घरफिचर्समनुष्यतेच्या विध्वंसाची शब्दावली आहे कमर्शियल आणि प्रोफेशनल!

मनुष्यतेच्या विध्वंसाची शब्दावली आहे कमर्शियल आणि प्रोफेशनल!

Subscribe

वस्तुकरणाच्या या महाकाळातील शोषणकारी शब्दावली आहे कमर्शियल आणि प्रोफेशनल. हे शब्द परमाणू बॉम्बपेक्षाही घातक आहेत. परमाणू बॉम्ब जीवनाला संपवतात; पण कमर्शियल आणि प्रोफेशनल हे शब्द “मानवतेला” नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. त्यांचा नेमका अर्थ समजून घ्यायला हवा…

आतापर्यंत मानवाची लढाई होती ‘माणूस’ बनण्याची, ‘माणुसकीला’ पुढे नेण्याची म्हणजे मनुष्य आपल्या ‘पशुतेशी’ संघर्ष करत आला आहे आणि त्यावर मात करत आला आहे. पण 1992 नंतर एक उलट काळ सुरू झाला.
मानवाने जेवढी ‘माणुसकी’ साध्य केली तिला एक ‘प्रोडक्ट’ करून नफा कमावण्याचा काळ सुरू झाला त्याचेच नाव आहे ‘जागतिकीकरण’. जागतिकीकरणाचा अर्थ आहे मानवतेचे ‘वस्तुकरण’. मानवी उत्क्रांतीचा सर्वात विध्वंसक काळ आहे ‘जागतिकीकरण’.

- Advertisement -

जागतिकीकरणाच्या या धोरणांनी पद्धतशीररित्या जगातील संवाद, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या चौसूत्री मौलिक प्रक्रियेला केवळ व्यापार आणि नफा-तोट्याच्या चौकटीत मर्यादित केले.

खरेदी विक्री हाच यांचा मंत्र आहे. जो विकणार नाही आणि खरेदी करणार नाही, त्याला या काळात जगण्याचा अधिकार नाही. हा मानवाचा पतन काळ आहे, ज्यात मानवाचे रूपांतर वस्तूत होत आहे.

- Advertisement -

वस्तुकरणाच्या या महाकाळातील शोषणकारी शब्दावली आहे कमर्शियल आणि प्रोफेशनल. हे शब्द परमाणू बॉम्बपेक्षाही घातक आहेत. परमाणू बॉम्ब जीवनाला संपवतात; पण कमर्शियल आणि प्रोफेशनल शब्द “मानवतेला” नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. पण कमर्शियल असण्याचा नेमका अर्थ समजून घ्यायला हवा…हा शब्द कुठून आला? कमर्शियल असण्याचा अर्थ आहे लूट. या लुटारू तंत्राला ‘कॉर्पोरेट’ म्हटलं जातं. या कॉर्पोरेटमध्ये मध्यमवर्गीय समूह काम करतो. मध्यमवर्गाचा अर्थच आहे कोणत्याही किमतीवर ‘उपभोग’ वा सुविधांचा उपभोग घेणारा वर्ग. स्वतःच्याच दिवा स्वप्नांच्या अपेक्षेत स्वतःचं शोषण करणारा वर्ग.

1992 च्या आधीदेखील वस्तू खरेदी केल्या व विकल्या जात होत्या; पण त्यामध्ये वस्तू निर्माणामध्ये लागणार्‍या श्रमाचे परिश्रमिक, मोबदला आणि इतर खर्च सामील होते. पण आज फक्त लूट होते आहे. इथे अति सामान्य उदाहरण घेऊया, शेतकर्‍याच्या शेतातून बटाटे 2-3 रुपये किलोने खरेदी करून, मल्टिनॅशनल कंपनी चिप्स तयार करते. हे चिप्स बाजारात 300-1000 रुपयापर्यंत विकले जातात. हीच परिस्थिती कोक,पेप्सी आणि इतर पेय पदार्थांची आहे. कोक आणि चिप्समध्ये काही ‘पौष्टिकता’ असते का? असते निव्वळ ‘चव’. याचा अर्थ ‘चव’ विका आणि पौष्टिकतेला मारा.
पौष्टिकतेचा अर्थ आहे स्वास्थ्य ..स्वास्थ्यचा अर्थ आहे मानसिक ‘स्वास्थ्य’… म्हणजे विचार…

हे ‘कॉर्पोरेटचे’ लूट तंत्र विचारांच्या विरुद्ध आहे. कोणताही विचार जो याच्या लूटमध्ये बाधा होतो, त्याला हे लूट तंत्र नष्ट करते. याची उदाहरणे सोशल मीडियावर पहा…कुठल्याही ‘तार्किक’ आवाजाला फेसबुक ब्लॉक करते. शोषणाच्या, धर्मांधतेच्या, व्यक्तिवादाच्या, सरकारी फसवणुकीला, कुकर्माना उलगडणार्‍या प्रत्येक आवाजाला नष्ट करत आहे जुकरबर्गचे फेसबुक. कारण त्याला विचार नाही नफा हवा आहे. विचारांच्या विनाशावर टिकून आहे, अत्यंत साधा वाटणारा शब्द ‘कमर्शियल’.. दुःखद बाब ही आहे की, संपूर्ण युवा पिढी या विकारवादी नरभक्षी आणि मानवतेच्या विरोधी व्हायरसने ग्रस्त आहे. हानीकारक हे आहे की त्यांना हे समजूनदेखील घ्यायचे नाही आहे, ‘प्रॉफिट’च्या समोर अंध झाले आहेत सगळे.

दुसरा शब्द आहे ‘प्रोफेशनल’ याचा संबंध तांत्रिकी निपुणतेशी आहे ज्याला बाजाराने ” मानवीय संवेदनांशी” जोडले. तंत्राच्या माध्यमातून मानवीय ‘संवेदनांचा’ उपभोग करणार्‍यांना ‘प्रोफेशनल’ असे म्हटले जाते. म्हणजेच मानवाचे दुःख, वेदना, आनंद यांना अभिव्यक्त करून त्याची सगळी धनसंपदा लुटणे आणि या लुटण्याला बोलतात प्रोफेशनॅलिजम. आजच्या पिढीला या कार्यासाठी प्रशिक्षित केले जाते जेणेकरून ‘लूट’ अनुवंशिक होईल आणि तंत्र कायम स्वरूपी सुरू राहील.

कमर्शियल आणि प्रोफेशनल या शब्दांचा प्रचार ‘मीडियाच्या, कलेच्या’ माध्यमाने केला जात आहे. सगळ्यात पहिले ‘लोकतांत्रिक’ व्यवस्थेचा ‘जन सरोकारी पक्ष म्हणजे पत्रकारितेला’ याचे शिकार बनवले गेले. जेणेकरून जागतिकीकरण या सुंदर शब्दाची कुरूपता दर्शवणारा कोणीही वाचणार नाही आणि मनुष्य वस्तूमध्ये बदलून जाईल.. विकत घेतला आणि विकला जाईल… नफेखोर भांडवलशाही व्यवस्था मानवतेचा विनाश करत राहील..!

कला वस्तू नाही आणि कलाकार वस्तुकरणाचा कारखाना नाही. जागतिकीकरण “कमर्शियल” आणि “प्रोफेशनल” सारख्या शब्दांनी कलेला “प्रोडक्ट” आणि कलाकाराला “फॅक्टरी” बनवू इच्छित आहेत. कलाकारदेखील स्वतःला “कमर्शियल” आणि “प्रोफेशनल” म्हणवून घेण्यात धन्यता मानत आहेत आणि मीडियादेखील दिवस-रात्र कलाकारांवर या शब्दांचा भडीमार करत आहे. कलाकार हे विसरून जातात की स्वतःला कमर्शियल आणि प्रोफेशनल म्हणवून ते एका औपनिवेशिक लुटीचा पाया रचत आहेत.

कला एक शोध आहे … निरंतर शोध … जो कुठेही थांबत नाही… कला जीवनाला निरंतर जीवन आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रतिबद्ध करत असते. जीवन आणि मानवी उद्देशांना स्पष्ट करत माणूस आणि माणुसकीचा बोध निर्माण करत असते… कलाकार साधक आहे… जो आपल्या कला साधनेने ओथंबून निघतो, स्वतः शोधलेल्या एका शरीराच्या अनंत शोधात स्वतःला समर्पित करून, आपल्या कलेने विश्वाला रचनात्मक दृष्टी देऊन प्रेरित करतो.

पेट की आग में जलने की बजाए

– मंजुल भारद्वाज

शोहरत,ताकत, दुनियादारी

भीड़,भेड़ चाल, चकाचौंध

बने बनाएं रास्तों से दूर ,

अनजाने बीहड़ों की खाक़

छानता है, प्रतिकूल मौसम को

अनुकूल बनाता है,

हवाओं के सर्द और गर्म

रुख में अपने को थाम

ऋतू को बदलता है

दूर दूर तक खाली

निर्जन, हवाओं में तपती

धरती की तपन को

आग उगलते सूर्य में

अपने पसीने से शीतल करता है

अपनी परछाई की छावं में

बैठकर अपने को साधता है

अपनी प्यास बुझाने के लिए

गर्म हवाओं में मृग तृष्णा के

पीछे भागने की बजाए

अपनी आँखों की नमी से

सूखे गले को गीला कर

वीरानों से जुझने का हौंसला

पैदा करे

पेट की आग में जलने की बजाए

अपनी ‘कुंडलिनी’ को जगाता है

वही बौद्धिक जमीन को लहलाता है

वही नये चिन्तन का सूत्रपात करता है

अपने चिंतन के चराग से

रोशन करता है दुनिया को

लिखता है इबारत नए इतिहास की

जिसके ‘पदचिन्हों’ पर सदियों तक

सजदा करती हैं ‘पीढियां’

गाती हैं प्रेम गीत

बजता है सरगम

मिलते हैं मनमीत

सजाते हैं मोहब्बत के ‘गुलिस्तां’

गुलज़ार होता है चमन

एक अनंत यात्रा के लिए ..

कलाकार, हा केवळ आपले पोट भरण्यासाठी कलाकार नसून मानवी जीवनाला कलात्मक प्रकृतीच्या लय आणि तालाशी जोडणारा आहे… म्हणूनच जेव्हा या प्रकृतीचा ताल आणि लय बिघडतो तेव्हा मनुष्य विध्वंसक होऊन स्वतःचाच विनाश करून घेतो. आज मानव आपल्या याच विध्वंसक रुपाच्या तोंडाशी बसलेला आहे आणि वर धूर्तपणे त्यालाच विकास म्हणतो आहे…. खरे पाहता चारही बाजूंनी हिंसा आणि हाहा:कार माजला आहे. कला आणि कलाकाराला बाजारू पद्धतीने आपल्या मुठीत पकडून, त्यांना केवळ एक कटपुतली बाहुली बनवून, एखाद्या बाजारी वस्तूच्या रूपात जनमानसात प्रदर्शित केले जात आहे, टाइम पास व उपभोगासाठी.

अशा आव्हानात्मक काळात थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने कलात्मक चिंतन, कला आणि कलाकारांच्या कलात्मक गरजा, कलात्मक मौलिक प्रक्रियांना समजण्यासाठी आणि त्याच्या मंथनासाठी कलाजगताला उत्प्रेरीत केले आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स प्रोफेशनल आणि कमर्शियल या शब्दांना खोडून, निपुण आणि प्रतिबद्ध हे शब्द कलाजगताला प्रदान करत आहे.

कारण, कला ही उत्पाद आणि कलाकार हा उत्पादक नाही आणि जीवन नफ्यातोट्याची बॅलेन्सशीट नाही. यासाठी हा नाट्य सिद्धांत कला आणि कलाकाराला उत्पाद आणि उत्पादीकरणातून उन्मुक्त करत, त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक ऊर्जेने उत्तम व सुंदर विश्वनिर्मिती करण्यासाठी प्रेरित आणि प्रतिबद्ध करते.

-मंजुल भारद्वाज (रंगचिंतक व तत्वज्ञ)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -