घरफिचर्सधर्मनिरपेक्षतेची शिकवण देणारा फकीर!

धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणारा फकीर!

Subscribe

शिर्डीचे साईबाबा यांचा आज स्मृतिदिन. साईबाबा हे एक भारतीय फकीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात शिर्डी हे गाव आहे. या गावीच साईबाबांचे वास्तव्य होते. म्हणूनच त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणून ओळखले जाते. मनःशांती आणि आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी जगभरातील लाखो भाविक शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट देतात. शिर्डीतूनच साईबाबांनी जगाला श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला.

शिर्डीचे साईबाबा यांचा आज स्मृतिदिन. साईबाबा हे एक भारतीय फकीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात शिर्डी हे गाव आहे. या गावीच साईबाबांचे वास्तव्य होते. म्हणूनच त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणून ओळखले जाते. मनःशांती आणि आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी जगभरातील लाखो भाविक शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट देतात. शिर्डीतूनच साईबाबांनी जगाला श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. साईबाबांसाठी हिंदू-मुस्लिमांप्रमाणे सर्व जाती-धर्माचे लोक समान होते. त्यांनी जगाला धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. त्यासाठी ते सतत ‘सबका मालिक एक’ असेच बोलत. साईबाबांच्या जन्माबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लीम होते असे काही जण मानत. ज्यावेळी पहिल्यांदाच म्हाळसेच्या पतींनी साईबाबांना पाहिले. तेव्हा म्हाळसेच्या पतीने त्यांना साई अशी हाक मारली. त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी अशा मिश्रित भाषेत संवाद साधत. साईचा अर्थ ‘फकीर’ किंवा ’यवनी संत’ असा आहे. साईबाबांनी आजीवन जगभरातील लोकांना ‘सबका मालिक एक’ हाच उपदेश दिला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे. भारतातच नव्हे तर जगभरात साईबाबांचे भक्त आहेत. भारतात ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. ते अवतारी पुरुष होते असे त्यांच्या भक्तांचे म्हणणे होते. कुणी त्यांना दत्ताचा तर कुणी त्यांना शिवाचा नाहीतर विष्णूचा अवतार मानत. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यांनी त्यांचे गुरू खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्रात त्यांनी खाँसाहेब यांनी शिर्डीला दिलेल्या भेटीचे वर्णन केले आहे. त्यात त्यांनी साईबाबा कोण होते? याबाबत लिहिले आहे. शिर्डीचे वर्णन करताना ते लिहितात की, दाट जंगल, रातकिड्यांची किरकिर, रस्त्यांची सुविधा नाही, सापकिड्यांचा वावर, शेतीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य अशा वातावरणात एका चौकीत पेटत्या धुनीसमोर हातात चिलीम घेतलेले साईबाबा बसलेले होते. साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डीमध्ये उच्च शिक्षितांची ये-जा वाढली, पण तरीही बाबांची साधी राहणी बदलली नाही. राहणीमानाबरोबरच लोकांसोबतची त्यांची वर्तणूक कधीच बदलली नाही. त्यांनी कधीच श्रीमंत-गरीब भेदभाव केला नाही. श्रीमंताशी सलगीने वागणं आणि गरिबाला झिडकारणं असे साईबाबांनी कधीच केले नाही. कोण कसे आहे याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं. कोणाच्याही धर्मावर आक्रमण न करता त्यांनी प्रत्येकाला धर्मरत व्हायला शिकवलं. अनेक फकीर, हाजींप्रमाणेच शेकडो हिंदूसुद्धा त्यांचे भक्त होते. आजही आहेत. साईबाबांनीच शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात केली. एवढेच नाही तर अनेकांना विष्णुसहस्रनाम म्हणायला लावले. मशिदीचे नामकरण ‘द्वारकामाई’ असे केले. अशाप्रकारे सामाजिक सलोखा राखण्यासाठी अनेक प्रयोग साईबाबांनी केले. सामान्य जनांप्रमाणे अनेक राजकीय नेते, पुढारी साईबाबांची अवश्य भेट घेत. एकदा असेच लोकमान्य टिळक यांनी साईबाबांची भेट घेतली होती. तेव्हा साईबाबांनी लोकमान्य टिळक यांना उपदेश केला होता की, ‘लोक वाईट आहेत, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे ठेवा!’ म्हणजेच पुढारी, नेत्याने लोकानुनय करून तत्त्वाला मूठमाती देऊ नये असेच त्यांचे सांगणे होते. गुरुपौर्णिमेनिमित्त जगभरातील भाविक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतात.‘सबका मालिक एक’ म्हणत धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिलेल्या साईबाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी शिर्डी येथे समाधी घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -