करंट अकाऊंट – व्यापार उद्योगाला सोयीचे !!

Mumbai
करंट अकाऊंट

करंट अकाऊंट हा एक आणखी खाते-प्रकार याला डिमांड डिपॉझीट खाते असेही संबोधले जाते. व्यापारी कामांसाठी अधिक सोयीचा म्हणून आजही बिझनेस-वर्तुळात लोकप्रिय आहे. ह्याला तसा अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध नाही. म्हणूनच आज आपण या खात्याची अधिक माहिती घेणार आहोत. कारण आज जरी नोकर्‍या उपलब्ध असल्या तरीदेखील स्वयं-रोजगार आणि व्यापार-उद्योग वाढणे हे गरजेचे आहे. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था सशक्त करायची असेल तर व्यापार आणि निर्यात हे उत्पादन-सेवा करणारे आणि उत्तम उत्पन्न निर्माण करू शकणारे दोन भक्कम स्त्रोत आहेत.

बँक म्हटली की खाते हे ओघाने येतेच कारण बँकेशी व्यावहारिक नाते प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खाते उघडणे किंवा ठेव ठेवणे वा कर्ज घेणे अशा प्रकारातून नातेसंबंध निर्माण करणे जरुरीचे असते.सर्वसाधारणपणे बचत खाते-सेव्हिंग्ज उघडणे हे एक बँकेशी प्राथमिक स्वरूपाचा संबंध येण्यासाठी आवश्यक असतो. बँक-खात्यांचे अनेकविध प्रकार आहेत, ज्याला हल्लीच्या मार्केटिंगच्या भाषेत ‘प्रोडक्ट’ किंवा साधन असे म्हटले जाते, तशी प्रत्येक बँकेची वेगवेगळी असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजदर,सवलती आणि सेवा-सुविधा देऊन विविध गरजांची पूर्तता केली जाते. करंट अकाऊंट हा एक आणखी खाते-प्रकार याला डिमांड डिपॉझीट खाते असेही संबोधले जाते. व्यापारी कामांसाठी अधिक सोयीचा म्हणून आजही बिझनेस-वर्तुळात लोकप्रिय आहे. ह्याला तसा अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध नाही.

म्हणूनच आज आपण या खात्याची अधिक माहिती घेणार आहोत. कारण आज जरी नोकर्‍या उपलब्ध असल्या तरीदेखील स्वयं-रोजगार आणि व्यापार-उद्योग वाढणे हे गरजेचे आहे. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था सशक्त करायची असेल तर व्यापार आणि निर्यात हे उत्पादन-सेवा करणारे आणि उत्तम उत्पन्न निर्माण करू शकणारे दोन भक्कम स्त्रोत आहेत आणि आर्थिक साक्षरता म्हणून केवळ शहरी भागात नव्हे तर ग्रामीण भागातील व्यवसाय करणार्‍या मंडळींना बँकिंगबद्दल अधिक माहिती असणे जरुरीचे आहे.

करंट अकाऊंट- मुळात अशा वेगळ्या खाते-प्रकाराची गरज का निर्माण झाली? ते आधी पाहूया.
१] बचत खाते हे एका विशिष्ट उद्देशाने निर्माण झालेले आहे, मूळ हेतू हाच की लोकांमध्ये पैसे साठवण्याची सवय लागावी. म्हणून तिथे व्याजरूपी उत्पन्न दिले जाते. परदेशात तसे अशा खात्यांवर व्याज दिले जात नाही! झिरो इंटरेस्ट खाते !! आपल्याकडे अमाप लोकसंख्या आहे आणि त्यामानाने लोकांना बचत करायची सवय नाही, तेव्हा प्रोत्साहन म्हणून असे देण्याची परंपरा आहे. अलीकडे आपल्याकडील बचत व्याजदर हा कमी-कमी होतो आहे आणि काही वर्षात शून्य टक्के होण्याची दाट शक्यता आहे.
२] बचत खाते हे व्यक्तिगतरीत्या बँकेबरोबर नाते निर्माण करण्यासाठी असते.
३] अशा खात्यातील व्यवहारांवर काही बंधन असतात. म्हणजे तुम्ही वारंवार पैसे काढू शकत नाहीत.
४] अनैतिक किंवा अनधिकृत व्यवसाय करणारे असे खाते उघडू शकत नाहीत. त्यात कोणताही अनधिकृत व्यवसाय आणि उलाढाल नक्कीच करू शकत नाहीत.
५] विद्यार्थी,गृहिणी,पगारदार-नोकरदार तसेच रोजंदारीवर काम करणारे ह्यांनी नियमितपणे आपल्या कमाईतील काही पैसे बाजूला ठेवावेत हा मुख्य हेतू.
६] आज कमावलेला पैसा उद्यासाठी ,अनपेक्षित खर्चासाठी बाजूला ठेवला जावा हा एक उद्देश.
करंट खात्याची ठळक वैशिष्ठ्ये-
व्याज-रूपी उत्पन्न मिळत नाही. क्वचित अशी सुविधा, तीदेखील थोडे टक्के व्याज मोठ्या खास कंपनीज करिता दिले जाते.
कितीही वेळा खात्यात पैसे /चेक भरणे आणि काढण्याची सोय, अर्थात रिझर्व्ह बँकेचे नियम-निर्बंधांचे पालन करणे अत्यावश्यक.

चेकबूक किंवा तत्सम स्टेशनरी प्रिंटिंग खर्च
एका कंपनीला एकापेक्षा अनेक अशी खाती उघडण्याची मुभा
सर्वसाधारणपणे ज्या कंपनीकडे अधिक कर्मचारी असतात,त्यांच्या वेतनासाठी वापर होतो.
उत्पादन करणार्‍या कंपनीच्या कच्चामाल पुरवठादार तसेच विक्रेते यांच्या पेमेंटकरिता सोयीचे.
अनेक-व्यवसाय करणार्‍या कंपनीसाठी अनेक खाती उघडणे सोयीस्कर.
सरकारी पेमेंट्स /कर-भरणा करण्यासाठी सोयीचे .
सर्व प्रकारच्या व्यापारी-व्यावसायिक बँकेत (सरकारी/सहकारी/परदेशी/प्रायव्हेट) करंट खाते उघडण्याची सोय उपलब्ध.
खात्यात सातत्याने रोकड पैसा -चेक्स येत जात असल्याने खाते प्रवाहित राहते. डेबिट आणि क्रेडिटची उलाढाल दिसून येते.
खात्यात जमा पैसे नसले तरी खर्च करण्याची सोय-म्हणजेच ओवरड्राफ्ट सुविधा मिळू शकते, जी कोणत्याही बचत खात्याला मिळत नाही. ते नेहमीच जमा-किमान जमा असलेले असावे लागते, खाते डेबिटमध्ये जावून चालत नाही.

करंट खाते कोणासाठी –
१] फर्म
२] छोट्या -मोठ्या कंपन्या (पब्लिक /प्रायव्हेट लिमिटेड)
३] सेवाभावी संस्था
४] पब्लिक इंटरप्राईझेस
५] अनेक व्यवसाय -ज्याची मोठी उलाढाल असते
६] उत्पादन करणार्‍या कंपन्या
७] एमएनसीज
अशाप्रकारच्या खात्याचा उपयोग /फायदे काय?
१] खूप मोठा व्यवसाय आणि विस्तार असेल तर खूप सोयीचे –
– अधिक डीलर्स असतील तर त्यांची पेमेंट्स -आवक-जावकसाठी .
– ज्यांचा भौगोलिक विस्तार मोठा असेल -राज्य किंवा राष्ट्र-पातळीवर काम करणार्‍या कंपनीसाठी असे खाते असणे मोलाचे .
– अनेक प्रकारची पेमेंट्स हाताळण्यासाठी .
– येणारे पैसे एकाच खात्यात जमा करण्याची आणि सोयीनुसार वापरण्याची सुविधा .
– कंपन्या आपल्या शेअरहोल्डर्सना लाभांश म्हणजे डिव्हिडंड देतात,त्याच्या वाटपासाठी.
– अनेक कंपनीज मुदत-ठेवी घेतात किंवा कर्जरोखे -त्यांच्यावरील व्याज देण्यासाठी बँक-खाते.
– विविध प्रकारचे कर भरण्यासाठी.
– कर्मचारी -पगार /भत्ते व बोनस देण्यासाठी.
२] पैसे काढण्यावर बंधन नसल्याचे मोठ्या उलाढालीसाठी उत्तम.
३] जिथे खाते असेल त्या मुख्य शाखेला होम-ब्रांच म्हणतात -तिथे अधिक सुविधा, शिवाय सर्व शाखांमध्ये विविध सुविधा.
४] बँकर चेक /पे-ऑर्डर /डिमांड ड्राफ्ट अशा सोयी उपलब्ध.
५] बँकेच्या अन्य सुविधा मिळू शकतात.
६] अशा खात्यातील व्यवहार आणि उलाढाली पाहून एखाद्या कंपनीच्या कारभार आणि प्रगतीबाबत बँक ‘गोपनीय अहवाल’ देऊ शकते.
७] बँकेकडून विविध प्रकारची कॉर्पोरेट लोन्स घेण्यासाठी -खाते वापराची माहिती /पडताळणी.
८] विविध बँकांकडे असलेली विविध व्यवसाय असलेल्या कंपनीज आणि त्यांची उलाढाल -विशेषतः जमा रक्कम आणि खर्च ह्याच्या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करता येतो आणि त्याद्वारे वेगवेगळ्या उद्योगाच्या प्रगतीची माहिती कळू शकते. देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ह्यांची प्रगती किंवा मंदी असल्यास त्याबाबत अंदाज येऊ शकतो. ह्याचा उपयोग सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी होऊ शकतो आणि अमुक एखाद्या डबघाईला येत असलेल्या उद्योगाला संजीवनी देण्यासाठी होऊ शकतो.
९] आधुनिक सोयी-इंटरनेट बँकिंग/मोबाईल बँकिंग आणि अ‍ॅप-सुविधा अधिक सोयीस्कर आणि वेळ-खर्च वाचवण्यासाठी.
१०] मोठ्या कंपनीच्या अनेक छोट्या सहयोगी कंपनी असतात,त्याची खाती एकाच बँकेत उघडल्यास खूपच सोयीचे होऊ शकते, सर्व आर्थिक कारभार आणि सरकारी देणी ह्यावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येते आणि कंपनीकडे उपलब्ध होत असलेल्या ‘निधी’चा रास्त पद्धतीने, अधिक व्याज न देता उपयोग होऊ शकतो, तसेच कंपनीच्या कच्चा माल पुरवठादार आणि विक्रेते ह्यांची बँक खाती शक्य असेल तर एकाच बँकेत उघडल्यास वेळेची बचत होऊ शकते.
करंट खात्यातील काही त्रुटी किंवा दोष-कोणतीही सेवा म्हटले सर्व-गुणयुक्त असतेच असे नाही, काही तरी अडचणी किंवा दोष असू शकतात. या प्रकारच्या खात्यातील काही उणिवा आपण पाहणार आहोत-

१] अधिककाळ पैसे पडून राहिल्यास व्याज-कमाई कमी होण्याची भीती.
२] चेक आणि अन्य स्टेशनरीसाठी अतिरिक्त खर्च.
३] पैसे हस्तांतरण किंवा खाते-वापरावर काही निर्बंध असू शकतात किंवा अधिक चार्जेस द्यावे लागतात, तेव्हा महाग वाटण्याचा संभव.
असे जरी असले तरीही आजतागायत करंट खाते हे व्यापारी आणि व्यावसायिकांना खूप सोयीचे असे वाटते आहे. सुदैवाने देशातील काळा पैसा कमी व्हावा आणि आपल्या अर्थव्यवस्थेतून अनधिकृत पैसा बाहेर पडावा आणि मुळातच व्यापारी व्यवहार रोखीत व्हावे हीच अपेक्षा.

करंट खाते कसे उघडाल – त्याकरिता खालील दस्तावेज नक्की लागतील,आपण माहिती घेऊया –
A] COMPANY-
१] कंपनीच्यावतीने संचालक मंडळाने पास केलेला ठराव -ज्यात अमुक बँकेत तमुक प्रकारचे खाते उघडण्याचा निर्णय आणि खाते कोण वापरणार ह्याचा अधिक तपशील.
२] संचालक -मंडळाची माहिती त्यांचे के.वाय.सी आणि फोटोज -प्यान-कार्ड्स [Pan-cards]
३] कंपनीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अर्थात दस्तावेज:-
मेमोरांडम आणि आर्टीकल ऑफ असोसिएशन, सर्टिफिकेट ऑफ
कोर्पोरेशन आणि त्यात असलेले संचालक-मंडळाचे अधिकार
४] आणि रजिस्टर्ड ऑफिसबाबत पुरावे
B] SOLE PROPRIETOR – सोल प्रोप्रायटरसाठी –
१] प्यान-कार्ड
२] निवासी पुरावा म्हणून दस्तावेज
C] PARTNERSHIP FIRM – भागीदारी फर्मसाठी खालील डॉक्युमेंट्स अपेक्षित –
१] पार्टनरशिप डीड-करार
२] भागीदारांची माहिती प्यान-कार्ड, आधार आणि दस्तावेज
ज्यांना उद्योग-व्यवसाय करायचा आहे त्यांनी नक्कीच करंट अकाऊंट उघडावा,अर्थात काय काय दस्तावेज लागतात हे तुम्ही बँकेत जाऊन माहिती घेऊन मगच खाते उघडू शकतात, पण असे खाते उघडाच ! बचत खाते व्यापारी कामासाठी वापरू नका ! कारण आपल्या वाढत्या बिझनेससाठी हा एक उपर्युक्त बँक खाते-प्रकार आहे.