घरफिचर्सआरोग्यदायी हिरड्यांसाठी

आरोग्यदायी हिरड्यांसाठी

Subscribe

स्वच्छ, निरोगी दातांसाठी दिवसातून दोन वेळा दात घासण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य जपणं सुद्धा तेवढचं महत्त्वाचं आहे. हिरड्यांची मजबूती आणि आरोग्य यावरच दातांचं आरोग्य अवलंबून आहे. अस्वच्छ हिरड्यांमुळे दातांचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे दात तुटणे, रक्त येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिरड्यांची काळजी कशी घ्यावी? याबाबत थोडक्यात.

Citrus fruit

आहाराकडे लक्ष द्यावे

हिरड्यांच्या आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी आहारात कच्च्या भाज्यांचा समावेश करावा. कच्च्या भाज्या चावून खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात. त्याचप्रमाणे आहारात ‘सी’ जीवनसत्व असलेल्या फळांचा समावेश करावा. यामध्ये आवळा, संत्री, मोसंबी आदी फळे खावीत. दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ करावेत.

व्यायाम करावा

ज्याप्रमाणे आरोग्यदायी शरीरासाठी आपण नियमित व्यायाम करतो. त्याप्रमाणेच आरोग्यदायी हिरड्यांसाठी व्यायाम करणं गरजेचं असतं. यासाठी तोंडाचा व्यायाम करावा. तोंडाचा व्यायाम केल्याने हिरड्यांमधील रक्ताभिसरण वाढतं आणि हिरड्या मजबूत होतात.

- Advertisement -

साखरेचे सेवन कमी करावे

ज्याप्रमाणे चॉकलेट आणि तत्सम पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांचे दात किडतात. परिणामी डॉक्टर मुलांना चॉकलेट खाऊ नका म्हणून सल्ला देतात. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनीसुद्धा साखरेच्या सेवनावर निर्बंध आणावीत. साखरेच्या सेवनाने बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया हिरड्यांमध्ये साचून राहतात. त्यामुळे दात किडतात. किंवा दातातून रक्त येतं.

- Advertisement -

खाल्ल्यानंतर दातांची काळजी घ्या

ज्याप्रमाणे उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करणं गरजेचं असतं. अगदी त्याप्रमाणेच काहीही खाल्ल्यानंतर दातांची स्वच्छता ठेवणे महत्त्वाचं असतं. काहीही खाल्ल्यानंतर पदार्थाचे कण दातांमध्ये अडकतात. परिणामी हिरड्यांचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे काहीही खाल्ल्यानंतर दातात अडकलेले अन्नाचे कण टूथपिकने काढून टाकावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -