घरफिचर्सएरॉल फ्लिन : साक्षात रॉबिन हूड!

एरॉल फ्लिन : साक्षात रॉबिन हूड!

Subscribe

एरॉल फ्लिन म्हटलं की त्याच्या चित्रपटांपैकी इतर कोणताही चित्रपट न आठवता, प्रथम नाव येतं ते द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ रॉबिन हूड चं. कारण त्या चित्रपटानंतर तीच त्याची ओळख बनली होती. खरा रॉबिनहूड काही शतकांपूर्वीचा. तो कसा दिसत असेल, याचा अंदाज त्याच्या साहसकथा वाचताना त्या पुस्तकांतील चित्रांवरुन लोक करत असत.

एरॉल फ्लिन म्हटलं की त्याच्या चित्रपटांपैकी इतर कोणताही चित्रपट न आठवता, प्रथम नाव येतं ते द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ रॉबिन हूड चं. कारण त्या चित्रपटानंतर तीच त्याची ओळख बनली होती. खरा रॉबिनहूड काही शतकांपूर्वीचा. तो कसा दिसत असेल, याचा अंदाज त्याच्या साहसकथा वाचताना त्या पुस्तकांतील चित्रांवरुन लोक करत असत.पण वॉर्नर ब्रदर्सचा लोक कथेवर आधारलेला द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ रॉबिन हूड चित्रपट प्रकाशित झाला आणि लोकांना एकदम वाटलं आपली कल्पनाच प्रत्यक्षात उतरली आहे. लोकांच्या मनावर त्या चित्रपटानं गारूड केलं. रॉबिनवर प्रेम करणार्या मरियमच्या भूमिकेत होती ऑलिव्हिया डी हॅविलँड. (या आधी एरॉल फ्लिन-ऑलिव्हिया ही जोडी पाच चित्रपटांत दिसली होती. नंतरही तीन चित्रपटांत दिसली.) अतिशय सुंदर आणि नाजूक ऑलिव्हिया डी हॅविलँड ही साक्षात मरियमच काटते. तसं पाहायला गेलं, तर सर्व पात्रयोजनाच अगदी सुयोग्य म्हणावी अशी होती. टीकेला वाव नव्हता, कारण सारी पात्रं जणू काही कांदबरीतून थेट रुपेरी पडद्याकर अवतरल्यासारखी वाटत होती. अशा या पात्रयोजनेमुळे चित्रपटाचं यश निश्चित झालं होतं. चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला हे केगळं सांगायला नकोच.

चित्रपटाचा निर्माता हाल बी वॉलिस हा कल्पक आणि धाडसी होता. त्यामुळेच त्यानं तेव्हा खूपच खर्चिक असलेल्या टेक्निकलरमध्ये निर्मिती करायचं ठरवलं. तसंच जेम्स कॅग्नी सारखा स्टार भांडणामुळं रागावून स्टुडिओ आणि अर्थातच चित्रपट सोडून गेला, तेव्हा कॉलिसनं रॉबिन हूडची भूमिका एरॉल फ्लिनला देण्याचा निर्णय घेतला. त्याआधी फ्लिनचा कॅप्टन ब्लड हा चित्रपट हिट झाला होता. आणि त्यामुळेच तेव्हापासून हॉलीवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा नट असा लौकिक त्याला मिळाला होता. वॉलिसनं त्याआधी पटकथा लेखकालाही काढून टाकलं होतं कारण त्यानं आपल्या कथेत साक्षात नायिकेची, अर्थात मरियमची भूमिकाच वगळली होती. आधी दिग्दर्शन ज्याच्यावर सोपकण्यात आलं होतं, तो विल्यम कीगली आजारी पडल्यानं वॉलिसनं दिग्दर्शकही बदलला आणि ती जबाबदारी कर्टिझवर सोपकली.

- Advertisement -

मात्र काहींच्या म्हणण्याप्रमाणं कीगलीनं बाह्यचित्रण केलं तर किर्टझनं स्टुडिओतील तसंच अ‍ॅक्शन सीनचं चित्रण केलं. पण ते काहीही असलं तरी चित्रपट अप्रतिम बनला खरा आणि त्यानं टेक्निकलला पूरेपूर न्याय दिला असंही तेव्हा कौतुकानं सांगितलं जात होतं.शेरवूड जंगलाचं चित्रण स्टुडिओच्याच रँचवर करण्यात आलं. मुख्य म्हणजे छायाचित्रकारांनी अजोड काम केलं आणि शेरवूडचं जंगल जसं काही जिवंत केलं. पण नुसता तांत्रिकदृष्ट्या चांगला असला, तरी केवळ तेवढ्यामुळं चित्रपट यशस्वी होत नाही. त्यासाठी चांगली कथा आणि तिच्यातील नायक नायिकेबरोबरच भूमिका साकार करायला तितकेच चांगले सह-कलाकार लागतात. तसे ते मिळाले. क्लॉड रेन्स (प्रिन्स जॉन), बासिल रॅथबोन (खलपुरुष गाय ऑफ गिसबर्न) आणि रॉबिनचे रंगेल गडी म्हणून पॅट्रिक नॉवेल्स (विल स्कारलेट़), युजीन पॅलेट (संन्यासी टक) आणि अ‍ॅलन हेल (लिटल जॉन) यांची योजना करण्यात आली होती.

मुख्य म्हणजे सध्याप्रमाणे हॉलिवूडच्या सुवर्णकाळात सुपरस्टावरच लक्ष केंद्रित न करता सर्वांना योग्य ते महत्व देण्यात येत असे त्याप्रमाणं ते दिलं होतं. त्यामुळं चित्रपटाची खुमारी वाढली होती.रॉबिन हूडची गोष्ट बहुतेक सर्वांना माहीत असेलच. ज्यांना माहीत नसेल, त्यांनी (स्क.) भा. रा. भागवत यांनी मराठीत आणलेली ही कादंबरी : रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी अवश्य वाचावी. चित्रकार दिनानाथ दलालांनी मूळ कादंबरीतील चित्रे समोर ठेवून काढलेली त्यातील चित्रे आपल्याला थेट त्या काळातील शेरवूडच्या जंगलात व अन्यत्र घेऊन जातात. नेमबाजीची स्पर्धा हे त्या कथेप्रमाणेच चित्रपटाचंही मोठं आकर्षण आहे. ते कादंबरीप्रमाणंच खुमासदार झालं आहे. चित्रपटात एकच बदल करण्यात आला होता व तो रॉबिन मरियमच्या मीलनानंतर संपवण्यात आला होता. कादंबरीत मात्र रॉबिनची अखेर इतकी प्रभाकी आहे की डोळयांतून पाणी न येणारा वाचक विरळाच. चित्रपटात मात्र रिचर्ड सत्राधारी बनल्यानंतर रॉबिन मार्ग बदलतो आणि सैन्यात दाखल होतो आणि मग मरियम आणि रॉबिन विवाह करतात. अर्थात या सुखद शेवटामुळं चित्रपटाला कदाचित जास्त दाद मिळाली असेल. (बर्याच वर्षांनी रॉबिन अँड मरियम नावाचा एक चित्रपट विनोदी अंगाने काढण्यात आला होता. रिचर्डबरोबर युद्धावर गेलेला रॉबिन आता परतला असून तो वयस्कर झाला आहे. त्याची आणि मरियमची दीर्घकाळानंतर गाठ पडते, रॉबिनला पहिल्याप्रमाणं साहसे जमत नाहीत व त्यातून मोठी धमाल होते. मरियम देखील रॉबिनची फिरकी घेते. इ. यात शॉन कॉनरी आणि ऑड्री हेपबर्न यांच्या भूमिका धमाल होत्या.

- Advertisement -

रॉबिन जंगलात राहून बेकायदा शिकार करत असतो त्याचे सहकारीही त्याच्याच प्रमाणे कायद्यापासून बचावण्यासाठी जंगलात लपून बसलेले असतात. रॉबिनला दरबारात येण्याचे जॉनचे फर्मान येते आणि दरबारात शिक्षा होणार हे माहीत असूनही मोठ्या आत्मविश्वासानं जातो. तेथे सत्ताधारी जॉनला त्यानं त्याचा भाऊ रिचर्ड याचा विश्वासघात करून हे सत्तापद बळकावले आहे, असे ठणकावून सांगतो. आपला रस्ता अडवून सैनिक तलवारी घेऊन उभे आहेत हे पाहूनही तो डगमगत नाही का विचलित होत नाही. त्याच वेळी मरियन त्याला पहिल्यांदा पाहते आणि हाच तो आपला जीवनसाथी, असा कौल तिचं हृदय दिला देतं. त्याचवेळी ती आपला गिसबर्नशी ठरलेला विवाह मोडण्याचा निर्णय घेते. गिसबर्नचा रॉबिनवरचा राग अधिकच काढतो. मग नेमबाजीच्या स्पर्धेत रॉबिन लक्ष्यभेद करताना प्रतिस्पर्ध्याच्या बाणाला भेदून जातो तो प्रसंग पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा चित्रपट बघत. रॉबिन आणि गिसबर्न यांच्यातील तलवारीचे द्वंद युद्धही आकर्षणच ठरले होते. चित्रपटातील प्रेमप्रसंग – प्रणयदृष्येही साधी स्पष्ट आणि थेटपणे घेतलेली आहेत. रती मदनाची शोभावी अशी जोडी असल्यामुळं वेगळं काही करण्याची आवश्यकताच दिग्दर्शकाला भासली नसावी.असा हा अप्रतिम चित्रपट संधी मिळेल तेव्हा चित्रपटगृह, कोणती तरी वाहिनी, सीडी, डीव्हीडी का केबलकर अवश्य पहावा असा!

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -