हायब्रीड फंडाचा महिमा!

Mumbai
Hybrid funds

आजचा जमाना हा फ्युजनचा आहे. प्रेक्षकांना फ्युजन संगीत आवडते, तसा कला-प्रकार भावतो. फ्युजनचा गुंतवणुकीशी काय संबंध? असे तुम्ही विचाराल? बरोबर आहे. कारण आपण पैसे गुंतवताना ‘फ्युजन’ केले असे काही कधी ऐकलेले नसते. विनाकारण कन्फ्युजन हो, दुसरे काय? फ्युजन नसले तरी इन्व्हेस्टमेंटमध्ये ‘हायब्रीड’नावाचा प्रकार असतो आणि आज आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत. बँकेत बचत, मुदत ठेवी आणि रिकरिंग योजना आपण अनेकदा ऐकलेल्या असतात. अगदी नंतर आलेल्या म्युच्युअल फंडात ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड असे दोन प्रकार असतात. मग नेमके ‘हायब्रीड’म्हणजे ते तपशीलात पाहणार आहोत.

हायब्रीड फंड ही संकल्पना कशी उदयास आली? गुंतवणुकीच्या अनेक साधनांत पैसे गुंतवताना जोखीम आणि लाभ ह्यांचा समतोल साधने महत्त्वाचे असते. एकाच प्रकारच्या साधनात पैसे टाकले तर लाभ अधिक होऊ शकतो; पण असा एकांगी विचार करून चालत नाही. कारण सर्व पैसे अडकून पडतात किंवा डूबण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच संमिश्र-समतोल अशा प्रकारची गुंतवणूक करण्याकडे कल वाढू लागला. दोन किंवा अधिक प्रकारच्या एसेट-ीीशीं मध्ये जेव्हा गुंतवणूक केली जाते, तिला ‘हायब्रीड’ असे म्हटले जाते
उदाहरणार्थ:- डेब्ट आणि इक्विटी ह्यांचा संगम केला जातो की जेणेकरून लाभ आणि जोखीम व्यवस्थित सांभाळले जातात आणि धोका कमी राहतो.

आपण गुंतवतो, त्यामागचा हेतू आणि उद्देश 

1 आपल्या गुंतवणुकीची वर्गवारी करून धोका दूर ठेवता येतो.
2 विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे गुण आणि दोष ओळखून आपल्याला सोयीस्कर अशी इन्व्हेस्टमेंट करता येते
3 बाजारातील उलाढाल आणि त्याचे होणारे दुष्परिणाम ह्याकरिता ‘हायब्रीड’ असणे जरुरीचे
4 अनेक प्रकारच्या गुंतवणुकीचे कॉम्बिनेशन करता येते
5 व्यक्तिगत पोर्टफोलिओ हा अधिक सशक्त राहण्यास मदत होऊ शकते.
6 वित्त बाजारपेठेतील वैविध्याचा लाभ घेण्याची सुसंधी

हायब्रीड फंडात गुंतवले तर काही सर्वसाधारण स्वरूपाचे फायदे 

1 अनेकातून अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात
2 कमी-जास्त नफा लाभांश देणार्‍या योजनांतून नियमितपणा जपण्याचा प्रयत्न होतो.
3 तोटा सहन करण्याची पोर्टफोलिओची क्षमता वाढते
4 फक्त नफ्याच्या मागे धावण्याची किंवा अंदाज-पंचे गुंतवणुकीची सवय लागत नाही.
5 ओखीम व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते.
6 धोका वाढल्यास किंवा तोटा वाढत राहिल्यास ‘बाहेर’ पडण्याची संधी
7 दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे संपत्ती-निर्माण
8 उत्पन्न कमाईकरिता अल्प-मुदतीत ठेवणे इष्ट
9 इक्विटी फंडपेक्षा अधिक सुरक्षित
10 गुंतवणुकीस श्रीगणेशा करणार्‍या नवशिक्यासाठी ‘पहिली पायरी’ म्हणून सोयीचे
11 पारंपारिक व थोड्या मर्यादित गुंतवणूकदारांसाठी सोयीस्कर
12 मध्यम कालावधीसाठी उत्तम-म्हणजे जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी सोयीचे. तुम्हाला कार घेण्यासाठी किंवा एखादा उच्च शिक्षणाचा कोर्स करण्यासाठी ह्यातील इन्कम उपयोगी पडू शकते
13 निवृत्त मंडळींना लाभांश आणि स्थिर उत्पन्नासाठी सोयीचा फंड
काही नकारात्मक बाबी-कोणतीही योजना कधीच 100% परफेक्ट नसते. काही ना काही दोष किंवा त्रुटी या असतातच. संपूर्णतः पूर्णत्व असलेली योजना तशी सहसा नसतेच. म्हणून आपण कमी दोष असलेल्या किंवा आपल्याला अधिक

सोयीस्कर असलेल्या योजनेत पैसे गुंतवावेत.

1 कोणताही हायब्रीड हा कधीच जोखीम-मुक्त ठळीज्ञ-ऋीशश नसतो, कोणी तसे सांगत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. कारण हायब्रीडमध्ये इक्विटी असल्याने ‘रिस्क’ हे असतेच. उगाच जोखीम नाही, म्हणून भाबडेपणाने पैसे गुंतवू नका.
2 परताव्याची ठर्शीीींपी हमी नाही.कारण बहुतांशी गुंतवणूक ही बाजाराशी संबंधित असल्याने अमुक टक्के हमखास मिळतील ! असे कोणी छातीठोकपणे सांगत असेल, तर काही खरं नव्हे.
3 तुमचा पोर्टफोलिओ प्रोफेशनली पाहण्यासाठी फी घेणारच! मोफत असे काहीच नसते!

हायब्रीडचे काही प्रकार पाहूया 

1 इक्विटी ओरिएन्टेड हायब्रीड फंड 

ज्यात साहजिकपणे इक्विटीचे प्रमाण अधिक असते, म्हणजे 65% इतके प्रमाण इक्विटीमध्ये असते आणि उरलेले डेब्टमध्ये गुंतवले जातात. इक्विटीचे चढ-उतार हे शेअरबाजाराच्या कलानुसार चालूच राहतात; पण डेब्ट-मध्ये काही प्रमाणात केल्याने स्थिरता राहू शकते. सगळेच जर इक्विटीमध्ये टाकले तर बाजार चढला तर फायदा आणि खाली आला तर कपाळावर हात मारून घेण्याची पाळी येते. तसे होऊ नये, म्हणून हायब्रीडचा मध्यम-मार्ग सोयीचा वाटतो.

इक्विटीसाठी :-साधारणपणे एफएमसीजी, फायनान्स, हेल्थकेअर आणि रिअल इस्टेट अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये असे पैसे गुंतवले जातात.
डेब्टसाठी- निश्चित उत्पन्न देणार्‍या सरकारी रोख्यात,कर्जरोखे आणि बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवले जातात.
रोकड सुलभता – पैसे लागलीच उपलब्ध व्हावेत म्हणून काही पैसे रोकड-सुलभतेच्या हेतूने वेगळे ठेवले जातात.
फंड मॅनेजरचे कार्य – बदलत्या शेअरबाजारातील परिस्थितीनुसार लागलीच हालचाली करून योग्य शेअर्स खरेदी वा विक्री करणे आणि डेब्टमध्ये व्यवहार करावे लागतात.

2 डेब्ट ओरिएन्टेड हायब्रीड फंड 

ह्यात अधिकतर फंड म्हणजे जवळपास 60% इतकी रक्कम ही रोख्यात गुंतवली जाते आणि उर्वरित शेअर्स व अन्य साधनांमध्ये गुंतवली जाते. ज्यांना शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करायची नसते, ते या योजनेत पैसे गुंतवतात. डेब्ट म्हणजे रोख्यातील गुंतवणूक थोडी अधिक सुरक्षित वाटते. मार्केटमधील वेगवान लाटांच्या तीव्रतेचा तितकासा फटका बसत नाही.

तुम्हाला निवडायचे असतील तर सध्या कार्यरत असलेल्या पाच टॉप हायब्रीड फंड्सबाबतची नावे तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकतील किंवा चांगल्या एजंटकडे कळू शकेल. त्यातील उत्तम असा फंड तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.

उदाहरणार्थ – आजच्या नामांकित म्युचुअल फंड कंपन्या आहेत, त्यापैकी अनेकांच्या चांगल्या ‘हायब्रीड योजना’ आहेत, कोणाचा तसा थेट उल्लेख करता येतो (कारण ती विनाकारण जाहिरात केल्यासारखे होईल!) परंतु काहींनी मुलांच्यासाठी हायब्रीड म्युचुअल फंड स्कीम्स तयार केल्या आहेत, तर काहींनी सीनिअर सिटीझन्स म्हणजे ज्येष्ठांसाठी अशा संकरित योजना आखलेल्या आहेत. ह्याबाबत वर्तमानपत्रे, टीव्ही आणि इंटरनेट, म्युच्युअल फंड्स आणि एजंट ह्यांच्याकडे सविस्तर माहिती मिळू शकते आणि आपण तुलनात्मक करून निर्णय घेऊ शकतो.

आपण जस-जसे आर्थिक साक्षर होत राहू, तसे आपल्याला जाणवेल की आपले ‘बाजार-ज्ञान’ वाढते आहे आणि केवळ एजंट आणि ऐकीव माहिती यावर अवलंबून न राहता, आपल्याच बुद्धीच्या निकषावर आपण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम होत आहोत. शेवटी आपल्याला माहिती कुठूनही मिळाली तर आपल्या गरजा, आपली गुंतवणूक आणि लाभ-जोखीमेचे तंत्र ह्याबाबत आपणच मास्टर असतो. आपल्याइतके कोणी नेमके ओळखणारे असते का? मग आपल्यावतीने कोणाला आर्थिक निर्णय घेण्यास का सांगायचे? चला, आपण हळूहळू आर्थिक साक्षर बनूया आणि आपणच आपले अर्थ-नियोजन करुया !!
राजीव जोशी – अर्थ-बँकिंग अभ्यासक –

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here