घरफिचर्सजगातील ५व्या क्रमांकाची नौसेना

जगातील ५व्या क्रमांकाची नौसेना

Subscribe

१७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ मानले जाते. १९३४ मध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

१७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ मानले जाते. १९३४ मध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
भारतीय नौदल हे जगातील ५व्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहेत. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडो नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि १९६७ मध्ये पाणबुड्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.
युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवा या अनुषंगाने माझगाव गोदीमध्ये १९६६ या वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत सुद्धा सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निर्मिती कलपक्कम येथील ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटोमिक रिसर्च’ येथे ‘भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदल जगात ५व्या क्रमांकावर आहे. अन्य राष्ट्रांच्या विनंतीवरून भारतीय नौदल त्या-त्या राष्ट्रांच्या समुद्रसीमेतही तैनात होऊ लागले. पारंपरिकरीत्या देशाच्या संरक्षणाबाबत नौदल तीन भूमिका बजावते. लष्करी कारवाया, रखवालदारी आणि धोरणात्मक भूमिका़ त्यात आता आणखी एका गोष्टीचीही भर पडली आहे, ती म्हणजे मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण. या पूर्वीही अनौपचारिकरीत्या हे काम नौदलाकडे होतेच, पण आता ते रीतसर नौदलाकडे आह़े. चाचेगिरी, शस्त्र-अमली पदार्थ यांची अवैध वाहतूक, मानवी तस्करी, अनधिकृत मासेमारी, समुद्रतळातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अवैध उपसा, विध्वंसक शस्त्रास्त्रांचा प्रसार आणि समुद्रातील आतंकवाद अशी काही समुद्रात चालणार्‍या बेकायदेशीर गोष्टींची उदाहरणे आहेत.़ ऑक्टोबर २००८ पासून एडनच्या आखातात भारतीय नौदल चाचेगिरीविरोधात घेत असलेले श्रम हा ‘रखवालदार’ म्हणून नौदल बजावीत असलेल्या कामगिरीचे उत्तम उदाहरण आह़े.
इतर राष्ट्रांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायत, प्रशिक्षण व आपत्कालीन मदत याद्वारे मैत्रीचे संबंध बळकट करण्यात आले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, चीन आदी राष्ट्रांबरोबर नौदलाने संयुक्त कवायतींमार्फत ज्ञानाचे आदानप्रदानसुद्धा केले आहे. २००४ मध्ये त्सुनामी संकटात श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना नौदलानेच तत्काळ मदतीचा हात दिला. ४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला. विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबर रोजी ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते. या दिनानिमित्त दरवर्षी भारतीय नौसेने तर्फे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे संचलन, प्रात्यक्षिके सादर केली जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -