घरफिचर्ससफर लेह - लडाखची

सफर लेह – लडाखची

Subscribe

सर्व काही नवीन. माणसं, वातावरण. मन प्रसन्न वाटत होतं. केवळ पुस्तकांमध्ये वाचलेलं, टीव्हीवरती पाहिलेले हेच ते रँचोचं लडाख. उंच-उंच डोंगर. नवीन संस्कृती पाहून मन एकदम भारावून गेलं. वातावरणाशी मिळतं-जुळतं घेण्यासाठी एक दिवस हॉटेलमध्येच आराम केला. पण खरी कसोटी लागणार होती ती दुसर्‍यादिवसापासून. कसं असेल लेह- लडाख? काय नवीन असेल?

मग, लेह – लडाखला जायचं? मैत्रिणींशी गप्पा मारता मारता आलेला विषय. अगं आपण सहल तर करतो ना दरवर्षी मग, यावर्षी जाऊ ना लेह – लडाखला प्रियांका पालवेची कल्पना. पण वयोमानानुसार झेपणार आहे का? शिवाय घरंचं कसं करणार? मनात हजारो प्रश्न उभे राहिले. प्रत्येकाची उत्तर शोधणं आणि त्यात वयाच्या ५५व्या वर्षी लेह – लडाखला जाणं म्हणजे शरीर किती साथ देईल इथून सुरूवात. त्यात काही दिवस गेले. मैत्रिणींचा आग्रह मात्र कायम होता. अखेर धीर करून यांच्या कानावर गोष्ट घातली. सर्व शंकांचं निरसन झाल्यावर परवानगी मिळालीदेखील. तसं पाहिलं तर सहली खूप झाल्या. पण भौगोलिकदृष्ठ्या आव्हानात्मक भागात जाणं म्हणजे एक कसोटीच म्हणायची. त्यात वयाचा विचार करता शरीराची साथदेखील महत्त्वाची. त्या रात्री झोप काही लागली नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यापासून आवरा-आवर सुरू झाली. काय राहिलं तर नाही ना?औषधं गोळ्या घेतल्या ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधत चार दिवस गेले. अखेर तो दिवस उजाडला. कुटुंबाशिवाय पहिल्यांदाच लांबचा प्रवास होणार होता. मनाला एक नवी उभारी मिळाली होती. नवं जग पाहता येणार होतं. शिवाय लेह-लडाख म्हणजे एक आव्हानच नाही का? वातावरण भौगोलिक परिस्थिती, वातावरण सर्व काही नवीन आणि बदलणार होतं. शिवाय विमान प्रवासदेखील पहिल्यांदाच होणार होता. त्यामुळं धाकधूक आणखीन वाढली होती. या सार्‍या गोष्टीचे मनात आखाडे बांधत अखेर आम्ही लडाखला लँड झालो.

- Advertisement -

सर्व काही नवीन. माणसं, वातावरण. मन प्रसन्न वाटत होतं. केवळ पुस्तकांमध्ये वाचलेलं, टीव्हीवरती पाहिलेले हेच ते रँचोचं लडाख. उंच-उंच डोंगर. नवीन संस्कृती पाहून मन एकदम भारावून गेलं. वातावरणाशी मिळतं-जुळतं घेण्यासाठी एक दिवस हॉटेलमध्येच आराम केला. पण खरी कसोटी लागणार होती ती दुसर्‍यादिवसापासून. कसं असेल लेह- लडाख? काय नवीन असेल? आपल्याला जमेल ना? ती रँचोची शाळा कुठे असेल? कारगिल टेकडी, वॉर मेमोरियल, स्तूप हे सर्व ऐकलं तर आहे. पण उद्यापासून चार दिवस हे प्रत्यक्ष पाहता येणार होतं. अनुभवता येणार होतं. हा सर्व विचार करता करता रात्र गेली. उत्सुकतेपोटी झोप तशी काही लागलीच नाही. ठरल्याप्रमाणे पहाटे सर्व आवरून निघालो लेह – लडाख पाहायाला.

एक नवीन दुनिया होती ती. मन भारावून टाकणारी. उंच उंच टेकड्या, स्तूप सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा अमुल्य ठेवा होता तो. खाण्यापिण्यापासून सर्व गोष्टींसाठी कसरत करावी लागली. पण एक समाधान मिळत होतं. फोटो काढ माहिती घे. यामध्ये मन रमून जात होतं. स्तूप पाहताना वास्तुकलेचा एक उत्तम नमुना अनुभवत होतो. उंच उंच जाताना वातावरण विरळ होत जातं त्यामुळे श्वास घेताना मोठी कसरत होत होती. पण या सार्‍यामध्ये थरार होता. तो आजवर केव्हाच अनुभवला नव्हता. हीच ती कारगिल टेकडी! टूर गाईडनं माहिती दिली. छाती अभिमानानं फुलून आली. अंगावर शहरे आले आणि कारगिल युद्धाच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. शहीद जवानांच्या आठवणीनं मन भरून आलं. सैनिकांच्या शौर्याच्या गाथा ऐकताना मनात एकच विचार येत होता किती करतात ना हे सैनिक आपल्यासाठी. या ठिकाणी घरांची रचनादेखील विशिष्टच. केवळ ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टी आज अनुभवत होते. भरभरून जगत होते. त्यानंतर मोर्चा वळला तो वॉर मेमोरियलकडे. कारगिल युद्धात वापरलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे. कॅप्टन आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देत होते. त्यांच्या शब्दागणिक जवानांप्रति असलेला आदर शंभर पटीनं वाढत होता. युद्धाच्या आठवणी डोळ्यासमोरून झरझर जात होत्या. सारं पाहून मन थक्क होत होतं.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -