चंद्र आहे साक्षीला

चंद्रापासून एवढे जवळ, तरीही दूऽऽरच !

Mumbai

विक्रम लँडरचा भूमीवरील नियंत्रण कक्षाबरोबरचा संपर्कच तुटला आणि सर्वजण सुन्न झाले. पंतप्रधानांसह भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील (म्हणजे इस्रोतील) वैज्ञानिक, ज्या कक्षातून या सार्‍या घटनांचे चित्रण डोळ्यात प्राण आणून मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने बघत होते, तेथे एकच भयाण शांतता पसरली. सर्वजणच काही काळ सुन्न झाले. सार्‍या वातावरणावरच निराशेचे सावट पडलेे. मात्र मिळालेले यशही काही कमी नाही. निराश होऊ नका, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना धीर दिला. देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनीही तसेच धीर देणारे संदेश पाठवले. यावरूनच ‘चांद्रयान-२’ या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होते.

मध्यरात्रीनंतर शनिवार सुरू झाल्यावर भारतातील नव्हे, तर सार्‍या जगातील वैज्ञानिकांचे आणि सर्वसामान्य भारतीयांचेही लक्ष एकाच गोष्टीकडे लागले होते. चांद्रयान-2 चे विक्रम लँडर, म्हणजे अवतरण यान व्यवस्थित चंद्रावर उतरते का याकडे. भारताच्या अंतराळातील अविस्मरणीय ठरू शकणारा क्षण आता काही वेळच दूर होता.

शनिवारी पहाटे १ वाजून 38 मिनिटे … चंद्राभोवती फेर्‍या घालणार्‍या विक्रम लँडरने भ्रमणाचा वेग कमी करून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची क्रिया सुरू केली होती. त्याला आपला वेग सेकंदाला सहा किलोमीटर (म्हणजेच ताशी 21000 कि.मी.) वरून सेकंदाला केवळ दोन मीटर (म्हणजे ताशी साधारणपणे सात कि.मी.) पर्यंत कमी करायचा होता आणि त्यासाठी कालावधी होता फक्त 15 मिनिटांचा. एवढ्या अल्प कालावधीत हे काम पार पाडणे तसे अवघड परीक्षेचे नव्हे अग्निपरीक्षेचच होते. आणि त्यामुळेच सारेजण डोळ्यात प्राण आणून ते थरारक दृश्य बघत होते. 12 मिनिटांचा काळ व्यवस्थित पार पडला होता आता.. केवळ तीन मिनिटेच बाकी होती. त्यानंतर …

पण … नेमके त्यावेळीच घडू नये ते घडले! विक्रम लँडरचा भूमीवरील नियंत्रण कक्षाबरोबरचा संपर्कच तुटला आणि सर्वजण सुन्न झाले. पंतप्रधानांसह भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील (म्हणजे इस्रोतील) वैज्ञानिक, ज्या कक्षातून या सार्‍या घटनांचे चित्रण डोळ्यात प्राण आणून मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने बघत होते, तेथे एकच भयाण शांतता पसरली. सर्वजणच काही काळ सुन्न झाले. सार्‍या वातावरणावरच निराशेचे सावट पडलेे. मात्र मिळालेले यशही काही कमी नाही. निराश होऊ नका, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना धीर दिला. देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनीही तसेच धीर देणारे संदेश पाठवले. यावरूनच या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होते.

चांद्रयान-2 या मोहिमेचे यशापयश अवलंबून होते, केवळ ती पंधरा मिनिटांवर. आणि ती पंधरा मिनिटे म्हणजे आपली भ्रमणकक्षा सोडून विक्रम अवतरणयान-लँडरच्या प्रत्यक्ष चंद्रावर अवतरणापर्यंतचा कालावधी. कारण याच काळात लँडरच्या वेगामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात बदल करायचा होता. आणि त्यामानाने हा कालावधी अतिशय अल्प होता. त्यामुळेच इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी या पंधरा मिनिटांचे वर्णन ‘ती अत्यंत खडतर असतील’ असे केले होते. सोमवारी चांद्रयानाच्या ऑर्बिटर पासून विक्रम लँडर अलग करण्यात वैज्ञानिकांना यश आले होते आणि त्यामुळेच अपेक्षा उंचावल्या होत्या.

त्याबाबत बोलताना तेव्हा माधवन म्हणाले होते, लँडर प्रत्यक्ष चंद्रावर उतरण्याआधीची 15 मिनिटे अतिशय महत्त्वाची असतील. कारण ही सारी प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि म्हणूनच खूप अवघड आहे. त्यावरच सारेकाही, म्हणजे मोहीमेचे यशापयश, अवलंबून असणार आहे. इस्रोचे सध्याचे प्रमुख शिवन यांनी तर या पंधरा मिनिटांबाबत बोलताना ही पंधरा मिनिटे आमच्यासाठी अतिशय घाबरवून टाकणारी -टेरिफाइंग- अगदी भीतीदायक पंधरा मिनिटे, असतील असे म्हटले होते.

… आणि… त्यांची दुर्दैवाने त्यांची ती भीती खरी ठरली.
हे तज्ज्ञ असे म्हणत होते त्यालाही कारणे होती. एकतर अलीकडेच या वर्षी एप्रिल महिन्यात, इस्रायलने अशा प्रकारे चंद्रावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी ठरला होता. चंद्रावर अवतरण ही प्रक्रिया अवघड मानली जाण्यालाही कारण आहे. आजवर 38 वेळा असे प्रयत्न करण्यात आले आहेत आणि त्यापैकी 20 वेळाच ते यशस्वी झाले आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रावर लँडर उतरवून त्यातून बाहेर पडून फिरणार्‍या गाडीचा म्हणजे, भ्रमणयानाचा अर्थात रोव्हरचा प्रयोग यशस्वी केला आहे. भारताला या प्रयत्नामध्ये यश मिळाले असते, तर तो चंद्रावर अवतरणयान उतरवण्यात यश मिळवणारा भारत चौथा देश ठरला असता. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथील परिस्थितीची भ्रमणयानाद्वारे पाहणी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला असता.

पण ते यावेळी तरी शक्य झालेले नाही. अर्थात अशा अवघड मोहिमांमध्ये हे गृहीतच धरलेले असते आणि त्यामुळे नेमके काय चुकले हे शोधून काढून, तशा चुका होणार नाहीत, अशी खात्री करून घेऊन, अधिक काटेकोरपणे नवी मोहीम आखणे, एवढी एकच गोष्ट वैज्ञानिकांना ठाऊक असते. भारतीय वैज्ञानिक आता त्या तयारीला लागलेही असतील! अर्थात असा हा पहिलाच प्रसंग नाही हेही खरेच.

भारताच्या चांद्रयान मोहिमेला सुरुवात तशी फार पूर्वीपासून, म्हणजे 1990 मध्ये आपण जिओसिंक्रोनिअल लाँचिंग व्हेइकल-जीएसएलव्ही – प्रकल्प हाती घेतला तेव्हापासून झाली होती, असे म्हटले, तर ते वावगे होणार नाही. त्यापूर्वी काही वर्षे आपण आर्यभट्ट उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडून अंतराळ क्लबात स्थान मिळवले होते. पण तेवढ्याने आपल्या शास्त्रज्ञांना समाधान वाटणे शक्य नव्हते. पोलर लाँच व्हेइकल आपण सहज प्रक्षेपित करू शकत होतो. पण त्याची क्षमता केवळ 1750 कि.ग्रॅ. वजन नेण्याची होती. उलट जीएसएलव्हीची वजन वाहून नेण्याची क्षमता 4000 ते 8000 किलोग्रॅम एवढी असते. जीएसएलव्ही-तीन व्हेइकल पृथ्वीच्या विषुववृत्तापासून 35000 कि.मी. उंचावर जाऊ शकते. आणि त्याच्या भ्रमणकक्षेमध्ये मोठी वाढही करावी लागते.

इ. स. 2000 मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते आणि 2008 मध्ये या मोहिमेसाठी रशियाबरोबरच्या चांद्रयान-2 या मोहिमेला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला होता. 2009 मध्ये भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही बरोबरच चांद्रयान-2 मोहिमेचे काम रशियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आले होते. रशिया त्यासाठी भारताला अवतरणयान- लँडर पुरवणार होता. पण नंतरच्या काळातच रशिया आणि चीनने सहकार्याने आखलेली मोहीम अयशस्वी ठरली आणि रशियाने त्यावर आम्हाला अपयश का आले यावर संशोधन करायचे आहे, असे सांगितल्याने अवतरणयान पुरवण्यास उशीर होऊ लागला. त्यामुळे संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरूनच ही मोहीम पार पाडायची असे ठरवण्यात आले. ती जबाबदारी अर्थातच भारतीय वैज्ञानिकांवरच आली.

मोहिमेत 15 एप्रिल 2010 रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत, रॉकेटमध्ये बिघाड झाल्याने, प्रयोग फसला आणि मोठे नुकसान होऊन हा प्रकल्प काही वर्षांनी मागे गेला. या चांद्रयान-2 मोहिमेमध्ये ज्या जीएसएलव्ही मार्क 3 चा उपयोग करण्यात आला, त्याची चाचणी 5 जून 2017 रोजी घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली होती. त्यामुळेच चांद्रयान-2 मोहिमेला वेग आला होता.

तसे पाहिले तर यावरील काम भारतात साधारण 25 वर्षे सुरू होते. त्या काळात 11 उड्डाणे आणि विविध घटकांच्या 200 चाचण्या घेतल्या गेल्या होत्या. या फसलेल्या प्रयत्नानंतरही भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक मार्क तीन-जीएसएलव्ही एम 3-बाबतचे काम सुरूच राहणार आहे. कारण त्याचा भावी काळात मानवाला अंतराळात धाडण्याच्या इस्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठा उपयोग होणार आहे. मानवाला अंतराळात धाडण्याच्या या प्रकल्पाचे नामकरण, गगनयान मिशन 2021, असे करण्यात आले आहे. त्याला अर्थातच उशीर होण्याची शक्यता आहे.

चांद्रयान- 2 चे मुख्य घटक ऑर्बिटर म्हणजे कक्षेत फिरणारे यान, विक्रम अवतरणयान (लँडर) आणि प्रज्ञान रोव्हर असे होते. अवतरणयानाला आपल्या अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले होते. प्रक्षेपणाची नियोजित तारीख खरे तर 15 जुलैही होती. पण प्रक्षेपणाच्या वेळेआधी तासभरच जीएसएलव्ही मार्क तीन या रॉकेटमध्ये हेलियम गळती होत असल्याचे आढल्यामुळे त्याचे प्रक्षेपण लांबवण्यात आले होते. त्यानंतर 22 जुलै रोजी दुपारी दोन वाजून 42 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण झाल्यानंतर अवकाशात गेल्यानंतर रॉकेटचा सर्वात वरचा भाग वेगळा झाला. आणि त्यातील वजनदार ऑर्बिटर (वजन 2379 कि.ग्रॅ.). त्यामध्येच असलेल्या विक्रम अवतरणयान (वजन 1471 कि.ग्रॅ.) आणि प्रज्ञान भ्रमणयान (वजन 27 कि. ग्रॅ.) यांच्यासकट बाहेर पडला. रॉकेटपासून वेगळा झाल्यानंतर ऑर्बिटर पृथ्वीभोवती 169 बाय 45,475 कि.मी.च्या कक्षेत फिरू लागला. त्यानंतर त्याची भ्रमणकक्षा वाढवण्याचा, त्याच्या ऑर्बिटरेझिंगचा, टप्पा अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याकाळातच तो नादुरुस्त होण्याची जास्त शक्यता असते. या टप्प्यात ऑर्बिट रेझिंग 40,000 कि. मी. अंतरापासून एक लाख कि.मी. पर्यंत करायचे होते, म्हणजे भ्रमणकक्षेत मोठीच वाढ करायची होती. ती योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी साधारण 22 दिवसांचा कालावधी लागला.

पृथ्वीभोवती फिरताना ऑर्बिटरने एकूण पाच अत्यंत अवघड क्रिया पार पाडल्या होत्या. आणि त्यानंतर तो चंद्राकडे निघाला होता. तो टप्पादेखील सहा दिवसात यशस्वीपणे पार पडला. आता चंद्राच्या कक्षेत गेल्यावर ऑर्बिटरची भ्रमणाची कक्षा कमी करण्याची ऑर्बिट रिड्यूसिंगची-आवश्यकता होती. विक्रम अवतरणयान- लँडर, ऑर्बिटायरपासून वेगळा होऊन चंद्रावर अलगद उतरायची म्हणजे सॉफ्ट लँडिंगची तयारी करू लागला. हे सॉफ्ट लँडिंग म्हणजे लँडरच्या आतील तांंत्रिक उपकरणांना तसेच रोव्हरला, कोणत्याही प्रकारे धक्का बसणार नाही, अशा प्रकारे उतरणे. सोमवारी विक्रम अवतरणयान -लँडर, हे चंद्राभोवती फिरणार्‍या ऑर्बिटर पासून वेगळे झाले. हे काम अतिशय अवघड होते, पण ते यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले, हे महत्त्वाचे. कारण चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती.

या दरम्यानच्या यानाच्या भ्रमण कक्षेतील बदलांची नोंद अशी होती. 24 जुलैला ही कक्षा 169 बाय 45163 एवढी करण्यात आली. 26 जुलैला यान 251 बाय 54829 कि. मी. च्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. नंतरची कक्षा सुधारण 29 जुलै रोजी केली गेली, ती कक्षा 276 बाय 71792 एवढी, तर 2 ऑगस्टला 277 बाय 89472 कि. मी. एवढी झाली. ४ ऑगस्टला चंद्रयानाने पृथ्वीची छायाचित्रे टिपली. 6 ऑगस्टला भ्रमणकक्षा 276 बाय 142975 कि.मी. झाली. 14 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत पाठवण्यासाठी आवश्यक पृथ्वीभोवतीची कक्षा त्याने प्राप्त केली. 22 ऑगस्टला चंदाच्या कक्षेत गेल्यानंतर चांद्रयान दोनने घेतलेले चंद्राचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. 26 ऑगस्टला आणखी काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली. 28 ऑगस्ट रोजी चांद्रयान-2 ची चंद्राभोवतीची तिसरी कक्षा सुधारणा केली केली. यावेळी चांद्रयान -2 चंद्राभोवतीच्या 124 बाय 164 कि. मी. च्या कक्षेत दाखल झाले होते. एक सप्टेंबरला पुन्हा एकदा कक्षेत सुधारणा करण्यात आली आणि यान आणि ते 119 बाय 127 च्या कक्षेत गेले. 2 सप्टेंबर रोजी विक्रम अवतरणयान चंद्रयानातून अलग झाले. हा एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्याने उमेद वाढली होती. दुसर्‍याच दिवशी पृथ्वीभोवती फिरताना ऑर्बिटरने एकूण पाच अत्यंत अवघड क्रिया पार पाडल्या होत्या. आणि त्यानंतर तो चंद्राकडे निघाला होता. तो टप्पादेखील सहा दिवसात यशस्वीपणे पार पडला. आता चंद्राच्या कक्षेत गेल्यावर ऑर्बिटरची भ्रमणाची कक्षा कमी करण्याची ऑर्बिट रिड्यूसिंगची-आवश्यकता होती. विक्रम अवतरणयान-लँडर, ऑर्बिटरपासून वेगळा होऊन चंद्रावर अलगद उतरायची म्हणजे सॉफ्ट लँडिंगची तयारी करू लागला. हे सॉफ्ट लँडिंग म्हणजे लँडरच्या आतील तांंत्रिक उपकरणांना तसेच रोव्हरला, कोणत्याही प्रकारे धक्का बसणार नाही, अशा प्रकारे उतरणे. सोमवारी विक्रम अवतरणयान-लँडर, हे चंद्राभोवती फिरणार्‍या ऑर्बिटरपासून वेगळे झाले. हे काम अतिशय अवघड होते, पण ते यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले, हे महत्त्वाचे. कारण चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती.

चांद्रयानाच्या कक्षेत पहिली सुधारणा केली गेली होती आणि ते 104 बाय 128 कि. मी. कक्षेत गेले. विक्रम अवतरणयानाच्या कक्षेत दुसरी सुधारणा केली गेली आणि ते चंद्राभोवती 35 बाय 101 कि. मी. कक्षेत गेले. त्यानंतरचा काळ दीर्घ प्रतिक्षेचाच होता, अवतरणयानाला उतरवण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशातील दोन विवरांमधील जागा निश्चित करण्यात आली होती. पण नक्की कोठे उतरायचे हा निर्णय अवतरणयान संगणकाच्या मदतीने घेणार होते.

विक्रम अवतरणयान चंद्राभोवती फिरू लागल्यानंतर त्यातील कॅमेरे सुरू झाले होते आणि त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेण्याचे काम त्याने सुरू करून ते पृथ्वीवरील तळाकडे पाठवण्यास सुरुवात केली होती. कारण पृथ्वीवरून चंद्रावर उतरण्यासाठी कोणत्या जागा योग्य आहेत हे त्या फोटोंवरूनच निश्चित करण्यात येऊन ती माहिती लँडरला कळवण्यात आली होती. त्यानंतर विक्रम अवतरणयानातील संगणक त्या फोटोंशी पडताळणी करून, त्यांनी सुचवलेल्या जागेशी जास्तीत जास्त मिळतीजुळती जागा नक्की करणार होते. ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि आजवर ती कुणीच उपयोगात आणलेली नाही त्यामुळे यशस्वीपणे विक्रम लँडर चंद्रावर उतरले तर तो अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग ठरणार होता. कारण त्यावेळी पृथ्वीवरून कोणत्याही प्रकारचे नियंत्रण करण्यात येणार नव्हते.

परंतु विक्रम अवतरणयानाचा संपर्कच तुटल्यामुळे सारेच संपले. प्रज्ञान भ्रमणयानाला चंद्रावर उतरण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्याच्यावर सोपवण्यात आलेली नियोजित कामेही होऊ शकणार नाहीत. एक गोष्ट मात्र लक्षात घेण्याजोगी आहे. ती म्हणजे शिवन यांनी असे म्हटले आहे की, विक्रम अवतरणयानाचा संपर्क तुटला असला, तरी तो पुन्हा प्रस्थापित होण्याची शक्यताही आहे. शास्त्रज्ञांना तशी आशा आहे. बघू या काय होते ते.

पृथ्वीभोवती फिरताना ऑर्बिटरने एकूण पाच अत्यंत अवघड क्रिया पार पाडल्या होत्या. आणि त्यानंतर तो चंद्राकडे निघाला होता. तो टप्पादेखील सहा दिवसात यशस्वीपणे पार पडला. आता चंद्राच्या कक्षेत गेल्यावर ऑर्बिटरची भ्रमणाची कक्षा कमी करण्याची ऑर्बिट रिड्यूसिंगची-आवश्यकता होती. विक्रम अवतरणयान-लँडर, ऑर्बिटरपासून वेगळा होऊन चंद्रावर अलगद उतरायची म्हणजे सॉफ्ट लँडिंगची तयारी करू लागला. हे सॉफ्ट लँडिंग म्हणजे लँडरच्या आतील तांंत्रिक उपकरणांना तसेच रोव्हरला, कोणत्याही प्रकारे धक्का बसणार नाही, अशा प्रकारे उतरणे. सोमवारी विक्रम अवतरणयान-लँडर, हे चंद्राभोवती फिरणार्‍या ऑर्बिटर पासून वेगळे झाले. हे काम अतिशय अवघड होते, पण ते यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले, हे महत्त्वाचे. कारण चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती. पण अपेक्षेनुसार नंतरच्या प्रक्रिया पार पडल्या नाहीत.

‘चांद्रयान-1’ हे 22 ऑक्टोबर 2008 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते आणि याच मोहिमेमध्ये 14 नोव्हेेंंबर रोजीच्या निरीक्षणाने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लागला होता. त्योळी चंद्राचे मॅपिंगही करण्यात आले होते. 28 ऑगस्टला ही मोहीम पूर्ण झाली होती.

चांद्रयान-2 या मोहिमेत विक्रम अवतरणयानातून बाहेर पडणार्‍या प्रज्ञान भ्रमणयानाची कामे निश्चित करण्यात आली होती ती अशी, चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजे-मिनरल्स आणि रसायने-केमिकल्स घटकांची चाचणी करणे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पुरातन खडक आणि ज्वालामुखीच्या विवरांवरून चंद्राचा इतिहास समजू शकेल. तेथील अश्मास्थी-फॉसिल्स वरून सूर्यमालेतील सुरुवातीच्या जीवनावर प्रकाश पडू शकेल. प्रज्ञान भ्रमणयानात पुढील उपकरणे वापरण्यात येणार होती. 1) लेझर इन्ड्यूस्ड स्पेक्ट्रॉस्कोप (एल.आय.बी.एस.)़ हा बंगळुरुच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता आणि त्याचे काम अवतरण स्थळाजवळील घटकांची ओळख पटवणे हे होते. आणि 2) अल्फा पार्टिकल इंड्यूस्ड एक्स रे स्पेक्ट्रोस्कोप (ए.पी.आय.एक्स.एस.) हा अहमदाबादच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता. त्याचे काम अवतरण स्थळावरील घटक कोणत्या द्रव्यांनी तयार झाले आहेत, हे तपासण्याचे होते, आता हे सारे नव्यानेच सुरू करावे लागणार आहे, अर्थात यावेळच्या अनुभवाचा त्यासाठी मोठा उपयोग होईल, हे वेगळे सांगायला नको.

एक लक्षणीय बाब अशी की या मोहिमांबाबत सामान्य लोकांचे कुतूहल वाढत असल्याचे दिसल्याने बॉलीवूडमध्ये ‘मिशन मंगळ’ नावाचा चित्रपटही बनवण्यात आला होता. त्याचे कथानक अशा यानांच्या अनुभवावरच आधारलेले होते. प्रकल्पाला अपयश आल्याने शिक्षा म्हणून एका वैज्ञानिकाची बदली या प्रकल्पासाठी करण्यात येते आणि त्यात मोठ्या परिश्रमाने तो कसे यश मिळवतो ते दाखवण्यात आले होते. अक्षर कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू अशा कलाकारांचा समावेश त्यात करण्यात आला होता आणि त्याला चांगल्या दिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे प्रेक्षकांना तो आवडला होता आणि त्याला चांगले यश मिळाले होते. लोकांच्या अशा मोहिमांबाबतच्या उत्सुकतेत भर पडण्यासाठी आणि त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानातही वाढ होण्यासाठी अशा चित्रपटांना महत्त्व असतेच…