घरटेक-वेकआधार कार्डचा पत्ता ऑनलाईन, ऑफलाईन कसा अपडेट कराल ?

आधार कार्डचा पत्ता ऑनलाईन, ऑफलाईन कसा अपडेट कराल ?

Subscribe

आपल्या मुलाच्या ५ वर्षांच्या पुर्ततेनंतर माहिती अपडेट करणे गरजेचेच आहे

आधारचा युनिक १२ अंकी क्रमांक हा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) मार्फत कोट्यावधी भारतीयांना पुरवण्यात आला आहे खरा. पण हे आधार कार्ड तुम्हाला वेळोवेळी अपडेट ठेवाव लागत, याच कारण म्हणजे आधार कार्ड तुम्हाला पुरावा म्हणून वापरता येत. आधार कार्डचा पत्ता ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा अपडेट करता येईल याविषयी …

आधार कार्डचा पत्ता बदलण्यासाठी मान्यता असलेल्या ४४ असा विविध कागदपत्रांचा वापर करता येतो. या कागदपत्रांचा उल्लेख युआयडीएआयच्या वेबसाईटवर आहे. त्यामध्ये पासपोर्ट, भाडे करार, बॅंक स्टेटमेंट किंवा पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर आयडी यासारख्या कागदपत्रांचा समावेश आहे.

- Advertisement -

पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेल्या वापरकर्त्यांनाच आपला पत्ता अपडेट करणे शक्य आहे.

१. Aadhaar Self Service Update portal व्हिजिट करा
२. तुमच्याकडे पत्ता अपडेट करण्यासाठी पुरेसे डॉक्युमेंट्स असतील तर ‘Proceed to update Address’ टॅब क्लिक करा
३. पुरेसे डिटेल्स एड करून आपल्याकडे असलेली कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
४. तुमच्याकडे कोणताही पुरावा नसला तरीही एड्रेस व्हॅलिडेशनची प्रक्रिया नंतर करता येते.
५. त्यानंतर चार टप्प्यात तुम्हाला एड्रेस व्हॅलिडेशन लेटरची प्रक्रिया करावी लागेल. त्यामध्ये रिक्वेस्ट जनरेट करण्यापासून ते सिक्रेट कोडचा वापर करण्याची प्रक्रिया आहे.
तुम्ही जर भाडे कराराचा वापर हा राहण्यासाठीचा पुरावा म्हणून करणार असाल तर तुमचा भाडे करार हा नोंदणीकृत असायला हवा. संपुर्ण पेजेस स्कॅन करून एक पीडीएफ तयार करता येते. त्यानंतर हे पीडीएफ युआयडीएआयला अपडेट करावे लागते.

- Advertisement -

 

aadhar card update
आधार कार्ड अपडेट

नोंदणी केंद्रावर पत्ता अपडेट कसा कराल ?

तुमच्या नजीकच्या आधार केंद्रावर पोहचूनही पत्ता अपेट करणे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य आणि खरी कागदपत्रे केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. खरी कागदपत्रे स्कॅन करून तुम्हाला परत करण्यात येतील.

आधार एपने कसा कराल पत्ता अपडेट ?
आधार कार्डचा पत्ता बदलण्यासाठी आता आधार एपचाही वापर करणे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला mAadhaar हे एप्लिकेशन मोबाईलवर डाऊनलोड करणे गरजेचे आहे. हे एप्लिकेशन एंड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -