घरफिचर्सशेणाच्या गवळणी आणि पेंद्या

शेणाच्या गवळणी आणि पेंद्या

Subscribe

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मातीच्या कुंड्या विकत आणल्या जातात किंवा त्या घरी बनवून त्यात बताशे टाकतात, त्यावर दिवा लावला जातो. याची पूजा मनोभावे शेतकरी करतात. घरातील मौल्यवान वस्तू, वाहन, अवजारे याचीही पूजा केली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते. शाळकरी मुले ही किल्ला बनवण्यात व्यस्त असतात.

दिवाळी हा सण साजरा होत असताना सर्व कुटुंबे एकत्रित येतात. पश्चिम महाराष्ट्र विशेषतः ग्रामीण भागात दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. शेणाच्या गवळणी, पेंद्या तयार करून त्याची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे जनावरं नाहीत, ते मातीच्या गवळणी आणि पेंद्या तयार करतात. काही गावांमध्ये या काळात जनावरांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर नरकचतुर्दशीच्या दिवशी भाऊबीज साजरा करण्याची पध्दत असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, याच पट्ट्यात अनेक ठिकाणी दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. जसजसे आपण पश्चिम महाराष्ट्रात फिरू त्याप्रमाणे संस्कृती बदलते. दिवाळीच्या काही दिवस अगोदर ग्रामीण भागातील नागरिक हे आपले घर स्वच्छ करून घरातील भांडे धुवून घेतात. त्याचप्रमाणे वस्तूही. घराची रंगरंगोटी करून घरावर डेकोरेशन केले जाते. ग्रामीण भागात काही ठिकाणी नागरिक दिवाळीच्या सणाला कुंभाराकडून विशेष पणत्या बनवून घेतल्या जातात. त्या घराच्या सजावटीमध्ये भर घालतात. घराच्या अंगणात शेणाने सारवून त्यावर विविध रंगांची रांगोळी काढली जाते.

- Advertisement -

अगदी शहरात जाऊन अवघ्या कुटुंबाला नवीन कपडे आणले जातात. यामध्ये लहाणग्यांचा मोठा वाटा असतो. वसुबारसच्या दिवशी शेतकरी हे आपल्या गायीचे पूजन (गोपूजन) करतात. दरम्यान, काही ठिकाणी दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हशींचे पूजनही केले जाते. वर्षभर त्या शेतकर्‍याला दूध देत असल्याने कृतज्ञता त्याद्वारे व्यक्त केली जाते. घरांना पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या फुलांची तोरणं लागलेली पाहायला मिळतात. अवघं घर फुलांनी सजवलं जातं. ग्रामीण भागातील फराळामध्ये सहसा चिवड्याचे विविध प्रकार, पारंपरिक राव्याचे लाडू, करंजी, गुलाम जाम हे बनवलं जातं.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मातीच्या कुंड्या विकत आणल्या जातात किंवा त्या घरी बनवून त्यात बताशे टाकतात, त्यावर दिवा लावला जातो. याची पूजा मनोभावे शेतकरी करतात. घरातील मौल्यवान वस्तू, वाहन, अवजारे याचीही पूजा केली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते. शाळकरी मुले ही किल्ला बनवण्यात व्यस्त असतात. अनेक ठिकाणी किल्ला बनवण्याची स्पर्धा देखील भरवली जाते. दरम्यान, पाडव्याच्या दिवशी पतीपत्नी जोडीने बसून पूजा करतात. पत्नी पतीला ओवाळते. शहरात राहणारे कुटूंबातील सदस्य दिवाळी सणाला एकत्रित येतात. हे या सणाचे विशेष वैशिष्ठ्य होय. लहान थोर आणि जेष्ठ मंडळी समूहाने जमा होऊन गप्पा गोष्टी करतात. ग्रामीण भागात एक वेगळीच दिवाळी साजरी करण्याची पद्धत असते ती शहरात दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -