घरफिचर्सहा नेता काळजात घर करून होता

हा नेता काळजात घर करून होता

Subscribe

राजकारण, साहित्य, सिनेसृष्टी या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिवंगत माजी पंतप्रधान यांना श्रध्दांजली अर्पित केली असताना अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर काहींनी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होत गेला या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी सिनेमा 'फर्ंजद'चे'दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू मांडताना स्वतःवर नकळतपणे झालेले संस्कार पोस्टद्वारे मांडले आहेत.

अटलजी गेले … नेमकं माझं काय हरवलं ?. काहितरी हरवलंय खास. उमलत्या वयात त्यांच्या कवितांचं पुस्तक हातात आलं. “मेरी इक्यावन कविताएँ” त्या कवितांमधलं काही कळत होतं. काही कळत नव्हतं. किंवा काही त्या वयापुरतं कळत होतं. काहि कविता त्यांच्या आवाजात ऐकू येत होत्या.

’आओ फिरसे दिया जलाएँ’ म्हणणारा हा नेता काळजात घर करून होता. फर्ग्युसन कॉलेज च्या मैदानावर त्यांची सभा ऐकायला गेलो होतो. १२ वीत असेन तेव्हा. आजूबाजूचा उसळालेला जनसागर पाहून आदरणीय लोकप्रियता काय असते ते तेव्हा कळलं होतं. इतक्या लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही हा कर्मयोगी म्हणत होता…
’ऊँचे पहाड पर पेड नहीं लगते, पौधे नही उगते, न ही घास जमती है, जमती है तो सिर्फ बर्फ, जो कफन की तरह सफेद और मौत की तरह ठंडी होती है…, मेरे प्रभु ! मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना… गैरों को गले न लगा सकूँ, इतनी रूखाई कभी मत देना…

- Advertisement -

पंतप्रधान हे आपल्या देशातलं दुसरं उच्चस्तरीय पद. हा माणूस कायम खूप मोठा आणि दूरस्थ वाटतो. पण अटलजी आपल्या घरातल्या आजोबांसारखे का वाटले असतील ? कोणास ठाऊक ? पण वाटले खरे ! पोखरण अणूचाचण्यांनंतर ऊर अभिमानानं भरून आला. अमेरीकेने उठलेल्या पोट्शूळातून आर्थिक निर्बंध लादले. दहावी होती. काय कळत असेल तेव्हा…, पण दूरदर्शनवर अटलजींचं भाषण ऐकलं की आम्ही भारतीय ऐकणार नाही. एकवेळचं अन्न खाऊन राहू पण देशच्या सुरक्षेत हयगय करणार नाही. १९६२ आणि १९७१ च्या युद्धाच्या कथा ऐकलेले आम्ही. त्या वेळच्या युद्धाचा अनुभव घेत असल्यासारखा फील आला होता. वा ! आपल्यालाही देशासाठी एकभुक्त रहायला मिळणार. अटलजी तेव्हा योद्धे वाटत होते.

’अमरीका क्या संसार भले हो विरूद्ध, लेकीन भारत का ध्वज नही झुकेगा,’
असं म्हणणारे…! पोखरणच्या पाठोपाठ कारगिलचं युद्ध झालं. नेतृत्वाची परीक्षा… पण त्यांनी त्यांच्याच कवितेच्या ओळी खर्‍या करून दाखवल्या ’एक हाथ में सृजन दूजे में प्रलय लिए चलते हैं! सभी कीर्ति ज्वाला में जलते हम अँधियारे में जलते हैं! आँखों में वैभव के सपने पग में तूफानों की गती हो, राष्ट्रभक्ती का ज्वार न रूकता आये जिस जिस की हिम्मत हो!
पुढे सत्ता गेली आणि अटलजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय पटलावरून जणू नाहिसेच झाले. माझ्यासारखे कित्येक तरूण कुठल्याही पक्षाच्या नवीन नेतृत्वात अटलजींना शोधत राहिले. कित्येक निर्णयांवर अटलजी काही बोलत असतील का ? ’का … न मैं चुप हूँ न गाता हूँ,’ असं म्हणत असतील ? कुठल्याही वोट बँकेची पर्वा न करता, ’हिंदू तन मन हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय’, असं म्हणणारा आणि सर्व जातिधर्म आणि राजकीय पक्षांचा आदर मिळवलेला हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला.

- Advertisement -

विस्मृतीत नक्की नाही. कारण ’कौन कौरव कौन पाण्डव टेढा सवाल है, चारो ओर शकुनी का फैला कूटजाल है.’ अशा आजच्या सामाजिक अवस्थेत कदाचित त्यांचं निष्कलंक जीवन आपल्याला प्रेरणा देत राहिल. मा. अटलजींनी म्हटलंय त्याप्रमाणे माझ्यासारख्या साहित्य उपासकाला प्रेरणा नक्कीच मिळत राहिल. ’टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अन्तर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नही मानूँगा, रार नयी ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ’
विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली ….
(कदाचित हीही पात्रता नसलेला एक …)


-दिग्पाल लांजेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -