घरफिचर्ससण-व्यवसाय आणि युवांचा ‘आधार’

सण-व्यवसाय आणि युवांचा ‘आधार’

Subscribe

सप्टेंबरमध्ये साधारण मोकळीक मिळते आणि बरोबर जत्रा-उरूस सुरू होतात. हा केवळ योगायोग नाही. ‘इट इज प्लान बिझिनेस मॉडेल’. बरोबर ह्या काळात सुरू होणार्‍या या उरूस-जत्रेत जास्तीत जास्त रिलॅक्सेशन, स्वतःच मनोरंजन करण्याची भरपूर संधी ते ही कमी पैशात उपलब्ध असते. या काळात फार मोठ्या खरेदी होत नाही बरं का! यात मुलांची खेळणी, घरातील किचनचे, कटलरी सामान आणि खाण्या-पिण्याची रेलचेल असते.

जव्हारमध्ये नुकताच उरूस पार पडला. भारत हा अजूनही गावांमध्ये राहतो. तिथूनच घडतो आहे याचा प्रत्यय मला आला. जव्हारचा हा उरूस फारच प्रसिद्ध आहे. पूर्वीचा ठाणा आणि आताचा पालघर जिल्हा या उरुसासाठी फारच प्रसिद्ध आहे. मी इथे जूनपासून राहायला आले तेव्हापासून अनेक प्रसंगांतून या उरूसाचा संदर्भ येत होता. जसे की, इथे जुना दर्गा आहे, त्याच्या वाटेवरून जाताना हे काय आहे याची माहिती सहकार्‍याला विचारली, तर त्याला त्या वस्तूची फार माहिती नव्हती. पण तिथे आता लवकरच उरूस होणार आहे हे मात्र तिने आवर्जून सांगितले.

अनेक गावांमध्ये असे ‘उरूस’ ‘जत्रा’ प्रसिद्ध असतात. भारतात पारंपरिक दोन धार्मिक प्रवाह आहेत, एक हिंदू आणि दुसरा मुस्लीम. मुख्यत्वे करून या दोन धर्मांचे असे सार्वजनिक उत्सव जोरात साजरे होताना दिसतात. अर्थात नाशिकला जसा ‘बडी दर्ग्याचा उरूस’ प्रसिद्ध आहे, तितकाच नाशिकरोडला भरणारी ‘बाल येशूची जत्रा’ ‘नवरात्रीत होणारी देवीची जत्रा’ ही तितकीच प्रसिद्ध आहे आणि या उरूस-जत्रा ह्या त्या त्या धर्मापुरत्या मर्यादित नाहीत. अख्ख गाव त्यात सहभागी होतं. या उरूसात असणारे ताजिया किंवा जत्रेतील झेंडे किंवा ज्या दर्ग्याभोवती, मंदिराभोवती हे उरूस-जत्रा भरतात त्याचे मुख्य सेवेकरी हे बर्‍याच वेळा परधर्मीय असतात किंवा त्या त्या गावातील इतर धर्मियांकडे असतात. आपल्याकडे ‘पीर’ हा देव असाच कॉमन देव आहे. बर्‍याच गावात असलेले हे ‘पीराचे ठाणे’ कुठल्यातरी हिंदू कुटुंबाकडे असते.

- Advertisement -

यासर्व स्थानिक सणांचा काळ जरी आपण बघितला तर त्याची त्या त्या समाजासाठी असलेली गरज लक्षात येईल. जव्हार या पट्ट्यात किंवा एकूणच इकडच्या डोंगर पट्ट्यात पाऊस सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी पासूनच संपूर्ण समाज हा प्रचंड बिझी असतो. इकडे जास्तीत जास्त शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि त्याशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधनही फार उपलब्ध आहे. मुख्यत्वे भात शेती, ती ही पारंपरिक पद्धतीने करण्याची पद्धत म्हणजे उदा. जेव्हा भाताचे रोप एका ठिकाण वरून दुसर्‍या ठिकाणी किंवा त्याच शेतात सगळीकडे पसरवण्यासाठी, लावण्यासाठी नेतात तेव्हा ती रोपं म्हणजे त्याची मूळ धुवून घेतली जातात. खर तर एका मातीतून दुसर्‍या मातीतच लावायचे असते, कितीही सांगितले तरी हे धुण्याचे काम थांबत नाही. रोपं एका ठिकाणी आणि लावणीला खूप लांब न्यायची असतात तेव्हा कदाचित मातीचे वजन कमी करण्यासाठी मूळ धुतले तर फायद्याचे होते पण जेव्हा तिथल्या तिथे रोपं पसरवायची असतात तेव्हा का धुवायची हेच कळत नाही. याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण आधीच अबोल असलेला इथला आदिवासी अधिकच गप्त होता. समजावून सांगितले तरी प्रक्टिसमध्ये काहीही फरक पडत नाही.

भात शेतीमध्ये सुरुवातीला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला कामात सहभाग घ्यावाच लागतो, कारण जेवढी माणसे जास्त तेवढा कामाचा उरक जास्त, तेवढे बाहेरून घ्यावयाची मदत कमी होते, म्हणून आमच्याकडे म्हातार्‍या स्त्री पुरूषांपासून ते फॅशनेबल तरूण मुलां-मुलींनाही शेतातील सर्व कामे येतात आणि ते सर्व या सर्व कामांमध्ये मनापासून गुंतलेले असतात. शहरात कॉलेजला जातो किंवा जाते या नावाखाली शेतातल्या मजुरीत घरातल्या तरूणांचा सहभाग हा आमच्याकडच्या तरूणांपेक्षा कमी असतो. जिथे गरिबी आहे, बाहेरून मजूर घेणे परवडत नाही किंवा शेती मोठी तिथं अजूनही शहरातील मुले किंवा शिक्षणासाठी शहराजवळच्या ग्रामीण भागातून येणारी मुलं सुट्ट्या घेतात आणि शेतात वेळ देतात.

- Advertisement -

आमच्याकडे साधारण १५ मेपासून ते ऑगस्ट अखेरपर्यंत संपूर्ण गावच शेतीत बिझी असत. याकाळात शेती सोडून दुसरी काहीही चर्चा, गप्पा, कृती नसते. हा काळ संपूर्ण कष्टात जातो. सतत पावसात, चिखलात जातो. सप्टेंबरमध्ये साधारण मोकळीक मिळते आणि बरोबर जत्रा-उरूस सुरू होतात. हा केवळ योगायोग नाही. ‘इट इज प्लान बिझिनेस मॉडेल’. बरोबर ह्या काळात सुरू होणार्‍या या उरूस-जत्रेत जास्तीत जास्त रिलॅक्सेशन, स्वतःच मनोरंजन करण्याची भरपूर संधी ते ही कमी पैशात उपलब्ध असते. या काळात फार मोठ्या खरेदी होत नाही बरं का! यात मुलांची खेळणी, घरातील किचनचे, कटलरी सामान आणि खाण्या-पिण्याची रेलचेल असते. त्यानंतर येणार्‍या दिवाळी-दसर्‍याच्या खरेदीची ही रिहर्सल असते, त्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्याचे काम अशा जत्रा-उरूसात केली जाते. पूर्वी पासूनच हे मॉडेल चालत आले आहे. त्यात सर्वांचाच फायदा असतो. त्यामुळेच जागतिकीकरणाच्या सर्व प्रकारच्या रेट्यानंतरही हे मॉडेल शिल्लक राहिले आहे. ह्या जत्रांनंतर कापणीचा काळ सुरू होईल, धान्य घरत येवून पडेल आणि मग दिवाळी दशहरा सुरू होईल. शेअर मार्केटच्या हिशेबात हे नाही पण ग्रामीण भागाच्या उलाढालीत मात्र ह्याचा मोठा सहभाग आहे. अनेक व्यापारी ह्या अशा उरूसामध्ये जत्रेत दुकान लावण्यासाठी एका गावावरून दुसर्‍या गावात भटकंती करीत असतात.

आपल्याकडेच अनेक समुदाय अशा जत्रांमध्येच उत्पन्न कमवत असतात. उदा. सर्व जत्रांमध्ये दिसणारे डूमक, ढोलक बनवून विकणारे समाज आजही सर्व उरूस किंवा जत्रांमध्ये दिसतात. त्या त्या जत्रांच्या पंधरा दिवस-महिना आधी ते डूमक किंवा ते छोटंस ढोलकं बनवलं जातं. फार बनवून ठेवले जात नाही बरं! एक 50-100 तयार असतात, बाकीचे रॉ मटेरियल तयार ठेवतात जशी गरज लागेल तसे आपल्या समोर त्या दुकानातच मागच्या साईडला बनवण्याचे अखंड काम सुरू असते. कुटुंबातील काही सदस्य विशेषतः स्त्रिया विकण्याचे काम करतात आणि पुरूष मागच्या साईडला मॅन्युफॅक्चरिंग करीत असतात. हीच कथा पिपाण्या, फुगे वाले, प्लास्टिकचे खेळणी वाले यांचे बाबतीत असते. सर्वांनी अशा दुकानातून किंवा अशा जत्रांमधून तो प्लास्टिकचा छोटा बॉल, ज्याला एक इलेस्टिकटची दोरी असते जिच्या मदतीने आपण तो बॉल लांब फेकतो आणि जवळ ओढत संपूर्ण जत्रेत किंवा उरूसात भटकत असतो असा अनुभव घेतलाच असेल.

असे सर्व इव्हेंट देव कमी आणि धंदा -व्यवसाय-रिलॅक्सेशन इ.इ. साठी प्रसिद्ध असतात. देव-देवी नसतात का अशा जागांमध्ये ? तर असतात. यातील ५% लोक अगदी मनापासून सो कॉल्ड भक्ती भावाने मी तर पुढे जावून म्हणेल के प्रचंड अंधद्धेतून डुबुन मनोभावे देवी-देवाचे करतात. मग त्यातील देवांचे रथ असो नाहीतर ताजिया किंवा संदल असो जोरदार तयारी करतात. त्यासाठी त्यांना सर्व साधनही त्याच गावातून किंवा आजूबाजूच्या पंच क्रोशीतून सहज उपलब्ध होतात. शाळेसाठी किंवा कुठल्याही सामाजिक कामासाठी खूप रावण्या केल्या तरी अजिबात मदत न करणारे मात्र अशावेळी पुण्य मिळवण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. आपण सामाजिक कामासाठी मदत मागितली तर इतके रडतात की जणू मागील दोन दिवस आणि पुढचे दोन दिवस पैसे नसल्यामुळे हे हवा खावूनच जगणार आहेत. पण अशा धार्मिक कामासाठी मात्र लोक स्वतःहून देणगी आणून देतील. या सर्व उरूस-जत्रांमध्ये अंगात येणे गालात / जिभेत सूया, चाकू खुपसणारे भक्त तुम्हाला सहज पाहायला मिळतील आणि हे सर्व डेंजर कार्यक्रम सर्वांच्या समोर, सर्वांच्या मदतीने, डोळ्यांसमोर, कायदे धाब्यावर बसवून, पोलिसांच्या साक्षीने, संरक्षणाखाली व्यवस्थित चाललेले असतात आणि यात फक्त अडाणी, नाडलेले लोकच नसतात बरं का! चांगले उच्च शिक्षित, पुढारलेल्या लोकांचाही यात सहभाग असतो.

या सर्वात युवा सर्व कुठे असतो हे पाहण्यासाखेच आहे. शहरातील युवा वर्ग यात घोळक्याने येणे, गर्दीत घोळक्याने फिरणे, गर्दीत आवडणार्‍या पोरींच्या मागे मागे फिरणे, शक्य असेल तर गप्पा मारणे, लहान मुलांच्यामार्फत तिच्याशी संपर्क करणे. घरातल्या ,नात्यातल्या मुलींनाही त्या घोळक्यात सहभागी करून घेणे अशा प्रकारच्या राष्ट्रीय कार्यात बिझी असतात. आपल्याकडे तरूण तरूणींना समवयस्क लोकांबरोबर भंकस करायला, स्पर्श होवू घ्यायला अशा जत्रांशिवाय-उरूसा शिवाय किंवा नवरात्री शिवाय संधी नसल्यामुळे तेही या देवांचा उपयोग करून उपभोग ही व्यवस्थित घेतात. म्हणूनच कदाचित अशा वारी, उरूस, जत्रा, नवरात्रोत्सव या काळात सर्वात जास्त गर्भ निरोधकांची विक्री होते, लॉजचा वापर याच काळात जास्त वाढतो आणि लगेचच्या काळात गर्भसमापनाचे (गर्भपात) प्रमाण वाढते.

ग्रामीण भागात मात्र ह्या अशा उरूस जत्रांमध्ये संख्येने हौशे म्हणून तरूण सहभागी असतात पण तेवढ्याच संख्येने किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने तरूण विविध प्रकारची दुकान लावताना दिसतात. मानाने उत्पन्न कमावताना, आपली रोजी रोटी कमावताना दिसतात. अनेक भटक्या जाती-जमाती अशाच बाजारपेठांमधून दुकानं लावून उत्पन्न कमवतात. त्यामुळे त्यांचे कुटुंबच्या कुटुंब अशा उरूसात-जत्रेत त्यांच्या बरोबर फिरत असतात. त्यामुळे लहानपणीच शाळा बुडते. मोठ्यांबरोबर वस्तू बनवत बनवत फक्त जगण्याचे तेवढेच स्कील शिकतात. तेवढेच स्कील अवगत असल्यामुळे त्यांचे फुलण्याचे, विकासाचे सारीच दारे बंध होतात.

लहानपणापासूनच हातात रोख पैसे येण्याची सवय लागते त्यामुळे व्यसन लवकर लागण्याची शक्यता वाढते. रस्त्यावर संसार असल्यामुळे खाण्यापिण्याची कायम आबाळ असते. येईल ते खाण्याची सवय लागते. एवढेच स्कील येत असल्यामुळे हेच काम पुढे त्यांची इच्छा असली तरी किंवा नसली तरी करावे लागते. तोच त्यांचा पोटाचा ‘आधार’ असतो.‘आधार’ हवाच अस म्हणणारे आणि ‘आधार’ ची गरजच काय असे म्हणणारे दोघेही या मुलांच्या लहानपणीच का नाही यांना हवी असलेला सुरक्षित राहण्याची व्यवस्था, सन्मानाने जगण्याचा मार्ग, आवश्यक शिक्षण घेण्याचा, सुरक्षित बालपण ठेवण्याचा ‘आधार’ देत नाही? आणि म्हणून कितीही आरक्षण असलं तरी ते अशा उरूस-जत्रेतच सापडतात, स्वतःचा ‘आधार’ शोधत. ‘आधार’ म्हणजेच जगणं अस म्हणत ह्या सरकारने सर्वांचेच जगणं सळो की पळो केलं होत, काल उरूसात फिरतांना अशा असंख्य दिसणार्‍या तरूणांच्या त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती चंद्रवूड यांच्या परवाच्या निकालामुळे नक्कीच दिलासा मिळाला. आता सरकार जिवंत राहण्यासाठी तरी किमान त्या ‘आधार’ चा आधार घेवून छळणार नाही ,अशी आशा करू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -