घरफिचर्सफेसबुकला इन्स्टाग्रामची टक्कर !

फेसबुकला इन्स्टाग्रामची टक्कर !

Subscribe

‘फेसबुक इज डाइंग’ असं सर्रासपणे तरूणाईच्या चर्चेत गेल्या काही काळापासून सातत्याने ऐकायला मिळत आहे. फेसबुक जर अनपॉप्युलर होतंय, तर तरूणाई कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे वळलेय? अर्थात इन्स्टाग्राम हेच हमखास ऑबव्हियस उत्तर आहे. तरूणाईतला पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरंच फोटोग्राफीची कला जोपासतंय की या कलेला आणखी बळ देतंय ही चर्चा आता चांगलीच रंगू लागलीय... त्यानिमित्ताने इन्स्टाग्रामच्या बाबतीतले वेगवेगळे फीड आणि स्टोरीजही ...

गेल्या तीन वर्षांमध्ये फेसबुक वापरकर्त्यांमध्ये विशेषतः तरूणाईत फेसबुक नकोसं झालंय. अधिकाधिक टीन एजर्स आता इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटला अधिक पसंती देत आहेत असं अनेक अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे १३ वर्षे ते १७ वर्षे वयोगटात फेसबुक अनपॉप्युलर झालं आहे. पण त्याचवेळी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट अधिकाधिक पसंतीस उतरत आहे.

इन्स्टाग्राममुळे अ‍ॅपवर अनेक इफेक्ट तसेच फिल्टर आहेत; पण हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे हे लक्षात घ्यायला हवं. इन्स्टाग्रामवर प्रोफेशनल फोटोग्राफर्सही फोटो टाकतात आणि असे फोटो खूप पसंतीस उतरतात हेदेखील तितकंच खरं आहे. सेल्फीज पोस्ट करण्यासाठी फिल्टर वापरतात. अशा नव्या युजर्ससाठी हे एक आयतं आणि चांगलं असं माध्यम म्हणता येईल. फोटोग्राफीचं शिक्षण न घेतलेले नवे युजर्स तसेच डीएसएलआर फोटोग्राफीचा गंध नसणार्‍यांसाठी हे एक उत्तम माध्यम आहे. अनेकदा डीएसएलआर नसल्यामुळे फोटोग्राफीत इफेक्ट देता येत नव्हते. ती संधी आता इन्स्टाग्रामवर मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसालाही डीएसएलआरचा इफेक्ट वापरासाठी मिळू लागला आहे ही सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. पण सीरियस फोटोग्राफीवर फरक पडला असला असं अनेकांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

इन्स्टाग्राम वे फॉरवर्ड
इन्स्टाग्रामला स्पर्धा देणार्‍या अनेक नव्या फीचर्ससह आलेल्या अ‍ॅपमुळे एडिटींगचे आणखी पर्याय युजर्सकडे उपलब्ध झाले आहेत. गुगलने एक पाऊल पुढे जाऊन अनेक एडिटींगचे चांगले फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे फोटोग्राफी कलेचा फायदाच झाला आहे असं म्हणावं लागेल. अनेक ब्रॅण्डसनेही इन्स्टाग्रामचं महत्त्व लक्षात घेऊन कोट्यवधी रुपयांचं मार्केटींग बजेट हे या माध्यमाकडे वळवलं आहे. त्यामध्ये ई कॉमर्स साईटही पिछाडीवर नाहीत. वैयक्तिक प्रोफाईलपासूनचा ब्रॅण्ड तयार करण्यापासून ते आपल्या ब्रॅण्डची ओळख करून देण्यात सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आता इन्स्टाग्रामकडे वळली आहे. इन्स्टाग्रामवरचं अख्खच्या अख्ख पुस्तक वाचण्यासाठीची संधी मिळत असल्याबाबतही अनेक युजर्सची या अ‍ॅपला पसंती आहे. इफेक्टिव्हपणे इन्स्टाग्रामवर हॅशटॅग वापरणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरत आहे.

 

इन्स्टाग्राममुळे नवीन गोष्टीचाही पायंडा पडला आहेच. स्क्वेअर फॉरमॅटमध्ये फोटोचा नवा प्रकार आपल्याला पहायला मिळतो आहे. पूर्वी पोलोराईड आणि मीडियम फॉरमॅट कॅमेर्‍यावर असे इफेक्ट वापरणे शक्य होतं. पण आता इन्स्टाग्रामवर अशा इफेक्टचे फोटो काढणे आता शक्य आहे. अनेक फोटोग्राफर्सना आपलं काम सादर करण्यासाठी अडचणी होत्या. फेसबुक हे प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी तितकंस सीरियस प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जात नव्हतं. पण इन्स्टाग्रामवर मात्र सीरियस फोटोग्राफर्सना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. सीरियस फोटोग्राफर्सकडून हे टूल्स सहसा वापरले जात नाहीत. पण डीएसएलआर फोटो मांडणीसाठी हे खरंच उत्तम माध्यम आहे.

– अपूर्व सलकडे, सिनियर फोटोग्राफर,आऊटलूक मॅगझिन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -