घरफिचर्स‘एक्स्पेन्सेस रेशिओ कमी करण्याचा निर्णय फायद्याचा !!

‘एक्स्पेन्सेस रेशिओ कमी करण्याचा निर्णय फायद्याचा !!

Subscribe

एखादे गुंतवणूक साधन हे लोकांच्या मनात रुजण्यासाठी ताजे-टवटवीत ठेवावे लागते. एखाद्या रोपट्याला जसे नेहमी पाणी आणि सूर्यप्रकाश मिळावे लागते, तसे एखाद्या प्रोडक्टबाबतसुद्धा असते. सतत जाहिरात आणि बोलबाला असला की पब्लिक आकर्षित होतो आणि खरेदी वाढते. हाच अनुभव बँकेची बचत खात्याची स्कीम असो किंवा फिक्स्ड डिपॉझीट व्याजदर जाहिरात असो! लोकांना समजावे म्हणून जाहिरात किंवा अन्य प्रसारमाध्यमांचा योग्य असा वापर करावाच लागतो. अन्यथा एखादी योजना कितीही आकर्षक आणि लाभदायक असली तरीही विकली जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे. मार्केटिंग करणे हा आजच्या वेगवान जगासाठी आवश्यक असे हत्यार आहे. असे म्हटले जाते की ‘बोलणार्‍याची मातीदेखील विकली जाते आणि गप्प राहणार्‍याचे सोनेही पडून राहते !’ सेबी भांडवली बाजाराचे नियमन करणारी – या नियंत्रकांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या संचालकांच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले, पैकी एक निर्णय हा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या हिताचा आहे.त्याबद्दल आपण अधिक माहिती करून घेणार आहोत.

म्युच्युअल फंडात अधिकाधिक लोकांनी गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवावेत या हेतूने आणि छोट्या गुंतवणूकदारांचे हित जपले जावे अशा उद्देशाने सेबीने नुकतेच काही निर्णय घेतले. सर्व म्युच्युअल फंडांनी लोकांना आपले पैसे म्युच्युअल फंडात ठेवण्यासाठी प्रवृत्त करावे याकरिता काही सवलती द्याव्यात असे सुचवले आहे. असे फंड जे गुंतवणूकदारांकडून फी घेतात,ती जर कमी केले तर घेणारे प्रोत्साहित होतील. प्रत्येक फंड हे गुंतवणूकदारांकडून काही फी घेतात, त्याला टी.इ.आर. म्हणजेच ‘टोटल एक्स्पेन्सेस रेशिओ’ ढेींरश्र एुशिपीशी ठरींळे असे म्हटले जाते. फंडाच्या खर्चाचा बोझा पैसे गुंतवणार्‍या ग्राहकांवर पडू नये अशा हेतूने सेबीने हा भार कमी करण्याचा आदेश दिला आहे. त्याबद्दलची अधिक माहिती खालीलप्रमाणे :-

- Advertisement -

आजवर कोणत्याही फंडातील विविध योजनात पैसे गुंतवताना आपल्याला सव्वा दोन टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्के रक्कम ही आपल्याला फी म्हणजेच शुल्क म्हणून द्यावी लागत होती. हा एक प्रकारचा सर्वसामान्य गुंतवणूक करू इच्छिणार्‍या मंडळींवर ‘आर्थिक बोझा’च म्हणता येईल. हा हलका केला तर अनेकांना म्युच्युअल फंडात आपले पैसे ठेवावेसे वाटतील. कारण केव्हाही आर्थिक सूट किंवा सवलत ही आकर्षित करणारी असते. आपली ग्राहक म्हणून जी मानसिकता बनलेली आहे, ती नेहमीच डिस्काऊंट, बोनस अशा सोयी आणि सवलतींच्या शोधात असते. ती मिळवण्यासाठी आपण कोठेही जाण्यास तयार असतो. कारण आपल्याला आपले ‘चार पैसे’ वाचवायचे असतात आणि काही लाभ पदरात पडला असे समाधान मिळते.
सेबीच्या नवीन निर्णयानुसार खालील फी-दर निश्चित करण्यात आलेले आहेत.

1 क्लोज एंडेड इक्विटी स्कीम उश्रेीश एपवशव र्र्एिींळीूं डलहशाश- या योजनांच्या खरेदीवर कमाल सव्वा टक्के अशी फी द्यावी लागेल
2 इक्विटी व्यतिरिक्त योजना- यावर एक टक्का फी आकारली जाईल
3 ओपन एंडेड इक्विटी योजना जशिप एपवशव र्र्एिींळीूं डलहशाश – अशा खुल्या योजनांत गुंतवणूक करणार्‍या मंडळींना कमाल फी सव्वा दोन टक्के द्यावी लागेल

- Advertisement -

टी.ई.आर – एक्स्पेन्सेस रेशिओ म्हणजे काय ते थोडे समजून घेवूया :-
म्युच्युअल फंड हे उभे करण्यासाठी अनेक घटक एकत्रितरित्या काम करत असतात, त्याकरिता खर्च करावा लागतो. फंडाची उभारणी, व्यवस्थापन यासाठी पैसा लागतो. याला फंड एक्स्पेन्सेस-फंडासाठी होणारा खर्च असे म्हटले जाते. यात खालील खर्च गृहीत धरले जातात :-

1 व्यवस्थापन शुल्क 2 प्रवेश – फी 3 उलाढाल खर्च 4 मालमत्तेसंदर्भात होणारा खर्च 5 अन्य फी-खरेदी/पुन:खरेदी 6 विक्री आणि प्रमोशनसाठी केला जाणारा खर्च 7 एजंट कमिशन 8 रजिस्ट्रार फी 9 फंड व्यवस्थापनबाबत अनुषंगिक खर्च
म्युचुअल फंड उत्पन्नातून हा सर्व खर्च वजा केला जातो आणि नफा निश्चित केला जातो. एकूण निधीच्या प्रमाणात हा रेशिओ निश्चित करण्याचे सेबी धोरण ठरवत असते.

थोडक्यात म्हणजे फंड व्यवस्थापकांना जमलेला निधी नीटपणे गुंतवून त्यावर नफा कमावण्यासाठी जी काही व्यावसायिक कामे -खर्च करावे लागतात, त्याचा भार हा तुम्हा-आम्हावर टाकला जातो. अर्थातच आपल्या गुंतवलेल्या रकमेनुसार, त्यापेक्षा अधिक पैसे कोणतीही म्यु.फंड कंपनी आकारू शकत नाही. कोणताही अतिरिक्त खर्चाचा भार पैसे गुंतवणार्‍या ग्राहकावर पडू नये हाच मुख्य हेतू आहे. याकरिता सेबी -नियंत्रक संस्थेचा अंकुश असतो. बाजारातील उलाढाली, अर्थव्यवस्थेतील होणारे बदल आणि गुंतवणूकदारांचा कल अशा काही घटकांचा नियमितपणे विचार करून सेबी वारंवार मार्गदर्शक तत्वे जाहीर करीत असते.

सर्वसाधारणपणे टी.इ.आर. हा एक टक्का – 1% टक्का इतका असतो
उदाहरणार्थ – तुम्ही रु. 5000/- म्युच्युअल फंड योजनेत गुंतवले तर टी.इ.आर. हा एक टक्का म्हणजेच रु. 50/- हे तुम्हाला प्रती-वर्षी व्यवस्थापन केले त्याची फी म्हणून द्यावे लागतात.
हा खालील पद्धतीने काढला जातो –
एकूण फंडाचा वार्षिक कोस्ट /खर्च

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडची कोणतीही योजना स्वस्त-रास्त किमतीमध्ये मिळाली तर ते त्याची खरेदी करतील आणि आपले पैसे अन्य गुंतवणूक साधनांकडे वळवणार नाहीत, हा या मागचा हेतू आहे. शिवाय म्युच्युअल फंडाद्वारे मिळणारा परतावा वाढावा हाही एक हेतू आहे. दुहेरी हेतूंचा उद्देश हाच की लोकांनी आपले पैसे म्युच्युअल फंड योजनांत वळवावे. फंडांचा खर्च नियंत्रित ठेवल्याने उत्पन्न वाढण्यास हातभार लागू शकतो आणि याचा फायदा थेट गुंतवणूकदारांना होऊ शकतो. म्हणूनच सेबीने अलीकडेच हा धोरणात्मक बदल जाहीर केला. आणि अर्थातच आता म्युच्युअल फंडात पैसे ठेवताना अशी फी कमी केल्याचा अनुकूल परिणाम दिसू लागलेला आहे. नजीकच्या भविष्यात म्युच्युअल फंड गुंतवणूक वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे टी.इ.आर.चा थेट न्हावछ-तशी संबंध असतो, म्हणजे जेव्हा टी.इ.आर. कमी असतो तेव्हा न्हाव छ-तअधिक असतो. या उलट जेव्हा टी.इ.आर. जास्त-खर्च जास्त तेव्हा त्या म्युच्युअल फंडाचा न्हावछ-त खाली असतो.हे सूत्र नेहमीच लक्षात ठेवावे. प्रत्येक फंडातर्फे एक्स्पेन्सेस वजा करून रोजच्या रोज न्हाव छ-त हा जाहीर केला जातो

प्रत्येक म्युचुअल फंडाचा टी.इ.आर. सर्व लोकांना कळावा या हेतूने म्युच्युअल फंडच्या संकेत-स्थळावर यादी जाहीर केलेली असते. आपणदेखील एक उत्सुकता म्हणून जरूर पाहू शकतो. तेव्हा आपण एक छान गुंतवणूक पर्याय म्हणून आपल्याला योग्य वाटेल अशा म्युच्युअल फंड योजनेचा नक्कीच विचार करुया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -