्वत: त्यांच्यासोबत स्टेजवर जेवण घेतील , तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या.. अशी खास घोषणाही मास्तरांनी तत्पूर्वी केली होती.दरम्यान अण्णा पाटलाचा निरोप घेऊन शिरप्या पोहचला, तेव्हा अब्दुलचाचाने ईदची नमाज अदा केली होती. आज त्यानं नवीन पेहनावा केला होता. मात्र, नमाजानंतरही तो दर्ग्यात थांबून राहिला होता आणि आता नेहमीप्रमाणे दर्ग्यातल्या मजारीसमोर उभा राहून ‘फातेहा’ म्हणत होता..नेहमीप्रमाणे गबाळा दिसत नव्हता, फारच तेजस्वी दिसत होता.शिरप्याने त्याला सईष्णू मेळाव्याचा निरोप दिला, तेव्हा प्रार्थना करतानाच अब्दुल अहमद मंदसा हसला आणि त्यानं क्षीण पण ठाम आवाजात विचारलं, ‘ मेरे नजीब का क्या हुआ? उसका कुछ पता चला क्या?…’ आणि पुढच्याच क्षणाला त्याचे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -