घरफिचर्स‘कॅलिफोर्निया टाइपरायटर’

‘कॅलिफोर्निया टाइपरायटर’

Subscribe

कालच ९ जूनला झाला ‘टॉम हँक्स’चा वाढदिवस. या माणसाविषयी, त्याच्या अप्रतिम अभिनय आणि सुंदर चित्रपटांविषयी लिहावं तितकं कमीच आहे. मात्र अभिनय, चित्रपट आणि दिग्दर्शन (आणि त्याचं एकमेव प्रेम, रिटा विल्सन) यांच्यासोबतच त्याचं आणखी एका गोष्टीवर अफाट प्रेम आहे. ते म्हणजे टाइपरायटर्सवर. त्यामुळे ‘कॅलिफोर्निया टाइपरायटर’ या डॉक्युमेंटरीबाबत ऐकल्यावर त्यात ‘टॉम हँक्स’ नसता तरच नवल!

कालच ९ जूनला झाला ‘टॉम हँक्स’चा वाढदिवस. या माणसाविषयी, त्याच्या अप्रतिम अभिनय आणि सुंदर चित्रपटांविषयी लिहावं तितकं कमीच आहे. मात्र अभिनय, चित्रपट आणि दिग्दर्शन (आणि त्याचं एकमेव प्रेम, रिटा विल्सन) यांच्यासोबतच त्याचं आणखी एका गोष्टीवर अफाट प्रेम आहे. ते म्हणजे टाइपरायटर्सवर. त्यामुळे ‘कॅलिफोर्निया टाइपरायटर’ या डॉक्युमेंटरीबाबत ऐकल्यावर त्यात ‘टॉम हँक्स’ नसता तरच नवल!

नावातच ‘कॅलिफोर्निया टाइपरायटर’चा विषय आणि आशय व्यक्त झालेला आहे. याच नावाच्या एका टाइपरायटर रिपेअरिंग शॉप आणि त्या अनुषंगाने टाइपरायटर्सचा इतिहास, अनेक लोकांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील टाइपरायटर्सच्या रुपात असलेला अविभाज्य वाटा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रसिद्धीनंतर मागे पडलेली टाइपरायटर संस्कृती, पुढे जाऊन टाइपरायटर वाचवण्यासाठी एका व्यक्तीच्या एका पत्रवजा लेखनातून टाइपरायटर्सचा प्रचार-प्रसार करण्यासाठी उभी राहिलेली चळवळ अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेली ही डॉक्युमेंटरी केवळ हँक्सकरिता पहावी अशातला भाग नाही. मात्र एकूणच ‘टाइपरायटर’ या नॉस्टॅल्जिक विषयासाठी पहावी अशी आहे.

- Advertisement -

तसा माझा जन्म लेट ९० मधील. ’९९ म्हणजे लेट नाइन्टीज तरी कसलं! असो. तर मी तसा ओल्ड स्कूलचा आहे. म्हणजे मी अलीकडील लोकांपेक्षा जरा मागेच जगतो. त्यामुळे काही गोष्टींविषयी नकळत एक नॉस्टॅल्जिया तयार झालेला आहे. लेखनाच्या पारंपरिक पद्धती आणि ओघानेच टाइपरायटरही त्यात आलेच. त्यामुळे टाइपरायटरपासून क्रिएटिव्ह गोष्टी तयार करत, त्यावर संगीत वाजवत, लेखनाविषयी बोलत असलेले लोक पाहून मनात आपसूक एक पोएटिक भावना निर्माण होते.

या डॉक्युमेंटरीमध्ये एक वेगळेच स्पिरिट आहे. मला किंवा इतरही अनेक लोकांना अजूनही पुस्तक हातात घेऊन, त्यातील नव्या छपाईचा वास घेत वाचणे का आवडते, वगैरे अनेक गोष्टींचं सुप्त विवेचन यानिमित्ताने होतं. लिखाणाच्या प्रक्रियेपासून ते काही लोकांच्या लिखाणाच्या पद्धती आणि टाइपरायटर्सचे कलेक्टर अशा अनेक अंगांना स्पर्श करणारी ही डॉक्युमेंटरी त्यातील गोष्टींशी सहमत असा अथवा नसा, पण रंजक आहे इतके मात्र नक्की. त्यामुळे हँक्स तो बस एक बहाना है! कारण त्यानिमित्ताने ही डॉक्युमेंटरी त्याच्या आणि अगदी टाइपरायटर्सच्या चाहत्यांपर्यंत पोचेल ही अपेक्षा आहे. बाकी या ‘अमेरिकाज डॅड’ला शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्याचं कौतुक करण्यासाठी त्याच्या वाढदिवसाची वाट पाहण्याची गरज मला तरी कधीच वाटली नाही!


– अक्षय शेलार
लेखक युवा सिने अभ्यासक आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -