घरफिचर्सअन्न हे पूर्ण ब्रह्म !

अन्न हे पूर्ण ब्रह्म !

Subscribe

१९४५ साली याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization - FAO) ची स्थापना झाली होती. जगभरात अन्नसुरक्षा राखण्यासाठी विशेषतः दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात अन्नाचा तुटवडा भासू नये यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे कार्य या दिनानिमित्त करण्यात येते. खाद्य आणि कृषी संस्थेच्या सभासद देशांनी एकत्रित येत नोव्हेंबर १९७९ मधील संस्थेच्या २०व्या सर्वसाधारण सभेपासून जागतिक आहार दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. २१ व्या शतकातही मानव मूलभूत गरजांपासून वंचित आहे. आजही अनेक देशांमध्ये प्रामुख्याने विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये लोकांना दोनवेळचे पुरेसे अन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. आज कितीतरी लोक उपाशीच झोपतात, तर दुसरीकडे अनेक जण अन्न वाया घालवतात. एकीकडे अपुर्‍या अन्नामुळे लहान मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू होत आहे, तर दुसरीकडे अतिपोषणामुळे मुलांना स्थूलतेच्या समस्येला सामोरे जावे लागते. याला आपण अन्नाची विसंगत वाटणी म्हणूया, पण काही झाले तरी जगण्यासाठी अन्न हा प्रमुख घटक आहे. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी तसेच कोणीही भुकेलेला राहू नये यासाठी जगभर १६ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १९४५ साली याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization – FAO) ची स्थापना झाली होती. जगभरात अन्नसुरक्षा राखण्यासाठी विशेषतः दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात अन्नाचा तुटवडा भासू नये यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे कार्य या दिनानिमित्त करण्यात येते. खाद्य आणि कृषी संस्थेच्या सभासद देशांनी एकत्रित येत नोव्हेंबर १९७९ मधील संस्थेच्या २०व्या सर्वसाधारण सभेपासून जागतिक आहार दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हंगेरीच्या कृषी आणि खाद्य मंत्रालयाचे प्रतिनिधी डॉ. पाल रोमानी यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला होता. या दिनानिमित्त जगभरातील उपासमार, गरिबी, त्यामागील कारणे तसेच त्यावर उपाय याबाबत जागरुकता पसरवली जाते.
जगातील कोणीही उपाशी राहू नये यासाठी मागील वर्षी या दिनानिमित्त एक संकल्पना निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार २०३० पर्यंत जगात कोणीही उपाशी राहू नये यासाठी ‘झीरो हंगर’ म्हणजेच ‘शून्य भूक’ हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वप्रथम अन्नाची होणारी नासाडी थांबवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर अन्नाची नासाडी होते. यामध्ये उत्पादनापासून ते अन्नावरील प्रक्रिया, अन्नाचे पॅकेजिंग, अन्नाची वाहतूक आणि अन्नाचे सेवन अशा विविध पातळ्यांवर अन्नाची नासाडी होते. भारतात एकूण उत्पादन झालेल्या अन्नापैकी जवळपास ४० टक्के अन्न वाया जाते. भारतातील अन्नाची नासाडी मुख्यत्वेकरून पॅकेजिंगच्या आधीच म्हणजेच योग्य साठवणूक आणि वाहतूक न केल्यामुळे, त्यासाठी पुरेशा सोयी-सुविधा नसल्यामुळे होते. भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग पाहता २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १.६६ अब्ज होण्याची शक्यता आहे. एवढ्या लोकसंख्येला अन्नाचा पुरवठा करणे, यासाठी उपाय सुचवणे, त्यांची अंमलबाजवणी करणे गरजेचे आहे. अन्नाचा तुटवडा टाळण्यासाठी नवनवीन कल्पना, संधींचा उदय होणे गरजेचे आहे. स्थानिक तसेच देशपातळीवरील अधिकारी संस्थांनी पुढाकार घेत याबाबत विविध उपक्रम राबवले पाहिजेत.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे असूनही आज देशात कुपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेती आणि शेती विषयक उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देणेसुद्धा महत्त्वाचे आहे. यासाठी सरकारी, निमसरकारी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्रं, वादविवाद स्पर्धा, प्रदर्शनं यांच्या आयोजनातून अन्न नासाडी टाळण्याचे उपाय आणि शेतीचे महत्त्व सर्वांसमोर आणावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -